Wednesday, September 2, 2020

कराड रोटरी क्लबच्या वतीने कराड नगरपरिषदेस "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' मशीन सुपूर्द...

कराड
रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने कराड नगर परिषदेस पोर्टेबल ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर हे मशीन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
      गेल्या सहा महिन्यापासून कोरोना महामारी मुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत अशावेळी घरांमध्ये विलगीकरण केलेल्या लोकांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात या मशीनमुळे जीवदान मिळत आहे. समाजाची हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ कराड ने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे मशीन नगरपरिषदेला हस्तांतरित केले. आत्ता पर्यंत कोरोना चे संकट आल्यापासून रोटरी क्लब तर्फे पी.पी. ई. किट चे सेट वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल व कराड नगरपरिषद  यांना भेट दिले आहेत. त्याचबरोबर  व्यवसाय बंद झाल्यामुळे  उपासमार झालेल्या गरजू मजुरांना धान्याचे वाटप केले आहे. रोटरी क्लब कराड चे अनेक पदाधिकारी आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायती मध्ये करोना बाबत जनजागृती करून तेथील स्थानिकांना मास्कचे व आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करून या महामारी वर नियंत्रण आणण्यामध्ये खारीचा वाटा उचलत आहे.
यावेळी प्रेसिडेंट रो. गजानन माने, सेक्रेटरी रो. डॉ. शेखर कोगनुळकर, रो  किरण जाधव, रो. प्रवीण परमार, रो. डॉ.राहुल फासे, रो.राहुल (जगन ) पुरोहित रो चंद्रकुमार डांगे व रो. प्रबोध पुरोहित इत्यादी क्लब सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment