Wednesday, September 23, 2020

आज जिल्ह्यात 587 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 587  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 984 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
*984 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 65,उपजिल्हा रुग्णालय कराड 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण 85, कोरेगाव 74, वाई 81, खंडाळा 91, रायगांव 79,  पानमळेवाडी 117, मायणी 46, महाबळेश्वर 60,पाटण 17, दहिवडी 53, खावली 5 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 187 असे एकूण 984  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


घेतलेले एकूण नमुने --115606
एकूण बाधित --  32222 
घरी सोडण्यात आलेले --- 22212  
मृत्यू --  970
उपचारार्थ रुग्ण --9040  
00000

No comments:

Post a Comment