सातारा दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 186 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 617 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कराड तालुक्यातील 71, खटाव तालुक्यातील 1, महाबळेश्वर तालुक्यातील 28, माण तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 2, फलटण तालुक्यातील 21, सातारा तालुक्यातील 59 असे एकूण 186 नागरिकांचा समावेश आहे.
*617 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण 43, वाई 45, खंडाळा 77, रायगांव 56, पानमळेवाडी 80, मायणी 75, महाबळेश्वर 45, दहिवडी 24, खावली 20, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 143 असे एकूण 617 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 45723
एकूण बाधित -- 14658
घरी सोडण्यात आलेले --- 7778
मृत्यू -- 414
उपचारार्थ रुग्ण -- 6466
0000
No comments:
Post a Comment