कराड
शहराच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणीताई शिंदे यांचे पती युवा नेते उमेश शिंदे हे काही दिवसांपूर्वी कोरोना पोसिटीव्ह आले होते. उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना येथील कृष्णा हॉस्पिटल येथून आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे.लवकरच लोकसेवेत हजर होतोय अशी प्रतिक्रिया त्यानी कोरोनामुक्ती नंतर दिली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना संकटामध्ये नगराध्यक्षा यांनी रात्रंदिवस रस्त्यावर उतरून झपाटून काम केले होते. त्यावेळी त्या स्वतः पॉझिटिव्ह झाल्या होत्या. येथील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार घेऊन त्या पूर्ण बऱ्या झाल्या. त्यांचे पती उमेश शिंदे यांनी सुध्दा या कोरोना संकटात नगराध्यक्षाना साथ देत आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. ते देखील 24 x 7 लोकांच्यात मिसळून काम करताना दिसत होते. त्याच दरम्यान त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःची टेस्ट करून घेतली त्यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्यांना उपचारासाठी येथील कृष्णा हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर ,सुरेश बाबा अतुलबाबा,विनुबाबा,व सर्वच भोसले कुटुंबियांचे आभार मानले आहेत तसेच,कृष्णा हॉस्पिटलचा सर्व स्टफ,डॉक्टर्स,वार्ड बॉयस,सिस्टर्स या सर्वांनाही त्यांनी धन्यवाद दिले आहेत.लवकरच लोकसेवेसाठी हजर होतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर दिली आहे.
No comments:
Post a Comment