Thursday, September 24, 2020

पृथ्वीराजबाबांच्या प्रयत्नातून उभे राहिलेल्या कोविड सेंटरचे ना बाळासाहेब पाटील,खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण... ऑक्सिजन व रेमडेसीविर इंजक्शनच्या तुटवड्याबाबत पृथ्वीराजबाबानी व्यक्त केली चिंता...

कराड
माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्यान्वित होत असलेल्या 50 ऑक्सिजन बेडचा लोकार्पण सोहळा आज जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण, खा श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला.दरम्यान,यावेळी जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसीविर इंजेक्शनच्या जाणवणाऱ्या तुटवड्याबद्दल आ पृथ्वीराजबाबानी पत्रकारांशी बोलताना चिंता व्यक्त केली. 

 जिल्हाधिकारी शेखर सिंह, आय ए एस अधिकारी मनीषा आव्हाळे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, इंद्रजित मोहिते, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, शंकरराव खबाले, सौ मंगलाताई गलांडे, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, 
कराड नगरपालिकेचे नगरसेवक सौरभ पाटील, राजेंद्र माने, इंद्रजित गुजर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आमदार तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये पहिल्या दिवसांपासून जनतेसाठी कार्यरत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी कायम अग्रभागी असलेले पृथ्वीराज बाबा यांनी 60 लाख रुपयांचा निधी शहरातील कोरोना रुग्णालयांच्या मदतीसाठी दिला आहे. या निधीतून 2 रुग्णवाहिका व 10 व्हेंटिलेटर दिले जाणार आहेत.तसेच येथील मुस्लिम समाज संचलित वारणा कोविड सेंटरलादेखील 6 लाखाचा निधी त्यांनी नुकताच उपलब्ध करून दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला मात देण्यासाठी पृथ्वीराजबाबा वेळोवेळी जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा करीत आहेत. यामधूनच शहरातील कोरोना रुग्णालयांचे अधिग्रहण होऊन 1400 हुन अधिक बेडचे नियोजन केले आहे. या घोषित बेड पैकी 90% बेड सध्या उपलब्ध झाले आहेत तर उरलेले covid सेंटर चे काम पूर्णत्वाकडे आहे.याचाच एक भाग म्हणून आ पृथ्वीराजबाबा यांच्या प्रयत्नातून कराड शहरातील स्व यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे 50 ऑक्सिजन बेडचे कोरोना उपचार सेंटर रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळसाहेब पाटील व खा.श्रीनिवास पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. दरम्यान,ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय ही चिंतेची बाब आहे. रुग्णसंख्येच्या प्रमाणात त्याचे वाटप व्हावे अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे पृथ्वीराजबाबानी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment