Wednesday, September 2, 2020

आज 373 झाले कोरोनामुक्त

सातारा दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  373 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 942 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 30, कराड तालुक्यातील 82, खंडाळा 27, खटाव तालुक्यातील 9, कोरेगाव 12, महाबळेश्वर तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 17, पाटण तालुक्यातील 9, फलटण तालुक्यातील 4, सातारा तालुक्यातील 148 व वाई तालुक्यातील 31 असे एकूण 373 नागरिकांचा समावेश आहे.
942 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 169, उपजिल्हा रुग्णालय फलटण 34, कोरेगाव 96, वाई 32, खंडाळा 99, रायगांव 68,  पानमळेवाडी 54, मायणी 104, महाबळेश्वर 42, पाटण 11, दहिवडी 28,  खावली 50,  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 139 असे एकूण  942 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --   46665
एकूण बाधित --  15247
घरी सोडण्यात आलेले ---  8151
मृत्यू -- 414
उपचारार्थ रुग्ण -- 6666

0000

No comments:

Post a Comment