येथील चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लिमिटेड शाखा,कराड यांचे वतीने नगरपरिषदेस ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आली.पालिकेस 165 वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्ताने नगरसेविका प्रियांका यादव,समाजीक कार्यकर्ते प्रीतम यादव यांनी चंदुकाका सराफ याना सध्या लोकांना गरजेची असणारी ऑक्सिजन मशीन भेट देण्यासंदर्भात विनंती केली होती. यांच्या विनंतीला मान देऊन सदर मशीन आज पालिकेस भेट देण्यात आली.
या प्रसंगी नगरसेविका प्रियांका प्रीतम यादव ,मुख्याधिकारी रमाकांत डाके,दीपक कुंडे,रवींद्र थोरात, व्यवस्थापक,नगरअभियंता एन. एस.पवार,उपअभियंता आर.डी.भालदार, प्रीतम यादव आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते प्रीतम यादव व नगरसेविका प्रियांका यादव हे दाम्पत्य नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते.स्वच्छता अभियानामध्ये यांचे काम वाखाणण्याजोगे झाले आहे.आपल्या वार्डसह शहरातील इतरही वार्डातील लोकांची कामे करण्यासाठी नेहमीच हे पुढे असतात. त्यांच्या जागृकतेमुळे शहरातील अनेक सामाजिक प्रश्न सुटले आहेत.कोरोना काळात त्यांनी गरजूंना मदतही केली आहे.सध्या रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड दिसून येत आहे.ग्राऊंडवर काम करणारा आपला माणूस म्हणून प्रीतम यादव परिचित आहेत.शहरातील कोणतेही सामाजिक काम त्यांना सांगितले तर ते होणारच असा त्यांच्याबद्दल लोकांना विश्वास वाटतो. त्यांचा शहरात मोठा लोकसंपर्क आहे.त्यामुळे त्यांचा कामाचा आवकाही मोठा आहे.त्यांनी सध्याची सामाजिक गरज ओळखून येथील चदुकाका सराफ याना पालिकेला 165 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑक्सिजन मशीन भेट देण्याबाबत विनंती केली होती,त्यांच्या विनंतीचा मान राखून ही मशीन आज पालिकेला भेट देत मुख्याधिकारी डाके यांच्या ती ताब्यात देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment