पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आलेल्या निकालानंतर महायुतीच्या घटक पक्षांनी फसवल्याची कबुली मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीय. महायुतीच्या अनेक घटकांनी काही गोष्टी केल्या आहेत, असं म्हणत गोरे यांनी “मौका सबको मिलता है” असं विधान केलंय. मागील निवडणुकीत दोन्ही जागा गमावल्यानंतर यंदा एक जागा मिळवण्यात यश आलं, तर एका जागेवर अपयश स्वीकारावं लागलं, असंही त्यांनी म्हटलंय. चांगलं वातावरण असतानाही असा निकाल का लागला, याचा विचार करणार असल्याचं जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलंय.
जयकुमार गोरे म्हणाले
जनतेने दिलेला कौल मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे, असं म्हणत त्यांनी निकाल स्वीकारल्याचं सांगितलं. चांगलं वातावरण असतानाही एका जागेवर अपयश का आलं, याची कारणं शोधणार असल्याचं गोरे यांनी स्पष्ट केलंय. नेमक्या कोणत्या कारणांमुळे असा निकाल लागला, याचा सविस्तर विचार करून खात्री करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
No comments:
Post a Comment