Wednesday, September 30, 2020

जनतेच्या सेवेत अविरत धडपडणारा कोविड योद्धा...'यारोंका यार'... सिद्धार्थ पाटणकर...

कराड
येथील सोमवार पेठेतील रहिवासी व औषध निर्माण विषयक डिप्लोमा शिक्षण घेऊन त्याच क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत असलेले सिद्धार्थ पाटणकर हे युवा कराडकर कोविड योद्धे म्हणून शहरातील कोरोना रुग्णांची सेवा अनेकप्रकारे करताना दिसत आहेत.यारोंका यार म्हणून त्यांची शहरातील सर्वच स्तरातील लोकांमधून ओळख आहे. 

सध्या अनेकजण कोरोनाशी दोन हात करत स्वतः व इतरांना जगण्याचे बळ देताना दिसत आहेत.समाजाशी आपली असणारी बांधीलकी जपण्याचा त्यामागील उदात्त हेतू या कोरोनाशी लढणाऱ्यां योध्याचा आहे. अनेक तरुण या लोकसेवेसाठी जीवाची पर्वा न करता पुढे सरसावलेले दिसतात. येथील सोमवार पेठेतील सिद्धार्थ पाटणकर हेही त्यापैकीच एक आहेत. कोरोनाच्या पहिल्या लॉक डाऊन पासून ते जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी गरजूंना अनेक प्रकारे मदत करत आपली बांधीलकी जपली आहे. ते स्वतः एक औषध व्यवसायिक आहेत. 
 कराड व परिसरामध्ये आत्तापर्यंत अनेक कोरोना रूग्णांना त्यांनी विविध प्रकारे मदत करत जगण्याचे नव्याने बळ दिले आहे.रात्री अपरात्री ज्यावेळी फोन येईल त्यावेळी त्याठिकाणी जाऊन ते कोविड रुग्णाला oxigen ची सेवा देत आहेत, तसेच ज्यांना इंजेक्शन हवे असेल त्यांना कोणत्याही वेळी स्वतः धडपड करून कोठूनही ते इंजेक्शन उपलब्ध करून देत आपली बांधीलकी जपत आहेत. केवळ शहरातच नव्हे तर शहराबाहेर, म्हणजे सांगली,पुणे येथेही गरजू रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.त्यांनी अनेक रुग्णाना यापूर्वी त्याठिकाणी बेड उपलब्ध करून दिले आहेत.आपला होलसेल औषध व्यवसाय सांभाळत ते लोकसेवेशी असलेली आपली बांधिलकी कोविड योद्धा म्हणून यशस्वीपणे पार पाडत आहेत, त्याबद्दल त्यांचे शहरातून खूप कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment