येथील सोमवार पेठेतील रहिवासी व शहरातील एका प्रथितयश बँकेत चांगल्या पोस्टवर नोकरी करणारे आणि ती नोकरी सांभाळत समाजासाठी अहोरात्र झटणारे राहुल लक्ष्मण कुंभार हे कोविड योद्धे म्हणून शहरातील कोरोना रुग्णांची सध्या अहोरात्र सेवा अनेकप्रकारे करताना दिसत आहेत.माजी नगरसेवक विलास कुंभार यांचे ते पुतणे आहेत.तर विद्यमान नगरसेविका अंजली कुंभार यांचे ते दीर होत.
सध्या अनेकजण कोरोनाशी दोन हात करत स्वतः व इतरांना जगण्याचे बळ देताना दिसत आहेत.समाजाशी आपली असणारी बांधीलकी जपण्याचा त्यामागील उदात्त हेतू या कोरोनाशी लढणाऱ्यां योध्याचा आहे. अनेक तरुण या लोकसेवेसाठी जीवाची पर्वा न करता पुढे सरसावलेले दिसतात. येथील सोमवार पेठेतील राहुल कुंभार हेही त्यापैकीच एक आहेत. कोरोनाच्या पहिल्या लॉक डाऊन पासून ते जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी गरजूंना अनेक प्रकारे मदत करत आपली बांधीलकी जपली आहे. स्वतः एका प्रथितयश बँकेत नोकरी करत ते ही लोकसेवा कोविड योद्धा म्हणून मोठ्या धाडसाने करत आहेत. स्वतः सॅनिटायझेशन पंप खरेदी करून शहरात ज्या ठिकाणी रुग्ण आहेत अशा अनेक अपार्टमेंट्स त्यांनी स्वतः सॅनिटायझ केल्या आहेत.आजही त्यांची ही सेवा सुरूच आहे.
कराड मध्ये पोर्टेबल oxigen मशीन घेऊन आत्तापर्यंत ३०/४० रूग्णांना त्यांनी श्वास देत जगण्याचे नव्याने बळ दिले आहे.रात्री अपरात्री ज्यावेळी फोन येईल त्या वेळी त्याठिकाणी जाऊन ते कोविड रुग्णाला oxigen ची सेवा सातत्याने देत आहेत. खासदार श्रीनिवास पाटील याना कराडात कोबीड केअर सेंटर व्हावे या मागणीकरिता येथील गब्बर ग्रुपचा सदस्य या नात्याने त्यांनी निवेदनदेखील दिले आहे. केवळ शहरातच नव्हे तर शहराबाहेर, म्हणजे सांगली,पुणे येथेही गरजू रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात.त्यांनी अनेक रुग्णाना यापूर्वी त्याठिकाणी बेड उपलब्ध करून दिले आहेत. बँकेतली नोकरी सांभाळत राहुल कुंभार लोकसेवेची बांधिलकी कोविड योद्धा म्हणून यशस्वीपणे पार पाडत आहेत, त्याबद्दल त्यांचे शहरातून खूप कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment