Saturday, September 26, 2020

आज जिल्ह्यात 955 जणांना दिला डिस्चार्ज

955 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 782 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 955 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 782 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
*782 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 32, कराड 23, उपजिल्हा रुग्णालय फलटण 101, कोरेगाव 63, वाई 110, खंडाळा 68, रायगांव 80, पानमळेवाडी 67, मायणी 16, महाबळेश्वर 27, पाटण 27, दहिवडी 28, खावली 12, कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 128 असे एकूण 782  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


घेतलेले एकूण नमुने -- 122917
एकूण बाधित --    34609
घरी सोडण्यात आलेले --- 25001
मृत्यू --   1060
उपचारार्थ रुग्ण -- 8548
00000

No comments:

Post a Comment