येथील तरुण भारताचे पत्रकार संतोष गुरव यांचे काही दिवसांपूर्वी अकस्मित निधन झाले. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे . त्यांच्या कुटुंबियांना"आधार' देण्याची सध्या गरज आहे त्यामुळे, माणुसकीचा धर्म पाळत येथील युवा कराडकर सोशल ग्रुप त्याचकरिता पुढे सरसावला आहे.
कराडमध्ये सध्याच्या कोरोना संकटात लोकांना मदत करण्यासाठी शहरातील काही संवेदनशील युवकांनी एकत्र येऊन युवा कराडकर हा सोशल वर्क करणारा ग्रुप तयार केला आहे.याच्या माध्यमातून अनेकांना मदत करण्याचे काम शहर व परिसरातून सुरू आहे.शहरातील शेकडो युवक या ग्रुपला जोडले गेले आहेत.सर्वसामान्यांना सहकार्य करण्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रुप ची निर्मिती झाली आहे.त्याचीच बांधिलकी मानून या ग्रुपने कराड तालुक्यातील काले गावचे रहिवासी व येथील तरुण भारत चे पत्रकार संतोष गुरव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना पंधरा हजाराची त्वरित मदत केली आहे. गुरव कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने यापुढेही या कुटुंबाला मदतीचा हात युवा कराडकर ग्रुपच्या वतीने दिला जाणार असल्याचे, येथील युवा नेते उमेश शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
No comments:
Post a Comment