Thursday, January 25, 2024

कोयना वसाहत व नांदगावसाठी एकूण ४० लाखांचा विकासनिधी मंजूर ;डॉ अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश;

वेध माझा ऑनलाइन।  कराड दक्षिण मतदारसंघातील कोयना वसाहत आणि नांदगाव (ता. कराड) या गावांमधील विविध विकासकामांसाठी भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे एकूण ४० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. या विकासनिधीसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

कराड दक्षिण मतदारसंघातील कोयना वसाहत आणि नांदगाव येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मिळावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे केली होती. त्यानुसार डॉ. भोसले यांनी याकामी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली. ना. महाजन यांनी या मागणीची दखल घेत, कोयना वसाहत आणि नांदगावसाठी एकूण ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून कोयना वसाहतमध्ये युरेका टॉवर्स ते मातोश्री अपार्टमेंट रस्ता काँक्रिटीकरण (१० लाख) आणि सेन्च्युरी टॉवर्स ते रोहित अपार्टमेंट रस्ता काँक्रिटीकरण (१० लाख) केले जाणार आहे. तसेच नांदगाव येथे दोन ठिकाणी प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे एकूण २० लाखांच्या निधीतून रस्ता काँक्रिटीकरण केले जाणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे. या विकासकामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. या निधीबद्दल ग्रामस्थांमधून ना. गिरीश महाजन आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.


No comments:

Post a Comment