कराड
येथील पालिका कर्मचाऱ्यांच्या समस्या वेध माझा ने "कलेक्टरसाहेब...कराड पालिका कर्मचाऱ्यांचा "माणूस' म्हणून कधी विचार करणार'...? या मथळ्याखाली काही दिवसांपूर्वी मांडल्या होत्या. त्यामध्ये सध्याच्या कोरोना काळात पालिका कर्मचाऱ्यांवर जो कामाचा ताण पडत आहे त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी तातडीने बैठक घेऊन या संबंधी नवा आदेश काढला, की ज्यामुळे येथील पालिका कर्मचाऱ्यांवरील कामाचा काहीसा ताण कमी झाला आहे. हे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल वेध माझा चे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी शहरातील व तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या फार नव्हती मृत्युदर देखील खूपच कमी होता. त्यावेळी कलेक्टर साहेबांनी एक "फतवा' काढला होता की तालुक्यात कोठेही एखाद्याचा कोविड ने मृत्यु झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराच्या सम्पूर्ण जबाबदारी ही कराड पालिकेची असेल,त्यानुसार आजअखेर काम सुरू आहे. पण ज्यावेळी हा आदेश काढला त्यावेळचा पेशंट रेशीओ आणि मृत्युदर आणि आताच्या घडीला त्यामध्ये झालेली प्रचंड वाढ यामध्ये खूपच फरक आहे.त्यावेळच्या परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांचा तो निर्णय होता. पण सध्या वाढती रुग्ण संख्या आणि मृत्युदर लक्षात घेऊन या आदेशामध्ये बदल करण्याबाबत विचार होण्याची गरज निर्माण झाली होती.
येथील पालिका कर्मचारी सध्याच्या घडीला रोज सरासरी 10 मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.म्हणजे त्या मृतदेहाला त्याच्या ठिकाणी जाऊन त्याचे प्लास्टिक पॅकिंग करून समशानात मृतदेह नेऊन दहन देण्यापर्यंत सर्व सोपस्कार हेच लोक करतात. एक, एक करत रोज एवढ्या बॉडीना दहन देत त्यांचा दिवस आणि रात्र याच कामात जाते. या कामासाठी कर्मचाऱ्यांना पीपीई किट तबबल आठ,आठ तास घालावे लागते.या पीपीई किट मध्ये हवा जात नसल्या कारणाने कामगारांची त्यावेळी अक्षरशः गुदमरून घुसमट होत असते. कर्मचाऱ्यांवर,शारीरिक मानसिक खूपच ताण येतो.रात्री अपरात्री 2 कधी 3 वाजता फोन येतात त्यावेळी त्यांना तातडीने तालुक्याच्या भागात जावे लागते.असे कित्येक महिने रोज चालू आहे, या एकूणच परिस्थितीचा सहानुभूतीने विचार व्हावा... या समस्येवर ठोस उपाय काढावा...अशी मागणी वेध माझा ने आपल्या बातमीतून केली होती. ती प्रचंड व्हायरल झाली.त्याची दखल खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी घेत तातडीने काल ते कराडला आले.येथील कर्मचाऱ्यांना जाऊन ते अचानक भेटले. त्यांचे अक्षरशः हात जोडून त्यांनी धन्यवाद मानले. तुम्ही सर्वजण कोविड चे खरे योद्धे आहात असे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढले. प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी येथील कर्मचाऱ्यांना दिले.दरम्यान,मोबाईल द्वारे व्हायरल झालेल्या बातमीतुन कर्मचाऱ्यांची समस्या लक्षात आल्याने त्यांनी येथील सर्किट हौस येथे याबाबत मीटिंग घेत नवीन आदेश काढून मलकापूर भागाला इथून पुढची कोविड रुग्णांच्या अंत्यविधी संदर्भातील काहीशी जबाबदारी दिली, त्यामुळे अखेर कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत झाली.वेध माझा च्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी "फास्ट ऍक्शन' घेऊन याबाबत त्वरित अमलबजावणी केल्याबद्दल कराडकरांनी त्यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment