Friday, September 4, 2020

असाही असतो मुख्याधिकारी...!! मुख्याधिकारी डाके यांनी बजावलेल्या कर्तव्याचे शहरातून होतंय कौतुक...

कराड
येथील पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आज आपल्या कर्तव्यतेचे दर्शन संपूर्ण शहराला दाखवून दिले.कमी तिथे आम्ही ही उक्ती   त्यानी आज तंतोतंत खरी करून दाखवली आहे.कोविड मृतदेहाला पीपीई किट घालून अंत्यविधीसाठी ते स्वतः घेऊन गेले.सगळेजण अक्षरशः आवक होऊन मुख्याधिकार्याच्या या कर्तव्याला पहात बसले... वाहवा... करत राहिले...

येथील मुख्याधिकारी डांगे यांच्या उचलबांगडी नंतर आदर्श मुख्याधिकारी पुरस्कार विजेते व स्वच्छ सर्वेक्षणमध्ये यापूर्वी कार्यरत असणाऱ्या पालिकेत उत्कृष्ट काम केल्याचे बक्षीस मिळवून राज्यात नावलौकिक मिळवलेले मुख्याधिकारी रमाकांत डाके हे येथे हजर झाले.त्यांनी पहिल्याच दिवशी शहरातून फेरफटका मारून त्यांच्या पद्धतीने पाहणी केली.येथील लोकप्रतिनिधिंशी येथील एकूण परिस्थितीवर चर्चा करून ते आपल्या कामाला लागले.त्यांनी शहराचे सॅनिटायझिंग करण्यासह,येथील वाढत्या डासांच्या प्राधूरभाव रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.कोरोना संकटाशी दोन हात करण्याकरिता त्यांनी कम्बर कसली आणि येथील स्वच्छतेसह रुग्णवाढीच्या संकटावर पर्याय म्हणून जास्तीत जास्त अँटिजेंन टेस्ट सुरू केल्या. शहरातून डॉक्टर्स मिळवून दोन ठिकाणी तापाच्या टेस्ट होणारी सेंटर्स चालू करून हॉस्पिटलवरील सुरुवातीला वाढणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान गणपती उत्सव काळात त्यांनी पालिकेच्या वतीने प्रत्येकाच्या घरासमोरच मूर्ती विसर्जनाची आयडिया अमलात आणून गर्दीचा विषय टाळून कोरोना पासून लोकांना दूर ठेवण्यास मदत केली.खूप कमी लोकांना माहीत असणारी गोष्ट म्हणजे ते स्वतः साव्याब टेस्ट घेऊ शकतात.त्यांनी येथील काही जणांना त्याबद्दल शिकवण्याचा प्रयत्न देखील केला आहे.आपल्या कामाच्या जबाबदारीचे महत्व व जाण असणारा हा अधिकारी आहे.लोकांची कदर करून त्यांना समजून घेणारे आदरातिथ्य त्यांच्याकडे असल्याचे दिसते.सर्वांना एकत्र करून त्या ताकदीने शहराचे कल्याण करणारे विचार त्यांनी जोपासल्याचे जाणवते. आणि कोणतेही काम करताना पालिका कर्मचाऱ्या बरोबरीने आपले कर्तव्यदेखील बिना-झिझक ते पार पाडतानाही दिसत आहेत.
त्यांना येथे येऊन जेमतेम काही दिवस लोटले आहेत.अडचणीच्या वेळी कशा पद्धतीने आपले कर्तव्य बजावायचे त्यासाठी आपण आपल्या कामात स्वतः ला झोकून देत लोकांसाठी कसे झटायचे याची पूर्ण जाणीव असणारा हा नम्र अधिकारी आहे.
सम्पूर्ण तालुक्याचा कोविड रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यविधी करण्याचा लोड कराड पालिका कर्मचाऱ्यांवर पडत आहे. हा अतिरिक्त ताण कमी होण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करीत आहेत. पीपीई किट घालून कोविड रुग्णाला आज त्यांनी स्वतः प्लास्टिक पॅकिंग केले.आणि अंत्यविधीसाठी स्वतः स्मशानात नेले.हे पाहून लोकांना पटलं...मुख्याधिकारी असाही असतो....स्वतःच्या जीवाची परवा न करणारा... आपल्या माणसांसाठी आपले कर्तव्य सर्वप्रथम मानणारा..!! हे अनेक लोकांनी आज अक्षरशः बोलूनही दाखवले...

No comments:

Post a Comment