Wednesday, September 9, 2020

आज जिल्ह्यातील 738 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 738  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 960 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *960 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 25,उपजिल्हा रुग्णालय कराड 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण 77, कोरेगाव 52, वाई 106, खंडाळा 102, रायगांव 107,  पानमळेवाडी 159, मायणी 61, महाबळेश्वर 42, दहिवडी 40 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 168 असे एकूण 960 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --52671
एकूण बाधित --  20530 
घरी सोडण्यात आलेले --- 12189  
मृत्यू --  557
उपचारार्थ रुग्ण --7784  
0000

No comments:

Post a Comment