Tuesday, September 22, 2020

आज 500 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 500  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 807 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
*807 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26,उपजिल्हा रुग्णालय कराड 16, उपजिल्हा रुग्णालय फलटण 65, कोरेगाव 117, वाई 109, खंडाळा 51, रायगांव 118,  पानमळेवाडी 86, मायणी 33, महाबळेश्वर 50, दहिवडी 39 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 97 असे एकूण 807  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

*आतापर्यंत 45,538 रुग्णांची ॲन्टिजन (RAT) तपासणी*

  तसेच सातारा जिल्ह्यात विविध शासकीय व खाजगी तपासणी केंद्रात आतापर्यंत अँटी जन (RAT) साठी 48,538 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, यापैकी 12,600 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 35,938 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --113178
एकूण बाधित --  31514 
घरी सोडण्यात आलेले --- 21625  
मृत्यू --  940
उपचारार्थ रुग्ण --8949  
00000

No comments:

Post a Comment