वेध माझा ऑनलाइन। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची अमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशी केली. यानंतर आता ठाकरे गटाचा दुसरा आमदार रडारवर आलाय. शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ. राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) धाड टाकत त्यांची चौकशी सुरू केली आहे.
रत्नागिरीतील राजन साळवी यांच्या राहत असलेल्या घरी, एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता दाखल झाले. १८ ते २० एसीबीचे अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश मिळाल्यानंतर दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी ही चौकशी सुरु केली. ‘आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळे आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत, हे जनतेला माहीत आहे’, असे राजन साळवी म्हणाले.
No comments:
Post a Comment