Monday, January 1, 2024

होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मविआत कोणाला किती जागा? अंतिम फॉर्म्युला ठरला;

वेध माझा ऑनलाइन। आगामी लोकसभा निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले आहेत. दिल्लीत मविआचा अंतिम फॉर्म्युला ठरला,आता उत्सुकता शिक्कामोर्तबाची असल्याची माहिती एका जेष्ठ नेत्याने माध्यमांना दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत नुकतीच महत्त्वाची बैठक झाली होती. विशेष म्हणजे या बैठकीत वंचित आघाडी, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष,आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांना देखील महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जागा वाटपात एकमत करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत ठरलेल्या फार्म्युल्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 18-19 जागा, काँग्रेस 13 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 10 जागा, वंचित आघाडी 2 जागा, स्वाभिमानी शेतकरी पक्ष 2 जागा, बहुजन विकास आघाडी 1 जागा यावर एकमत झाले आहे. मात्र अजून चार जागांवर असलेल्या चर्चा अंतिम टप्यात असून लवकरच मविआचे अंतिम जागावाटप जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment