Tuesday, September 8, 2020

पार्ले येथील कोरोना सेंटरला रोटरी क्लब ऑफ कराड कडून औषध पुरवठा ; डॉ. राहुल फासेंनी दिले आर्थिक योगदान...

कराड
रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने पार्ले येथील शासकीय कोविड केअर सेंटर या हॉस्पिटलमधील रुग्णांना अत्यंत गरजेची औषधे  वाटप केली.
१८० रुग्णांना तब्बल महिनाभर पुरतील एवढी औषधे त्यामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन D 3 चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कोविड केअर सेंटरच्या प्रमुख शासकीय अधिकारी डॉ शुभलक्ष्मी जोशी आणि पार्ले गावचे तलाठी श्री सावंत व इतर सरकारी कर्मचारी  उपस्थित होते व रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने क्लबचे अध्यक्ष रो गजानन माने, सचिव रो डॉ शेखर कोगणुळकर, रो डॉ राहुल फासे, रो डॉ मनोज जोशी, रो किरण जाधव, प्रबोध पुरोहित, रो जगदीश वाघ, रो चंद्रकुमार डांगे, रो बद्रीनाथ धस्के आदी उपस्थित होते.
हा प्रकल्प रो डॉ. राहुल फासे यांच्या वैयक्तिक आर्थिक मदती तून रोटरी क्लब ऑफ कराड ने राबविला.

No comments:

Post a Comment