Saturday, September 12, 2020

सह्याद्री साखर कारखाना 150 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभे करणार - जशराज पाटील

कराड
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार 150 बेडचे सुसज्ज असे covid-19 सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात शासनाच्या आरोग्य विभागाकडे सदरचे सेंटर सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवानेते जशराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी  कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी. आर. यादव, सल्लागार एच. टी. देसाई, सिव्हिल इंजिनियर  वाय. जे. खंडागळे, फायनान्सियल ॲडव्हायझर जी. व्ही. पिसाळ, व्ही. जे. शेलार, आर. जी. तांबे परचेस ऑफिसर जे.डी. घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार covid-19 रुग्णांच्या सेवेकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री कारखान्याच्या कार्यस्थळावर  सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये सर्व सुविधांनीयुक्त 50 ऑक्सिजन बेड, आणि 100  बेडचे विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय "सह्याद्री" घेतला आहे.  सोमवारीच हे सेंटर शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती युवानेते जशराज पाटील यांनी दिली.

जशराज पाटील पुढे म्हणाले की, मार्चपासून कोरोना महामारीची सत्र सुरुवातीला शहरी विभागात सुरू होते. नंतर त्याचा फैलाव ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या पाहता शासकीय व खाजगी दवाखाने हाऊसफुल झाले. कोविंड सेंटरला जागा कमी पडू लागल्या. अनेक रुग्णांची जागेअभावी गैरसोयीच्या तक्रारही पुढे आल्या. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच साखर कारखान्यांनी कोविंड सेंटर उभारावे, असे आव्हान केले होते. त्यानुसार सहकार पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी  संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही सुरू केली. सह्याद्री  कारखान्या  स्थळावर सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे. सध्या  लॉकडॉऊनमुळे कॉलेज बंद असले तरी, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. 

याच इमारतीत या कोविंड सेंटरमध्ये शंभर रुग्णांकरिता विलगीकरण कक्ष  तयार करण्यात आला असून 50 रुग्णांच्याकरिता ऑक्सिजन बेडची सर्व सुविधासह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सह्याद्री कारखान्याकडून रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी, साबण, टूथब्रश आणि वाफ घेण्यासाठी वाफेची भांडी पुरवण्यात येणार आहेत. या रुग्णांच्यावर उपचार, देखभाल करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना राहण्याची ही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांनीयुक्त कोविंड सेंटरच्या कामाचीची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील केली असून त्यांनी दिलेल्या आवश्यक त्या सूचनांची लवकरात लवकर पूर्तता करून घेत सोमवारी हे कोविंड सेंटर शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे जशराज पाटील यांनी सांगितले.

 संचालक जशराज पाटील पुढे म्हणाले की, सह्याद्री कारखान्याने सामाजिक बांधिलकीतून शासनाच्या हवामानानुसार यापूर्वीच सह्याद्री हॅन्ड सॅनिटायझरचि निर्मिती एप्रिलमध्ये सुरू करून ग्रामपंचायती, शाळा-कॉलेज, शासकीय कार्यालय आदींना ना नफा ना तोटा या तत्त्वावर दिली आहे. आशा सेविका, पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी 2000 लिटर्स सह्याद्री हँड सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. विशेषता सह्याद्री कारखान्याचा मागील गळीत हंगाम हा कोरोना काळ असतानाही विशेष खबरदारी घेत विनातक्रार यशस्वी झाला. हंगामाच्या अखेरीस ऊसतोड मजूरांकरिता हॅन्ड सॅनिटायझर तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे कीटही उपलब्ध करून दिले होते. हंगाम समाप्तीनंतर मजुरांची सर्व वैद्यकीय तपासणी करून मजुरांना त्यांच्या राहत्या गावी पोहोचवण्याची व्यवस्था कारखाना व्यवस्थापनाने केली होती.

Covid-19 चा वाढता प्रसार रोखण्याकरता सर्वांनी आरोग्य विभागाचे नियम पाळण्याची गरज असून मास्क, सँनिटारझनचा सर्रास वापर करून सोशल डिस्टन्स पाळावे. या आजाराविषयी अनाठायी भीती बाळगू नये, वेळेत उपचार घेतल्यास त्यातून मुक्त होता येते. तेव्हा  जेणेकरून कोविंड सेंटरमध्ये उपचार द्यायला लागू नये. यासाठी स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. असे आवाहन संचालक जशराज पाटील यांनी केले.


No comments:

Post a Comment