Monday, December 30, 2024

अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण :

वेध माझा ऑनलाइन।
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मीक कराड फरार होता. जवळपास 20 ते 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण गेला आहे.

वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरण येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात वाल्मिक कराडने आपल्याला राजकीय द्वेषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी माझा काही संबंध नाही, असं वाल्मिक कराडने म्हटलंय.
तर संतोष देशमुख यांच्या कन्या यांनी देखील यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली. ‘वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण गेले तर मग इतक्या दिवस पोलीस काय करत होते?’, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सध्या वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकेनंतर आता पुढील तपास लवकरच केला जाईल.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी या आरोपींची नावे आहेत. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत.

या प्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा तपास केला जातोय.

संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबररोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरण करून नंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचा दावा केला जातोय.

Sunday, December 29, 2024

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आज सरेंडर होणार?

वेध माझा ऑनलाइन
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मीक कराड फरार आहे. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, ते आज (30 डिसेंबर) कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर सरेंडर होऊ शकतात, असं म्हटलं जातंय.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हत्या प्रकरणी आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. हे प्रकरण आता थेट सीआयडीकडे गेले असून सीआयडीकडून तपास केला जातोय.अशात आज वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते देखील गोठवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा वेगवेगळ्या अॅंगलने तपास केला जातोय.

सीआयडीकडून नुकतीच वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी झाली. वाल्मिक कराड हे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. गेल्या दहा वर्षांपासून वाल्मिक कराड हे एनसीपीचे काम करत आहेत. परळीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.अशात त्यांचे नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आले आहे.

Saturday, December 28, 2024

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी मोठी बातमी ; मर्डर करणाऱ्या आरोपींचीच हत्या! काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तीन आरोपींचा खून झाला असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला आहे. त्यांच्या या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. 

बीड मधील राजकीय गुन्हेगारीचा आणि गुंडाशाहीचा प्रश्न सारखा समोर येत आहे. आणि यामुळेच पोलिस यंत्रणा आणि सीआयडीच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह देखील उपलब्ध केले जात आहे. सरपंच संतोष देसाई यांच्या आरोपींना अटक करा अशी मागणी लोकांनी केलेली आहे. आणि त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी बीडमध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे.  अंजली दमनिया या  ठिय्या आंदोलन करणार आहेत. आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार आहे असे माहिती त्यांनी दिलेली आहे.

बीड मधील सर्वपक्षीय मोर्चा बद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी सांगितले की, “सध्या तेथे राजकीय नाटक सुरू झालेले आहे. दीपक क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच आहेत. ते आपापल्या क्षेत्रातील काम करतात. अशा लोकांनी बोलावं हे हास्यास्पद आहे. आम्ही हातभर माणसं जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मीक कराडला अटक केली जात नाही. तोपर्यंत  आंदोलन करणार आहे.”

यापुढे अंजली दमानिया यांनी सांगितले की, “आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन आम्ही आलो होतो. परंतु मला एक अत्यंत धक्कादायक बातमी सांगायची आहे. ती म्हणजे काल रात्री जवळपासच्या 11. 30 आसपास मला फोन आला आणि त्यात सांगण्यात आले की, ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाही. कारण त्यांचा मर्डर झालेला आहे. हे ऐकून मी ताबडतोब पोलीस निरीक्षकांना फोन करून त्याची माहिती दिली. ते मेसेज त्यांना सांगितले. त्याची चौकशी ते करतील परंतु मला यात कितीपत सत्यता आहे हे ठाऊक नाही. परंतु जर असं झालं असेल तर हे अत्यंत भयानक आहे.”

Friday, December 27, 2024

सैदापुरात फ़ायरिंग ; चिमुकली जखमी ; एकास अटक;

वेध माझा ऑनलाइन।
कराड नजीक असणाऱ्या सैदापूरातील एका कॉलनीत किरकोळ कारणावरून फायरिंग करण्यात आल्याची घटना घडली आहे

या घटनेत एक चिमुकली जखमी झाली आहे असे समजते दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले असता त्यांनी एकास अटक केली आहे तर चिमुकलीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे असेही कळते

घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही

कराडच्या डीवायएसपी पथकाकडून कराड-मलकापुरातील कॅफेंवर छापे, चालक-मालकांवर गुन्हे दाखल ; वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाइन
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या पथकाने शुक्रवारी कराड, मलकापूर परिसरातील कॅफेंवर कारवाईचा धडाका सुरू केला. चार स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत अनेक जोडपी पोलिसांच्या छाप्यात सापडली. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून वारंवार सुचना देऊनही प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या कॅफे चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे अवघ्या दोन तासांच्या कारवाईत दहा कॅफेंवर कारवाई करण्यात आली आहे.

कराड, मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी आडोशाला तर सेवारस्त्यालगत कॅफेंची संख्या वाढली असून या कॅफेंमधे प्रेमीयुगूले तासन् तास अश्लिल चाळे करत बसलेली असतात. यातून एखादा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक यापुर्वी यातून असे काही गंभीर गुन्हे घडले आहेत. यासंदर्भात पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या वेशातील पोलिसां मार्फत खात्री करून एकाचवेळी चार पथकांकडून कारवाई करण्याची व्युहरचना आखली.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, साक्षात्कार पाटील, यांच्यासह संतोष सपाटे, आसिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयूर देशमुख, अनिकेत पवार, महिला पोलीस कांचन हिरवे, ज्योती काटू, वैशाली यादव, धनश्री माने या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली चार पथके तयार करून ती कॅफेच्या परिसरात अचानक पाठवण्यात आली. एकाचवेळी कारवाई झाल्याने कॅफेचालकांची चांगलीच पाचावर धारण बसली. कॅफेच्या नावाखाली सुरू असलेले अश्लिल उद्योगास प्रोत्साहन देण्याचे प्रकार उघडकीस आले.पोलीस उपअधिक्षक ठाकूर यांनी कॅफे चालक मालकांसह तिथे असलेल्या जोडप्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार कॅफेत आढळलेल्या जोडप्यांवर मुंबई कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून कॅफे चालक मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.यापुढेही गैरप्रकार चालणारे कॅफेंवर कारवाई सुरूच ठेवावी असे आवाहन पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी केले आहे.

कराड- तासवडे येथे 10 लाखाचा गुटका जप्त ;पोलिसांची कारवाई

वेध माझा ऑनलाइन।
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे येथील टोल नाक्यावर तळबीड पोलिसांनी टेंपोसह दहा लाख ३० हजार रुपयांचा गुटखा पकडला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

विकास वसंत जाधव (वय ३५, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की महामार्गावर शनिवारी (ता. २१) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निपाणी (कर्नाटक) येथून टेंपो गुटखा घेऊन जाणार आहे, असे तळबीड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण भोसले यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार तासवडे टोल नाक्यावर नाकाबंदी करून टेंपो ताब्यात घेतला.त्याची झडती घेतली असता त्यामध्ये १० लाख ३० हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी टेंपोसह १० लाख ३० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. तळबीड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विकास वसंत जाधवला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.


३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे २८ डिसेंबरपासून पाच दिवस बंद ;

वेध माझा ऑनलाईन ।
कोयना भागात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे २८ डिसेंबरपासून पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.

सह्याद्री व्याघ्र राखीव मधील कोयना व हेळवाक वनपरिक्षेत्रात २८ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात जेवणावळी करण्यासाठी वनक्षेत्रात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी वन क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून चूल मांडून जेवण, मद्यपान करणे, वणवा लावणे, शिकार करणे, गोंधळ करणे आदी अनुचित प्रकार करणाऱ्या संबंधितांवर तत्काळ वन्यजीव व वन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
वनक्षेत्राकडे येणाऱ्या रस्त्यावर चेक पोस्ट लावून वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून जंगल क्षेत्रात रात्रगस्त ठेवण्यात येणार आहे. पर्यटक व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे.

Thursday, December 26, 2024

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट ; सरकारने उचलले मोठे पाऊल ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बदनामीकारक पोस्ट्स करण्याच्या प्रकरणात राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात सायबर गुन्ह्याच्या अधिनियमांतर्गत 12 सोशल मीडिया प्रोफाइल्सविरुद्ध FIR नोंद करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी

सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व्हिडीओस आणि पोस्ट्स शेअर करणारे 12 सोशल मीडिया यूजर्सविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रोफाइल्सने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धोका पोहोचवणारे आणि त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आणणारे व्हिडीओ पोस्ट केेले होते. भाजपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यासंदर्भात सरकारचं मोठं पाऊल

महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणात लक्ष घातले आहे आणि संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटिस पाठवली आहे. या नोटिसांमध्ये त्यांना बदनामीकारक पोस्ट तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या पावलामुळे सोशल मीडियावरून होणारी बदनामी आणि खोट्या बातम्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या कारवाईच्या माध्यमातून सरकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील नियंत्रण वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत. हे पाऊल सोशल मीडियाचा योग्य वापर करण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी पंकजा मुंडे यांचे मोठे विधान ;

वेध माझा ऑनलाइन।
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. दरम्यान, आता पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एक भाष्य केलं आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

संतोष माझा बूथप्रमुख 
माध्यमांशी बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, संतोष देशमुख हा माझा बूथप्रमुख होता. हे प्रकरण घडलं त्यावेळेस गोपीनाथ गडावरुन पहिली एसआयटीची मागणी मी केली होती. सध्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहेत आणि ते लेकराला नक्की न्याय देतील आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा न्याय देतील असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

बड्या नेत्यांची नावे समोर ; 
दरम्यान, आज अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून पिस्तुलीचा होत असलेल्या गैरप्रकारावर ट्वीट केलं आहे. मात्र या ट्विटमुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र आता वाल्मिक कराडच्या नावासह आता बीड जिल्ह्यातील बड्या नेत्यांची नावे समोर आल्याने चर्चांना प्रचंड उधाण आले आहे.


विद्यार्थिनीला मार्क वाढवून देण्याचे अमिश दाखवत शरीर सुखाची मागणी ; प्राचाऱ्याला पालकांनि दिला चोप ;

वेध माझा ऑनलाइन।
भंडारा  येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना परीक्षेत पास होण्यासाठी मार्क वाढवून देण्याचं आमिष दाखवत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्याला पालकांनी जाब विचारत बेदम चोप दिला. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयात घडला. किरण मुरकुट असं पालकांनी बदडलेल्या प्रभारी प्राचार्याचं नावं आहे.


अधिकची माहिती अशी की, भंडारा येथे शासकीय नर्सिंग महाविद्यालय असून इथं 182 प्रशिक्षणार्थी ANM आणि JNM चं प्रशिक्षण घेतात. त्यातील काही विद्यार्थिनींना प्राचार्यांनी परीक्षेत पास करण्यासाठी गुण वाढवून देतो, अशी बतावणी करून काही मुलींना त्यांच्या मोबाईलवर लज्जास्पद मॅसेज पाठवून शरीरसुखाची मागणी केली. त्यातील काही पीडित मुलींनी सदर प्राचार्याची तक्रार त्यांच्या पालकांना केली आणि आज संतप्त पालक नर्सिंग महाविद्यालयात दाखल झाले. यावेळी पालकांनी प्राचार्याला याबाबत विचारना केली असता त्यांनी उडवाउवीचं उत्तर दिलं आणि संतप्त पालकांचा संताप अनावर झाला आणि थेट त्यांनी प्राचार्याला चांगलाचं चोप दिला. यावेळी पोलिसांनी वेळीच दखल घेत प्राचार्याला ताब्यात घेतलं.

हवेत गोळीबार करून व्हिडीओ काढणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचलले ; गुन्हा दाखल ;

वेध माझा ऑनलाइन।
हवेत गोळीबार करून व्हिडीओ काढणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, परळी पोलिसांनी आज (दि.26) त्याला अटक केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता याच कैलास फडला परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान न्यायालयात हजर केले असताना कैलास फडला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  शिवाय कैलास फड कडून परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल  झाला होता.

Wednesday, December 25, 2024

नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका कधी होणार ?मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले.?

वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील विधानसभांच्या निवडणुका संपन्न होऊन नवीन सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिंमडळ विस्तार होऊन पहिलं अधिवेशनही पार पडलं. त्यामुळे, लोकसभा, विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका कधी होतील, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. कारण, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून गेल्या 2 ते अडीच वर्षांपासून नगरपालिका महापालिकांच्या निवडणुकाच घेण्यात आल्या नाहीत. विशेष म्हणजे सध्या या संस्थांचा कारभार प्रशासनाकडून पाहिला जात आहे. यासंदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना कालावधी सांगितला.  

ते म्हणाले ''मला असं वाटतं की, जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. आम्ही देखील याबाबत सातत्याने विनंती केली आहे, मला अशी अपेक्षा आहे की, जानेवारी महिन्यातच सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी अंतिम सुनावणी घेऊन निकाल देईल. त्यानंतर, जो काही वेळ असेल तो घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, अर्थात निवडणुकांच्या तारखा ठरवायचा अधिकार हा आमचा नसून सर्वोच्च न्यायालयाचा आहे,'' आम्ही देखील लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात हे पाहत आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले.

एकनाथ बागडी यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद ; नामदार जयकुमार गोरे यांचे गौरवोद्गार;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहर भाजप अध्यक्ष एकनाथ बागडी यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार नामदार जयकुमार गोरे यांनी काढले

जयकुमार गोरे याना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर नुकतेच ते कराड येथे स्व यशवन्तराव चव्हाण यांच्या समधीस्थळी नतमस्तक होण्याकरिता आले  होते त्यानंतर त्यांनी शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते

ते म्हणाले कराड शहरात भाजपचा विचार रुजवण्यासाठी एकनाथ बागडी सातत्याने कार्यरत असतात अनेक वर्षे त्यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे व सचोटीने केले आहे त्यामुळे कराड शहरात भाजपची ताकद वाढली आहे त्यांना नक्कीच उजवल भवितव्य आहे त्यांच्या पाठीशी भाजप कायमच सर्व ताकदीने उभा राहील माझे स्वतःचे देखील त्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील असेही ते म्हणाले

यावेळी नामदार जयकुमारभाऊ गोरे, आमदार  अतुलबाबा भोसले,आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, प्रदेश सदस्य  भरतनाना पाटील,प्रदेश सदस्य रामकृष्ण वेताळ, भीमराव दादा पाटील माजी जिल्हापरिषद सदस्य, अरुण भाऊ गोरे जिल्हापरिषद सदस्य, सागर शिवदास माजी जिल्हापरिषद सदस्य, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, धनाजी पाटील दक्षिणमंडलाध्यक्ष, निलेश माने विरोधी पक्षनेते रहिमतपूर, शिवाजी शिंदे माजी जिल्हापरिषद सदस्य, सुनील बापू शिंदे सरचिटणीस सातारा, शंकरराव शेजवळ मंडलाध्यक्ष उत्तर, दीपक महाडिक,नाना सावंत,भैय्यासाहेब पाटणकर, रामभाऊ डुबल, महादेव साळुंखे,मंडलाध्यक्ष गणेश सत्रे, मंडल अध्यक्ष गणेश यादव, चिन्मय कुलकर्णी युवा मोर्चा अध्यक्ष सातारा, प्रमोद शिंदे, प्रशांत कुलकर्णी, रुपेश मुळे, विश्वनाथ फुटाणे, सोपान तावरे, संजय शहा, प्रितेश मेहता, विवेक भोसले, सौरभ शाह, राजेंद्र खोत,राहुल आवटे,अनिल पवार,विशाल कुलकर्णी, किसन चौगुले,सागर लादे, चेतन थोरवडे,सुदेश थोरवडे,नितीन भोसले,अनिकेत वास्के, सौ सुमन बागडी,सौ भारती शिंदे, सौ पल्लवी तावरे,सौ सावित्री पवार,सौ स्वाती पवार,सौ मंजिरी कुलकर्णी, सौ कविता माने, सौ सारिका गावडे, सौ राजश्री कारंडे, सौ राधिका पन्हाळे, सौ सरिता हरदास, सौ वहिदा सुतार,आदी मान्यवर उपस्थित होते

डॉ अतुल भोसले म्हणाले...परिपूर्ण असा आदर्श मतदारसंघ बनवण्याचे माझे स्वप्न ;

वेध माझा ऑनलाइन
 कराड शहरासह दक्षिण विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकासाठी मी प्रयत्नशील आहे. शहरातील प्राचीन मंदिरे, वास्तू यांचे जनत व संवर्धन, वाहतूकीच्या समस्येसाठी नेकलेस रोड, नागरी सुविधा, आरोग्य सुविधा, पार्किंग, मिनी नवीन एमआयडीसीबाबत प्रामुख्याने काम करणार असून कराड व मलकापूर शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परिपूर्ण असा आदर्श मतदारसंघ बनवण्याचे माझे स्वप्न आहे असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा मोठा आराखडा तयार करणार गरजेचे आहे. मतदार संघातील गावागावात स्वच्छ पिण्याचे पाणी, मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते, गावामध्ये बगीचा यासह सौउर्जा प्रकल्प उभारून गाव स्वावलंबी बनवण्याचा आराखडा तयार करणार आहे. हे करत असताना जे माझ्या सोबत त्यांना बरोबर घेणार आहे मात्र जे माझ्या सोबत नाहीत त्यांनाही बरोबर घेऊन गावचा विकास केला जाणार आहे. डोंगरी गावांचा डोंगरी विभागात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे व शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याबरोबर पंचायत समितीत नवीन इन्फ्रास्टकचर उभा करता येईल का यासाठीही प्रयत्न करणार आहे.
शहरातील वीर मारूती, जोतिबा मंदिर, कृष्णाबाई मंदिरासह प्राचीन मंदिरे व वास्तूंचे जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहे. याचबरोबर मतदारसंघातील क वर्गातील देवस्थानांना ब वर्गामध्ये समाविष्ट करणे व ज्यांचे वगकरण झाले नाही त्या देवस्थानांना क वर्गाचा दर्जा देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
कराड शहराला भेडसवणाऱ्या वाहतुक समस्यासाठी नेकलेस रोडचा प्रस्ताव तयार केला जाणार असून पंकज हॉटेलपासून नदीलगतच्या गॅबिन भिंतीची उंची वाढवून त्यावरून रस्ता तयार करणार आहे. तसेच विटा व सांगलीकडे जाणारी वाहने शहरातून न येता त्यांना बाहेरूनच मार्ग देण्याची व्यवस्था केली आहे. जा याचबरोबर भविष्यकाळात खोडशीपासून कराडमध्ये येण्यासाठी पुल उभारण्याचा विचार आहे. यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.  याचबरोबर शहरामध्ये मल्टी लेव्हल पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव तयार करून निधीची मागणी करणार आहे.  
कराडच्या एमआयडीसीमधील सध्याच्या उद्योजकांची बैठक घेणार आहे. जुन्या उद्योजकांचा आढावा घेऊन नवीन उद्योजकांना आमंत्रित करण्याचे नियोजन केले जाणार आहे. उद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत ह्या प्रथम जाणून घेणार आहोत. त्यानंतर आहे त्या ठिकाणी काय बदल करावे लागतील ते केले जातील. मनुष्यबळ कोणत्या प्रकारचे लागतील हे जाणून घेणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत याच्याबरोबर विमानप्रवासामध्ये नवीन मिनी एमआयडीसी संदर्भात चर्चा झाली. सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच आयटी प्रकल्प आणण्यासंदर्भातही माझा प्रयत्न राहणार आहे.
पाटण कॉलनीमधील झोपडपट्टी असणाऱ्या आरक्षित जागेवरील पार्किंग असा उल्लेख काढून तेथे बेघरांना घरे असा उल्लेख करून तेथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या लोकांना पक्की घरी मिळावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. या वर मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पाटण कॉलनी, स्टेडियम, मलकापूरातील परिसरातील झोपडट्टीवासीयांचे शंभर टक्के पुनर्वसन केले जाणार आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक करून या ठिकाणी पक्की वसाहत तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नगरीमध्ये  एकही व्यक्ती बिनघराचा राहणार नाही यासाठी माझे प्रयत्न राहणार असून कराड व मलकापूर शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी येणाऱ्या काळात काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

Tuesday, December 24, 2024

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज कराड दौऱ्याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसला भेट दिली. याठिकाणी त्यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. 

नुकत्याच झालेल्या खातेवाटपात सातारा – जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी वर्णी लागली. या निवडीनंतर आज प्रथमच ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले कराड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसला भेट दिली. यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ना. भोसले यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.

याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, राजेश पाटील-वाठारकर, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, संजय पवार, बंटी जाधव, उमेश शिंदे, सुरज शेवाळे, वसीम मुल्ला, धनाजी माने, पिनू जाधव, धनाजी जाधव, राहुल पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

जयकुमार गोरे म्हणाले...रामराजें कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनातरी माहीत आहे का ? शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले... उदयनराजे आणि आमच्यात आता संघर्ष नाही, स्थानिक राजकारणात मात्र तो दिसतो ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
रामराजे नाईक निंबाळकर हे नेमके कोणत्या पक्षात आहेत हे त्यांना स्वतःला देखील माहीत नसेल... मलातरी माहीत नाही... असे खोचक वक्तव्य आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी कराड येथे केले 
मंत्रिपद मिळाल्यानंतर स्व यशवन्तराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते 
रामराजे आणि त्यांच्या राजकीय संघर्षावर भाष्य करताना त्यांनी ही टिप्पणी केली दरम्यान रामराजे म्हणजे फलटण नव्हे असेही ते यावेळी म्हणायला विसरले नाहीत तरीदेखील आमच्यात संघर्ष नाही असेही ते यावेळी म्हणाले...
यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले  ,उदयनराजे यांच्यासह अतुलबाबा मनोज घोरपडे,जयकुमार गोरे आणि मी... आम्ही एकमेकाला मदत करण्याचे धोरण  स्वीकारले त्यामुळे जिल्ह्यात आज 4 मंत्री महायुतीच्या काळात दिसत आहेत राष्ट्रवादी च्या सत्तेच्या काळात स्व अभयसिहराजे यांच्यावर अन्याय झाला त्यांना मंत्रिपदापासून वंचीत ठेवले गेले अन्यथा जिल्ह्याच्या विकासात अधिक भर पडलेली दिसली असती 

माझा आणि उदयनराजे यांचा संघर्ष हा केवळ स्थानिक राजकारणात कधीतरी दिसला असेल एखाद्या कार्यकर्त्याच्या वार्डातील उमेदवारीवरून तो दिसला असेल मात्र ते आमचे खासदार आहेत मार्गदर्शक आहेत आम्ही त्यांना खासदार करण्याकरिता प्रयत्न केलेत त्यांनीही माझ्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे आमच्यात संघर्ष आहे असे म्हणता येणार नाही असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले
दरम्यान,या दोन्ही मंत्र्यांनी सातारा जिल्ह्यासाठी आपले विकासात्मक व्हिजन असल्याचे सांगून जिल्ह्याची प्रगती अधिकाधिक व्हावी यासाठी आपण कटिबद्ध  असल्याचेही यावेळी सांगितले

Monday, December 23, 2024

वेध माझा ऑनलाइन
मंत्रिमंडळात डावलल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले आहेत. मंत्रीमंडळ विस्तारानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत टीका करताना दिसून येत आहेत.नाराज भुजबळ आता कोणती मोठी भूमिका घेणार याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीने आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. दरम्यान, याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खुलासा केला आहे.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भुजबळ साहेबांनी माध्यमांना आमच्यातल्या चर्चांबद्दल सांगितलं आहे, त्यामुळे मला वेगळी माहिती द्यायची गरज नाहीये. पुढे ते म्हणाले की, भुजबळ साहेब महायुतीचे नेते आहेत, आणि राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्यांचा तिथे सन्मान आहे. मात्र, आम्हा तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे.यावेळी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही?, असा प्रश्न देखील फडणवीसांना विचारण्यात आला. ते म्हणाले की, भुजबळांना अजित पवारांनी मंत्रीमंडाऴात घेतलं नाही. यामागे भुजबळांना डावलन्याचा अजित पवारांचा कोणताच हेतू नव्हता.
एवढंच नाही तर, अजित पवारांनी मला सांगितलं की, आम्हाला त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

यशवन्त विकास आघाडीच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई यांचे कराडमध्ये जोरदार स्वागत ; शंभूराजे देसाई यांच्यावर जेसीबी च्या साहाय्याने केली पुष्पवृष्टी ;


वेध माझा ऑनलाईन
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई प्रथमच पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते तत्पूर्वी कराड येथे पाटण  तिखाटणे येथे  शिवसेना यशवंत विकास आघाडी व कराड नगरीच्या वतीने त्यांचे भव्य जल्लोषी स्वागत करण्यात आले यावेळी जेसीबीच्या साह्याने मंत्री शंभूराजे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच जोरदार फटाके फोडण्यात आले 

आजपर्यंत कराड शहराच्या  विकासासाठी भरघोस निधी शंभूराजे यांनी दिला आहे तसेच इथून पुढच्या काळात कराड शहराला ते भरीव सहकार्य करतील अशी अपेक्षा कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिह  यादव बाबा यांनी व्यक्त केली 

यावेळीविजयसिंह यादव माजी नगरसेवक हणमंतराव पवार स्मिता हुलवान विजय वाटेगावकर बाळासाहेब यादव किरण पाटील गजेंद्र कांबळे विनोद भोसले राहुल खराडे ओंकार मुळे निशांत ढेकळे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राजेंद्र माने सुलोचना पवार गुलाबराव पाटील सुधीर एकांडे जयंत गुजर सचिन पाटील संजय थोरात बापू देसाई संतोष अवघडे प्रमोद पवार विनोद शिंदे तसेच राजेंद्रसिह यादव व विजयसिह यादव मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

Sunday, December 22, 2024

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांना मान्यवरांकडून अभिवादन ;

वेध माझा ऑनलाइन
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, जे डी मोरे, सयाजी यादव, अविनाश खरात, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, बाबासो शिंदे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील,  बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले,  एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील,डॉ.एस व्ही पाटील आदींसह मान्यवरांनी आप्पासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आप्पासाहेबांच्या सहकारातील योगदानामुळे कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कृष्णाकाठ समृद्ध  झाला असल्याची भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात संचालक लिंबाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांच्या हस्ते स्व. जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. 

परप्रांतीयांचा धुडगुस ; मराठी कुटुंबियांना बेदम मारहाण ; 4 वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारला म्हणून केली मारहाण ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत कल्याणमध्ये परप्रांतियांनी अक्षरश: धुडगूस घातलाय. चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव असून त्यांच्या पत्नीने देखील मारहाण केली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत अधिकची माहिती अशी की, मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  दरम्यान, याची माहिती संबंधित चिमुकलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत मराठी तरुण जखमी झालाय तर तरुणाच्या पत्नीला आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत. या प्रकरणी पांडे पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलाय. 


भुजबळांनी केले अजिदादाना टार्गेट ;माणिकराव कोकाटे काय म्हणाले... अनेकांच्या भुवया उंचावल्या

वेध माझा ऑनलाइन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहेत. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. आता यावरून मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


माणिकराव कोकाटे म्हणाले की, मला वाटत नाही की छगन भुजबळ नाराज असतील. ते 20 वर्षापासून मंत्री आहेत, त्यामुळे नाराज असण्याचे काही कारण नाही. त्यांचे काही गैरसमज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ते गैरसमज दूर होतील आणि लवकरात लवकर ते कामाला लागतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 
छगन भुजबळ यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच पक्षाचा निर्णय घेतात. आम्हाला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत शून्य स्थान आहे, असे म्हटले. तसेच अजित पवारांना छगन भुजबळ यांनी टार्गेट केले. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, ते चुकीचे आहे. अजित पवारांना टार्गेट करण्याची आवश्यकता नाही. अजित पवारांनी सर्वसमावेशक निर्णय घेतलेला आहे. सर्व समाजाच्या लोकांना त्यांनी न्याय दिला आहे. ज्या ओबीसी समाजाची आपण चर्चा करतो त्या ओबीसी समाजाज्याच्या 17 नेत्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाले आहे. तर 16 लोक मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे समाजावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. अजित पवारांनी अतिशय योग्य केल आहे. अनेक नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. दादांनी हे जाणीवपूर्वक करणे आवश्यक होते. त्यांनी काही चुकीचे केलेले नाही, असे माझे मत आहे. 

धनंजय मुंडे यांना अटक करा ; मंत्रीमंडळातून हाकलून द्या;

वेध माझा ऑनलाईन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्री धनंजय मुंडे यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा या पत्राद्वारे करण्यात आलीय. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर बारामतीमध्ये शोक सभा तसेच घटनेचा निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाने पत्रात काय म्हटलंय? 

मराठा सरपंच बांधव कै. संतोष देशमुख यांचा परळी येथे नुकतीच निघुर्ण हत्या झाली. सदरची हत्या ही केवळ कै संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत व त्याचा सर्वात मोठा अडसर हा आपले पक्षाचे आमदार व मंत्री श्री धनंजय मुंडे या नेत्याला होत होता म्हणुन सदरील नेत्याने इतर गुंडामार्फत म्हणजेच वाल्मिक कराड व इतर यांचेमार्फत हत्या केलेचे दिसून येत आहे. त्यामुळे या हत्येमधील जेवढे गुन्हेगार व गुन्हेगारांचा नेता धनंजय मुंडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच धनंजय मुंडे यांची मंत्री मंडळातुन हकालपट्टी करण्यात यावी व सदरील गुन्हांचा तपास जलद गतीने व्हावा, असं या पत्रात नमूद करण्यात आलंय.

अर्थखाते अजितदादांकड!, मात्र खर्चाचे अधिकार एकनाथ शिंदेंकडे! - काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल (21 डिसेंबर)ला जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी), तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. 
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे दुसऱ्या स्थानावर आहे. मंत्रिमंडळात भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे महत्वाचे खाती आहेत. नगरविकास,गृहनिर्माण,सार्वजनिक बांधकाम खाती तसेच एमएमआरडी, सिडको, एमएसआरडीएवर एकनाथ शिंदे यांचाच ताबा राहणार आहे. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही एकनाथ शिंदेंच्या हाती असणार आहे. अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्यातरी खर्चाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे राहणार आहे. 

Friday, December 20, 2024

मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळांनंतर आता अजितदादांचा आणखी एक आमदार नाराज- अधिवेशन सोडून मतदारसंघात परतले...

वेध माझा ऑनलाइन।
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. कारण, अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिमंडळात स्थान नाही. त्यामुळे, भुजबळांनी जाहीरपणे अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली असून पुढील काही दिवसांत आपला निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, भुजबळांसह सर्वच राजकीय पक्षात अनेक आमदार मंत्रि‍पदासाठी आस लावून बसले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज झाले आहेत. त्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही नाराजी उघड करत अधिवेशन सोडून मतदारसंघ गाठला आहे. 

हिवाळी अधिवेशन सोडून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मतदार संघात परतले आहेत. अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्यानं बनसोडे नाराज आहेत. नागपुरात 39 आमदारांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अधिवेशनात माझं मन लागत नव्हतं. त्यातच, माझ्या घरी नात्यात दुःखद घटना घडली, म्हणून मी अधिवेशन सोडून परतलो, असे अण्ण बनसोडे यांनी म्हटलं आहे मात्र, नागपूरहून परत आलेले नाराज अण्णा बनसोडे पुन्हा अधिवेशनात परतले नाहीत. मला मंत्रिपद भेटेल ही अपेक्षा आणि विश्वासही होता, मी तिसऱ्यांदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भरगोस मतांनी विजयी झालो आहे. त्यामुळे, अजित दादा मला मंत्रि‍पद देतील असा विश्वास होता. मात्र, भ्रमनिराश झाला असला तरीही दादा हा शब्द नक्कीच पाळतील असा मला विश्वास असल्याचंही त्यांनी म्हटले. 

Tuesday, December 17, 2024

डॉ अतुल भोसले आमदार झाले... आणि...सामाजिक कार्यकर्ते ओंकार मुळेंनी राबवला अनोखा उपक्रम; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
 डॉ अतुल भोसले यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मधून मोठा विजय प्राप्त झाला आणि ते आमदार झाले त्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते ओंकार मुळे यांच्या वतीने मतदारांचे घरोघरी जाऊन पेढे वाटून आभार मानण्यात आले

सामाजिक कार्यकर्ते ओमकार मुळे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांचे जवळचे समर्थक मानले जातात.कराड येथील प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदार बंधू-भगिनींनी विधानसभेच्या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा यांना बहुमताने आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वाप्रती पेढे व आभार पत्र देऊन ओंकार मुळे याच्या वतीने कृतज्ञाता व्यक्त करण्यात आली  ...दरम्यान निवडणुकीचे मतदान पार पडताच उमेदवार असो वा कार्यकर्ते हे सर्वजण आपापल्या कामात गुंतून जातात... मात्र मतदान पार पडल्यावर व त्याचा निकाल लागल्यानंतर अशा प्रकारे मतदारांचे आभार मानण्याच्या पद्धतीने या प्रभागातील मतदार भारावून गेल्याचे दिसले... ओंकार मुळे यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

यावेळी ओमकार मुळे मित्रपरिवार ,राजेंद्रसिंह यादव मित्रपरिवारासह अनेक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

छगन भुजबळ यांना पक्षांतराची पहिली ऑफर ; कोणी दिली? वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाइन।
छगनराव तुम्हाला खूप उशिरा लक्षात आले की या लोकांची पद्धतच ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या विरोधात काम करण्याची आहे. छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालाय. छगन भुजबळ तुम्ही एकदा पुन्हा विचार करा की कोणासोबत राहायचं आणि कसं राहायचं. छगन भुजबळ सारख्या व्यक्ती आमच्या सोबत काम करायला तयार असेल तर आम्ही त्याचा स्वागत करू. अशी खुली ऑफर देत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर दिली आहे.

जरांगे म्हणाले.. 25 जानेवारी पासून पुन्हा उपोषण करणार ;

वेध माझा ऑनलाइन।
एकीकडे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदनात उतरवले आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा 15 ते 16 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं. 25 जानेवारीपासून पुन्हा अंतरवालीला आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजी ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल 15 डिसेंबरला पार पडला आहे. यावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु, या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे.

महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजी :
मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होण्यापूर्वीच मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील नाराज झाले आहेत. अशातच आता भाजपमधील नाराजी देखील समोर आली आहे. भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहे.याशिवाय महायुतीमधील घटकपक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी देखील मंत्रिमंडळात पक्षाला स्थान न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Monday, December 16, 2024

भुजबळ राज्यपाल होणार? एका मोठ्या नेत्यांचा दावा;

वेध माझा ऑनलाइन।
नागपूरमध्ये राजभवन येथे रविवारी, 15 डिसेंबररोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीत अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलंय.

भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर त्यांचे समर्थक देखील प्रचंड संतापले आहेत.छगन भुजबळ यांनी देखील माध्यमांशी बोलताना उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. मंत्रिपद कितीवेळा आलं आणि किती वेळा गेलं, तरी भुजबळ संपला नाही, असं म्हणत भुजबळ यांनी काल संताप व्यक्त केला होता.

छगन भुजबळ राज्यपाल बनणार?
छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवण्यात आले?, असा प्रश्न कालपासून केला जातोय. त्यातच भाजप आमदाराने केलेल्या एका दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाणार असल्याचा दावा भाजपा आमदाराने केलाय.

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला नाही. त्यांना राज्यपाल केले जाणार आहे, असा दावा भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलाय.तसंच मंत्रीपद मिळालं नाही म्हणून कुणीही नाराज झाले नाही, असंही आशिष देशमुख म्हणाले. आता देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.


दरम्यान, काल माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं नाव घेत मोठं वक्तव्य केलं होतं. मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, असं संतापून भुजबळ म्हणाले होते. मी ओबीसीची लढाई लढलो. त्यामुळे सर्व ओबीसी एकत्र आले आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. अर्थात त्यात लाडकी बहीणचा वाटा आहे. परंतु ओबीसींचा देखील पाठिंबा आहे, असंही भुजबळ म्हणाले होते.

छगन भुजबळ म्हणाले; माझं मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधावे लागेल ...

वेध माझा ऑनलाइन
नागपूरमध्ये राजभवन येथे 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीत अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच आता छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना मोठे आवाहन केलं आहे.

याशिवाय राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मी पुढचा विचार करणार आहे. तसेच लोकशाहीत तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कारण राज्यात कुठेही वातावरण बिघडू नका असं मी सांगितल आहे. तसेच मला मंत्रिपद कोणी नाकारलं? हे शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. तसेच माझं मंत्रिपद कोणी नाकारलं हे देखील शोधावं लागणार आहे.तसेच प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रमुख घेत असतो. त्यामुळे भाजपचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात, तर शिवसेनेचा निर्णय हा एकनाथ शिंदे घेतात. अगदी त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात असे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, प्रत्येकाला मंत्रिपद हवं असतं. परंतु, प्रश्न मंत्रिपदाचा नाही, मात्र ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे. तसेच मला त्यांनीच लोकसभेत उभे राहा असे सांगितलं होतं. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील सांगितले आहे. तर सगळी तयारी झाली सर्व लोक आले आहेत. तर त्यांना आठ पंधरा दिवसात नाव जाहीर करायचे होते. मात्र त्यांनी एक महिना लावला मी माघार घेतली असं देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Sunday, December 15, 2024

सातारा आणि पुणे जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपद मिळणार! डॉ अतुल भोसलेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता ?

वेध माझा ऑनलाइन।
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी आज पार पडणार आहे. त्यामुळे सकाळपासून संभाव्य मंत्र्यांना मंत्रिपदासाठी फोनाफोनी होत आहे. दरम्यान भाजपकडून मंत्रीपदासाठी 19 जणांना फोन करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 10 जणांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 11 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. या यादीमध्ये अनेक मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे.  तब्बल 19 चेहरे सरकारमध्ये असणार आहेत. त्यामुळे मोठी खांदेपालट महायुती सरकारमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, मंत्रीपदामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाने बाजी मारली असून पश्चिम महाराष्ट्रातील 10 मंत्री महायुती सरकारमध्ये असणार आहेत. विदर्भमधील तबल नऊ मंत्री असणार आहेत. दरम्यान सातारा आणि पुण्यातून सर्वाधिक म्हणजे4-4 मंत्री असणार आहेत अशी माहिती आहे त्यामुळे डॉ अतुल भोसले याना देेखील संधी मिळणार अशी शक्यता आहे

ठाणे, कोकण विभागामधून आठ मंत्री असतील, तर उत्तर महाराष्ट्रातून सात मंत्री असणार आहेत. त्यामुळे म्हणजे एक प्रकारे या मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचे प्राबल्य असणार आहे. मराठवाड्यातून सहा आणि मुंबईतील फक्त दोन मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये तब्बल 16 जिल्ह्यातील पाटी कोरी आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांना मंत्रीपद मिळालेले नाही, तर मराठवाडामधील चार जिल्ह्यांना मंत्रीपदापासून मुकावं लागलं आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण 42 मंत्री आहेत. यामधील सर्व मंत्री हे 16 जिल्ह्यांमधून येतात. त्यामध्ये  सातारा आणि पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चार चार मंत्री आहेत. 


Thursday, December 12, 2024

शिवेंद्रसिंहराजे भोसले होणार साताऱ्याचे पालकमंत्री!

वेध माझा ऑनलाइन
विधानसभेच्या निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्वाधिक जागा मिळवून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. सातारा जावळी भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ही विक्रमी मतांनी निवडून येऊन पाचव्यांदा विधानसभेत गेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे व शिवेंद्रराजे यांनी एकत्र येऊन मनोमिलन केले. दोघांनीही जिल्ह्यात सर्व उमेदवारांचा प्रचार करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्लाला सुरुंग लावून भाजपसह महायुतीला मोठे यश मिळवून दिले आहे. 

विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्रि‍पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे.गेले कित्येक वर्षापासून सातारा तालुका हा मंत्री पदापासून वंचित आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही उदयनराजे यांनी स्वतःहून केंद्रीय मंत्रीपद नाकारले होते.परंतु खासदार उदयनराजे स्वतः शिवेंद्रराजे यांच्या मंत्री पदासाठी आग्रही आहेत.उदयनराजे मुंबई येथे जाऊन महायुती मधील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. शिवेंद्रराजे यांना कॅबिनेट मंत्रीपदासहित सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे.दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा सोपवल्यामुळे नवीन सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असून आजच शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव मंत्रिमंडळामध्ये निश्चित होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि जयवंत शुगर्सची ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने सन २०२४-२५ या ऊसगाळप हंगामासाठी येणार्‍या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे.

शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जयवंत शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन, शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा गळीत हंगाम निवडणुकांच्या धामधुमीमुळे उशिरा सुरु झाला. अशावेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना ऊसाला किती दर देणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अशावेळी कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सने सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडत, यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.

कृष्णा कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामास २५ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून, आजअखेर १७ दिवसांत १ लाख ८७ हजार ८०० मेट्रीक टन गाळप झाले असून, १ लाख ८१ हजार ६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. तसेच जयवंत शुगर्सच्या यंदाच्या गळीत हंगामासही २५ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून, आजअखेर १७ दिवसांत ९४ हजार २२० मेट्रीक टन गाळप झाले असून, ७७ हजार ६५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी पिकविलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

कराडच्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार ; सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर -

वेध माझा ऑनलाइन ।
कराड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) परिसराचे सुशोभीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी कराडकर नागरिक व शिवप्रेमी करत होते. त्याची दखल घेऊन राजेंद्रसिंह यादव यांनी याबाबत दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दत्त चौक परिसराच्या सुशोभीकरणाची गरज पटवून दिली होती. त्यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्हा नियोजन समितीमधून या कामासाठी विधानसभा आचारसंहितेपूर्वी निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. 
दत्त चौक परिसरातील रस्त्यांच्या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे आयलँड व पुतळ्यासमोरील त्रिकोणी आयलँडची उंची कमी झाली होती. नव्याने होणाऱ्या सुशोभीकरणात या दोन्ही आयलँडची उंची वाढवण्यात येणार आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आयलँडचे मजबुतीकरण व सुशोभीकरणासाठी १ कोटी ४५ लाख तर पुतळ्यासमोरील त्रिकोणी आयलँडच्या मजबुतीकरण व सुशोभीकरणासाठी २ कोटी ६८ लाख असा सुमारे ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे तर नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा नव्याने बांधण्यासाठी सुमारे 73 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही सर्व कामे सध्या निविदा प्रक्रियेत आहेत. या कामासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 
पुतळ्याच्या आयलँडची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्याचे आयलँड काढून या ठिकाणी दगडी आयलँड उभे करण्यात येणार असून त्यास बुरुजांचा लुक देण्यात येणार आहे. पुतळ्याच्या पाठीमागे मोठा जरीपटका असणार आहे. येथील विद्युत व्यवस्था आकर्षक करण्यात येणार आहे. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी लिफ्ट असणार आहे. सध्या असणारा पुतळा काढून यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये ठेवण्यात येणार असून तेथे या पुतळ्याचे पॉलिश व अन्य कामे करण्यात येणार आहेत. सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर हा पुतळा पुर्ववत नवीन चबुतऱ्यावर बसवण्यात येणार आहे. नवीन चबुतरा जमिनीत 14 फूट खोल खड्डा काढून मजबुतीने बांधण्यात येणार आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असणारा त्रिकोणी आयलँड पूर्णपणे काढून येथे नव्याने उंचीचे दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. त्यास किल्ल्याचे स्वरूप देण्यात येणार आहे.  या पुतळ्यावर मावळे, हत्ती, आबदागिरी असे फायबरचे पुतळे असणार आहेत.
 
सध्या या कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसात या सर्व कामांना सुरुवात होणार आहे. नुकतीच राजेंद्रसिह यादव यांनी नगरपालिकेचे नगर अभियंता गायकवाड यांच्या समवेत पुतळा परिसराची पाहणी केली. पुतळा स्थलांतर व इतर कामांबाबत सूचना केल्या आहेत.

शिवतीर्थाचे सुशोभीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक अशा पद्धतीने या परिसराला लुक देण्याचा प्रयत्न आहे. मुख्य आयलँडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व त्यापुढील त्रिकोणी आयलँडमध्ये फायबरचे मावळे, हत्ती, आबदागिरी असा शाही मिरवणुकीचा लुक दत्त चौक परिसराला येणार आहे. त्या दृष्टीने हे सुशोभीकरण करण्यात येत असे आहे, अशी माहिती राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

शरद पवार यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा -

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय नेते, खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा आज ८४ वा वाढदिवस, सातारा येथील पक्ष कार्यालयात राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय श्री.बाळासाहेब पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. तसेच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध सेलच्या वतीने जिल्ह्यातील 84 जेष्ठ नागरिकांचा सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 84 व्यक्तींचा सत्कार, रक्तदान शिबिरे आदी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे, शफिक शेख, सचिन जाधव, विजय बोबडे, बाळासाहेब शिंदे, मकरंद बोडके, स्वप्नील वाघमारे, विजय चौधरी, ॲड.रणजितसिंह जगदाळे, अमोल पाटोळे, सुरेशराव शिंदे, सागर झनझने इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृष्णा कारखाना १ कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती करणार : पहिला टँकर रवाना ; चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पूजन

वेध माझा ऑनलाइन।
कृष्णा कारखाना नेहमीच साखर उद्योगात होत असलेल्या बदलांचा स्विकार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतो. कारखान्यात या गळीत हंगामात शुगर सिरपपासून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करून, टँकर ऑईल कंपनीकडे रवाना करण्यात आला. या वर्षीही कृष्णा कारखान्याने १ कोटी  लिटर्स इथेनॉलची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या दूरदृष्टीतून कारखाना कार्यस्थळावर शेतकरी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून साखरेसह पूरक उद्योगांची जोड देऊन, सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापन करत आहे. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेले सकारात्मक धोरण, इथेनॉलला मिळणारा योग्य दर लक्षात घेऊन, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने शुगर सिरपसपासून इथेनॉल निर्मिती सुरू केली.  यावर्षी १ कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादन निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे डी मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक महावीर घोडके, माजी संचालक गिरीश पाटील, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील तरुणांचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संपर्क : NIA ने तिघांना उचललं ;

वेध माझा ऑनलाइन।
अमरावती भिवंडी छत्रपती संभाजीनगरसह 17 शहरांमध्ये एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकलेत. एनआयने अमरावतीच्या छायानगर मधून एकाला आणि भिवंडीच्या खोणी खार पाडीमधून दोघेजण ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेले 3 तरुण पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. 

याबाबतची माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास भागात असलेल्या एनआयए ने 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलंय. भिवंडीतील खोणी खार पाड ग्रामपंचायत परिसरातून 45 वर्षीय कामरान अन्सारीला ताब्यात घेण्यात आलंय. याशिवाय अमरावतीतील छायानगरमधून 35 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या एनआयएकडून तिघांची कसून चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांचा देशविरोधी कारवाया करणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय आहे. 

दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर;केजरीवाल सरकार राबवणार लाडकी बहीण योजना ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा करिश्मा पाहायला मिळाला. यापूर्वी, मध्य प्रदेश सरकारनेही लाडली बहनाच्या माध्यमातून महिला वर्गास दरमहा 1200 रुपये देण्याची योजना सुरू केली होती. अर्थातच, राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार स्थापन झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, महिला मतदार हा गेमचेंजिंग फॅक्टर ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या अगोदरच राजधानी दिल्लीतील केजरीवाल सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. येथील लाडक्या बहिणींना म्हणजे प्रत्येक महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्लीत पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली सरकारने महत्वाकांक्षी आणि मोठ्या योजनांची घोषणा केली. त्यामध्ये, महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची सर्वात मोठी घोषणा केजरीवाल सरकारने केली आहे

आता... भाजपचा अजितदादांच्या अर्थखात्यावर डोळा ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ तर घेतली, पण अद्याप खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब मात्र झाल्याचं दिसत नाही. महत्त्वाची खाती आपापल्या पदरात पाडून घेण्यासाठी तीनही पक्षांची चढाओढ सुरू असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. एकनाथ शिंदे यांना हवी असलेली गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती तसेच दादांकडील अर्थखातं आता भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. त्या बदल्यात या दोघांना इतर खाती दिली जाणार असल्याची चर्चा आहे

विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष बनला आहे. तसेच त्यांना अपक्ष आणि छोट्या पक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे अर्थ, गृह आणि नगरविकास खाती ही भाजपकडेच राहावीत, ती राष्ट्रवादी वा शिंदेंच्या शिवसेनेला देऊ नयेत असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. सोमवार, 16 डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या आधी म्हणजे 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे.

पुण्यात लायटरचा स्फोट ; पोलीस कर्मचारी गंभिर ;

वेध माझा ऑनलाइन।
धूम्रपान करण्यासाठी विशेषतः सिगारेट ओढण्यासाठी सध्या लायटर्सचा सर्रास वापर केला जातो. पुण्यासारख्या शहरात हा वापर सहजतेने केला जातो. त्यामुळेच पान टपरी असो किंवा चहा-नाश्त्याचा गाडा लायटरचा वापर अनेकदा गॅस पेटवण्यासाठी देखील केला जातो. मात्र, हाच प्रकार अंगलट आल्याने एका चहा स्टॉलवालवर स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यास गंभीर दुखापत झाली असून पुण्यातील शिवाजी नगर परिसरात हा अपघात घडला

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीन समोरील एका चहा स्टॉलवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. येथील गॅस शेगडीवर ठेवलेला लायटर गरम होऊन त्याचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. येथील वडापावच्या गाडीवर दुपारी कर्मचारी जेवायला आले असता ही घटना घडली. त्यावेळी, झालेल्या आगीच्या भडक्यात पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांच्या हाताला आणि चेहऱ्याला भाजल्याची माहिती आहे.

लाडकी बहीण योजनेतील सोळा लाख अर्जांची होणार छाननी होणार ;

वेध माझा ऑनलाइन
लाडकी बहीण योजनेतील सोळा लाख अर्जांची होणार छाननी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आचारसंहितेच्या आधी 16 लाखांची छाननी बाकी होती. ती आता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे. या सोळा लाख अर्जांपैकी पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार आहे. 

आतापर्यंत राज्यातील दोन कोटी 34 लाख लाभार्थ्यांना लाडकी बहिणी योजनेचा फायदा मिळाला आहे. यात सोळा लाख अर्जांची छाननी झाल्यानंतर पुन्हा एकदा संख्या वाढणार आहे. निवडणूक काळात प्रशासन व्यस्त असल्याने या सोळा लाख अर्जांची छाननी बाकी होती. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नव्हता. आता या सर्व अर्जांची छाननी करून या लाभार्थ्यांना  लाभ दिला जाणार आहे. 
लाडक्या बहिण योजनेवरुन वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत असं अदिती तटकरे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या योजनेसंदर्भात कोणत्याही लेखी पद्धतीच्या सूचना, कोणतेही आदेश, शासन निर्णय, निकष बदल विभागाने काढलेले नाहीत. विनाकारण काही अफवा पसरवल्या जात आहेत. लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी कोणतीही मनामध्ये शंका ठेवू नये. लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने माता-भगिनी साठी काढलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वीरित्या चालू राहणार आहे.

Saturday, December 7, 2024

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांची प्रकृती बिघडली ; लिलावती रुग्णालयात दाखल

वेध माझा ऑनलाइन
बॉलिवूड सिनेसृष्टीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्याविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सुभाष घई यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना बुधवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि वारंवार चक्कर देखील येत होती. सध्या त्यांच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 

 
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष घई यांच्यावर आयसीयूमध्ये दाखल असलेल्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चौहान, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तसेच सुभाष घई यांची प्रकृती  पूर्वीपेक्षा चांगली असून त्यांना एका दिवसांत आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात येणार आहे.

शरद पवार म्हणाले ; आम्हाला विधानसभा निवडणुकीत मतं 72 लाख, मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आले. अजित पवारांच्या गटाला 58 लाख मतं तर त्यांचे 41 उमेदवार निवडून आलेत.


वेध माझा ऑनलाइन।
 "शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80 लाख मत मिळालेल्या पक्षाचे 15 तर 79 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 57 आमदार निवडून येतात. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


शरद पवार म्हणाले, 
विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं पण निकाल अनुकूल लागला नाही. ईव्हीएमबाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही, त्यामुळं यावर आताच बोलता येणार नाही. महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. काँग्रेस पेक्षा शिंदे यांना मतं कमी आहेत पण त्यांचे जास्त आमदार निवडून आलेत. ईव्हीएम बाबत शंका घेण्याचं कारण नाही. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झाला आहे. पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत, असंही पवार यांनी सांगितलं. 

राहुल नार्वेकर पुन्हा होणार विधानसभा अध्यक्ष

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार आहे. राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे आता राहुल नार्वेकर  हेच विधानसभा अध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Friday, December 6, 2024

Tuesday, December 3, 2024

गृहखाते भाजपकडेच , त्याऐवजी भाजपने एकनाथ शिंदेंना दिले कोणते पर्याय?

वेधमाझा ऑनलाइन।
शपथविधीचं काऊंटडाऊन सुरू झालंय आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला गाठत एकनाथ शिंदे  यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांशिवाय इतर कुणीच नव्हतं. जवळपास 40 ते 45 मिनिटं ही बैठक चालली. या बैठकीनंतर गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असले तरी हे खातं देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनूसार समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काल झालेल्या बैठकीत देखील मंत्रिपदावर देखील अंतिम तोडगा निघाला नसल्याचं कळतंय. त्यामुळे आज पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे. गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहावे, यासाठी भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदासह नगरविकास खात्यासह अजून एक कोणतं तरी खातं घ्यावं, असा प्रस्वात भाजपकडून ठेवण्यात आल्याचं कळतंय. आज पुन्हा यावर एक बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या शपथविधी असताना आजतरी मंत्रि‍पदाचा प्रश्न सुटणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब आहे. भाजप केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल

उद्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार;

वेधमाझा ऑनलाइन 
भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर आज महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून, तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. उद्या आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.


उद्या आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे. घटकपक्षांना मंत्र्यांच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन काल मुंबईत दाखल झाल्या आहेत. हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतील. महायुतीत एकी आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी ही भेट असेल असं बोललं जातंय.

Sunday, December 1, 2024

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसच ! भाजपाच्या वरिष्ठ नेत्याची 'पीटीआय'ला माहिती ;

वेध माझा ऑनलाइन: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं रविवारी रात्री दिली.
दरम्यान नव्या महायुती सरकारचा शपथविधी समारंभ 5 डिसेंबरला संध्याकाळी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. दुसरा कार्यकाळ काही दिवस टिकला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. आता त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी येणं जवळपास निश्चित झाल्याची माहिती भाजपाच्या एका नेत्यानं 'पीटीआय'ला दिली आहे.

उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जास्त बहुमत मिळालं असत; रावसाहेब दानवे ,

वेध माझा ऑनलाइन।
शिवसेना जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली नसती तर 14 ते 19 पर्यंत सारखाच कारभार झाला असता आणि त्या कारभाराच्या आधारावर याहून अधिक जागा आल्या असत्या.  उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जेवढं बहुमत मिळाले त्यापेक्षा जास्त बहुमत मिळालं असतं", असं वक्तव्य भाजप ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वाहिनीशी  बोलताना केलं होतं. आता दानवेंच्या या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 



गुलाबराव पाटील म्हणाले,  उद्धव ठाकरे आमच्या सोबत असते तर आमच्या अजून जागा आल्या असत्या अस रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या विधानांवर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांचं हे मत जर देवेंद्र फडणीस यांना मान्य असेल तर आम्हालाही मान्य असणार आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले..."या' कारणासाठी मी गावी आलो... काय म्हणाले...?

वेध माझा ऑनलाइन
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली आहे. अशातच आता 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा येथील दरेगाव या मुळगावी गेल्यानं राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली होती. यावेळी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची देखील चर्चा देखील सुरू आहे. मात्र आता या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? :;
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे दरेगावला का गेले? तसेच ते नाराज आहेत का? असा सवाल वारंवार उपस्थित करण्यात येत होता. मात्र संदर्भात एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.यावेळी एकनाथ शिंदे म्हणले की, मी नेहमी गावी येत असतो. मी कॉमन मॅन म्हणून देखील काम केलं आहे. त्यामुळे मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर आनंद होतो. तसेच आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद देखील मिळतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांचा विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांचा मत पडताळणीसाठी अर्ज;

वेध माझा ऑनलाइन
लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि पवार विरूद्ध अशी लढत झाली. या बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं होतं.बारामती मतदारसंघात पवार विरूद्ध पवार लढतीत अजित पवारांचा विक्रमी मतांनी विजय झाला तर युगेंद्र पवारांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.

फेरमतमोजणीसाठी लागणारी रक्कमसुद्धा भरली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पाच टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार आहे, असे युगेंद्र पवार

 युगेंद्र पवारांचा मत पडताळणीसाठी अर्ज
निवडणुकीत अजित पवारांना 1,96,640 तर युगेंद्र पवारांना 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत.युगेंद्र पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. पुणे जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील 11 पराभूत उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.

11 पराभूत उमेदवारांचा अर्ज
शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे.

अमावस्येला मुख्यमंत्री आपल्या गावी का जातात? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल ; मुख्यमंत्र्यांनी दीपक केसरकर याना भेट नाकारली ... ते गेटवरूनच मागे परतले ...

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे यांच्या शरीराचे तापमान हे 105° असून नुकतेच त्यांना सलाईन लावण्यात आली होती. प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे काल घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे विविध चर्चांना देखील उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रिपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तेच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेले. 

त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. 
तसेच बहुमत मिळूनही लोक राजभवनला जाण्याऐवजी अमावस्येच्या दिवशी गावाला का जातात?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगवाला. 

दरम्यान शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला काल त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने दीपक केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. त्यानंतर दीपक केसरकर मुंबईकडे रवाना झाले.