सातारा दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 809 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 921 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*921 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 17, उपजिल्हा रुग्णालय कराड 14, उपजिल्हा रुग्णालय फलटण 51, कोरेगाव 22, वाई 138, खंडाळा 77, रायगांव 141, पानमळेवाडी 102, मायणी 65, महाबळेश्वर 40, दहिवडी 42, खावली 23, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 189 असे एकूण 921 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 62579
एकूण बाधित -- 29115
घरी सोडण्यात आलेले -- 19866
मृत्यू -- 828
उपचारार्थ रुग्ण – 8421
00000
No comments:
Post a Comment