Saturday, September 12, 2020

आज 630 जणांना दिला डिस्चार्ज

630 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1124 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 630  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1124 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *1124 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 66,उपजिल्हा रुग्णालय कराड 22, उपजिल्हा रुग्णालय फलटण 74, कोरेगाव 131, वाई 153, खंडाळा 55, रायगांव 88,  पानमळेवाडी 47, मायणी 162, महाबळेश्वर 50, पाटण 12, दहिवडी 38, खावली 35, तळमावले 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 158 असे एकूण 1124जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --55914
एकूण बाधित --  22863 
घरी सोडण्यात आलेले --- 14567  
मृत्यू --  624
उपचारार्थ रुग्ण --7672  
00000

No comments:

Post a Comment