कराड
सध्या एकीकडे जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढली आहे. तर गांवातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही 80 टक्के व त्याहून जास्त आहे.तरीही कोरोना रुग्ण सापडणाऱ्या गांवामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यामार्फत जनजागृती करण्याच्या सुचना महसूल,ग्रामविकास विभागांना दिल्या आहेत.तसेच गर्दी टाळण्या करीता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना पोलीस यंत्रणांना दिल्या असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज कराडमध्ये सांगितले.कोरोना संसर्ग फैलावू नये याकरीता गर्दी टाळणे,अनावश्यक घराबाहेर पडणे, सातत्याने मास्कचा वापर करणे हे जे उपाय जनतेच्या हातात आहेत ते जनतेने काटेकोरपणे करावेत असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी जनतेला यावेळी केले आहे.दरम्यान साताऱ्याचे जम्बो कोरोना सेंटर लवकरच सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली
आज कराड येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षते खाली कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलमधील कोरोना रुग्णांचा आढावा घेणेकरीता तसेच कोरोना संसर्ग फैलावू नये याकरीता करावयाच्या उपाययोजनासंदर्भात आढावा बैठक आयोजीत केली होती याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बैठकीस कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,तहसिलदार अमरदीप वाकडे, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता देशमुख,कराड शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील,कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,कराड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती खैरमोडे व डॉ.धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आमचे विनंतीवरुन राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी साताऱ्याला तातडीने कोरोनाचे जंम्बो सेटंर सुरु करण्यास मंजुरी दिली.हे जम्बो हॉस्पीटल लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसे आमचे नियोजनही सुरु आहे.बेडवाचून उपचार मिळत नाहीत असे होवू नये याकरीता आम्ही प्रयत्नशील असून कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता निधी कमी पडू देणार नाही असे मुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगितले असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.
No comments:
Post a Comment