Thursday, September 3, 2020

आज तब्बल 870 जण झाले कोरोनामुक्त : कोरोनामुक्तांची संख्या वाढली

सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर डिसीएच, डिसीएससी, व सीसीसी येथून आज संध्याकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या 870  नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 682 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, उपजिल्हा रुग्णालय कराड 13, उपजिल्हा रुग्णालय फलटण 54, कोरेगाव 37, वाई 56, खंडाळा 57, रायगांव 76,  पानमळेवाडी 45, मायणी 27, महाबळेश्वर 50, दहिवडी 49,  खावली 41,  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 166 असे एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --   47347
एकूण बाधित --  15960
घरी सोडण्यात आलेले ---  9021
मृत्यू -- 443
उपचारार्थ रुग्ण -- 6496

0000

No comments:

Post a Comment