Wednesday, March 31, 2021
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये शरद पवारांवर झाली शस्त्रक्रिया ...शरद पवारांनी शस्त्रक्रियेनंतर स्वत:ला गुंतवून घेतलं आवडत्या कामात- खा.सुप्रिया सुळेनी केले ट्विट
मलकापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षाना पालिकेने अद्यापही वाहन का उपलब्ध करून दिले नाही...अजितअप्पा चिखलीकर म्हणतात...पालिकेची बिल्डिंग होऊ दे...मग देऊ...मनोहरभाऊ मात्र गप्पच...
कराड
मागील झालेल्या पालिका निंडणुकीतून निवडून आलेल्या जिल्ह्यातील लोकनियुक्त नगराध्यक्षाना फिरण्यासाठी वाहन उपलब्धता त्या त्या पालिकेने करून दिली आहे.मग मलकपूरच्या नगराध्यक्षा ना का नाही? असा सवाल आज आमदार प्रिथ्वीराजबाबा यांनी येथील सर्किट हाऊस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित झाला, खरतर या प्रश्नाचे उत्तर मलकापूरचे कार्यसम्राट उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी द्यायला हवे होते. कारण ते या पत्रकार परिषदेस हजर होते तरी ते गप्प बसले याचे सगळ्यांनाच असचर्य वाटले. परंतु ज्यांचा मलकापूरशी काहीही संबंध नाही. अशा अजितअप्पा पाटील- चिखलीकर यांनी मलकापूर नगरपालिकेची इमारत पूर्ण झाल्यानंतर खुर्चीसह मुराळकी देऊ असे उत्तर देऊन फक्त वेळ मारून नेली याविषयीची चर्चा सध्या मलकपूरसह सगळीकडेच जोरदार सुरू आहे.
नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर मलकापुर नगरपरिषदेची पहिली निवडणूक पार पडून काहीवर्ष उलटून गेली तरी या पालिकेच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या नीलम एडगे याना फिरण्यासाठी पालिकेच्या वतीने अजूनही वाहन उपलब्ध करून दिलेले नाही हे दुर्दैव आजही पहावयास मिळत आहे वास्तविक निवडणुकीनंतर जिल्यातील बहुतांशी लोकनियुक्त नगराध्यक्षना त्या त्या पालिकेने वाहन उपलब्ध करून दिली आहेत मलकापूर नगरपरिषद त्याला अजूनतरी अपवाद आहे मग सम्पूर्ण जिल्ह्यात हा विषय नेहमी चघळला जात असतानाच आज आमदार प्रिथ्वीराजबाबा यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत हाच प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी मलकपूरचा काही सम्बन्ध नसणाऱ्या अजितअप्पा चिखलीकर यांनी यावेळी पालिकेची इमारत होऊ दे मग खुर्चीसह मुराळकीपण देऊ असे वेळ मारून नेणारे उत्तर देऊन प्रश्नांला बगल दिली मात्र त्याचवेळी मलकपूरचे कार्यसम्राट उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे त्याठिकाणी उपस्थित असतानाही या प्रश्नावर ते काहीच बोलले नाहीत याचेच सर्व पत्रकारांना असचर्य वाटले आणि याची चर्चाही सध्या मलकापुरात जोरात सुरू आहे.
मी मंजूर केलेली अम्ब्युलन्स अद्याप लोकांच्या सेवेसाठी नाही ही गँभीर बाब... कराड पालिकेला ती नको असेल तर तसा ठराव करून द्यावा...आमदार पृथ्वीराजबाबा कडाडले...
येथील पालीकेला मागील कोविड चा पीक पिरियड सुरू असताना मी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती ती अद्याप का पालिकेने ताब्यात घेतली नाही याचे उत्तर मला अजून मिळालेले नाही जर पालिकेला ती नको असेल तर बाबडतोब तसा ठराव करून पालिकेने तो सादर करावा म्हणजे तो निधी शहराच्या दुसऱ्या एखाद्या चांगल्या कामाला टाकता येईल असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मागील कोरोनाच्या सुरू असणाऱ्या शहरातील पीक पिरियड मध्ये शहरातील रुग्ण संख्या खूपच अधिक वाढत असताना रुग्णांना हॉस्पिटल मधून बेड मिळत नव्हते उपचारासाठी दुसऱ्या गावी रुग्णांची पळापळ होत होती प्रॉपर उपचार मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू दर वाढला होता त्याचवेळी आ पृथ्वीराजबाबानी कराड व मलकापूर शहरासाठी प्रत्येकी एक अम्ब्युलन्स मंजूर केली होती तसेच येथे कोविड सेंटर सुरू करून त्यावेळी तुटवडा जाणवत असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर व व्हेंटिलेतरची व्यवस्था देखील त्यांनी करून दिली होती त्यानुसार कराड पालिकेची अम्ब्युलन्स वगळता सर्व काही उपलब्ध झाले होते याविषयी बोलताना आ पृथ्वीराजबाबा आज म्हणाले येथील पालिकेला शहराची सेवा करण्याच्या ड्रीष्टीने आपण मलकापूर बरोबरीने एक अम्ब्युलन्स दिली असता अद्याप ती कराड पालिकेने का ताब्यात घेतली नाही? याचे उत्तर मला अजुनही मिळालेले नाही ही बाब गँभीर आहे जर पालिकेला ती नको असेल तर तस ठराव करून मला द्या मग मी त्यासाठीचा असलेला निधी शहरातील अन्य चांगल्या कामासाठी वळवतो. खासगी रुग्णवाहिका वापरण्याबाबत कोणाचा दबाव आहे का ? की जेणेकरून मंजूर झालेली रुग्णवाहिका पालिकेकडून ताब्यात घेतली जात नाहीये असा सवालही आ चव्हाण यांनी आज येथे बोलताना केला.
383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.31 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 18, करंजे 4, आसनगाव 1, आसवडी 1, खेड 11, गोडोली 9, कोडोली 2, संभाजीनगर 1, सदरबझार 3, जैतापूर 1, शाहुपुरी 2, मंगळवार पेठ 5, सोनगाव 1, विकासनगर 6, गुरुवार पेठ 1, शाहुनगर 2, शिवथर 2, तारगाव 2, वासोळे 1, कारंडवाडी 1, कोंढवे 2, माची पेठ 1, गेंडामाळ 5, पानमळेवाडी 1, शनिवार पेठ 3, कृष्णानगर 1, सैदापूर 1, सोमवार पेठ 1, हुमगाव 1, अंगापूर 1, शिरंबे 1, निनाम पाडळी 1, सांबरवाडी 1, रामाचा गोट 1, क्षेत्र माहुली 1, बेबलेवाडी 1, ठोसेघर 1, कुपर कॉलनी 1, तामाजाईनगर 1, कळंबे 3, सोनगाव 1,
*कराड तालुक्यातील* कराड 3, चोरे 1, मुंडे 1, काले 1, पार्ले 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शेनोली 1, विद्यानगर 1, मसूर 2, सैदापूर 1, कर्वे 1, तारुख 1, आगाशिवगनर 2,
*पाटण तालुक्यातील* पाटण 1, ढेबेवाडी 1, वजराशी 1, मिसरे 1, तारळे 2, सदा व्हागापुर 1, ढेबेवाडी 1, खोजावडे 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 4, रविवार पेठ 2, भडकमकरनगर 2, जाधववाडी 7, बोडकेवाडी 2, आसु 3, धुळदेव 1, कोळकी 2, रांजणी 1, मलटण 7, जिंती 1, भिलकटी 1,शुक्रवार पेठ 3, तरडगाव 1, निंभोरे 1, साखरवाडी 2, कसबा पेठ 2, निंबळक 1, ओढले 1, लक्ष्मीनगर 4, मारवाड पेठ 1, सुरवडी 1, सांगवी 2, बरड 2, निरगुडी 1,
जावली 1, ठाकुरकी 1, नरसोबानगर 1, बसाप्पाचीवाडी 1, पवार वस्ती 1, ढवळ 1,
*खटाव तालुक्यातील*निमसोड 1, भुरकवाडी 1, खटाव 2, कोकराळे 1, पाडेगाव 1, वडूज 2, कातरखटाव 1, गणेशवाडी 1, वर्धनगड 1, मायणी 1, बुध 1, पुसेगाव 2, रेवलकरवाडी 1, त्रिमाली 1, गोरेगाव वांगी 1,
*माण तालुक्यातील*कारखील 1, कुक्कुडवाड 1, दहिवडी 3, गोंदवले 1, म्हसवड 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 10, भाडळे 1, एकंबे 1, सातारा रोड 1, पिंपोडे बु 2, कुमठे 2, अपशिंगे 1, आसरे 3, त्रिपुटी 1, अनपटवाडी 1, रुई 1, दहिगाव 2, सोनके 1, वाठार स्टेशन 1,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 6, बावडा 1, म्हावशी 7, आसवली 2, अहिरे 1, लोणंद 6, शिरवळ 9, लोणी 2, तळेकरवस्ती 1,सांगवी 3, नायगाव 1, बोरी 1,
*वाई तालुक्यातील* वाई 5, खडकी 1, भुईंज 1, ओझर्डे 2, गणपती आळी 2, बावधन 1, सह्याद्रीनगर 1, धोम 1, पसरणी 2, आंब्रळ 2, चांदक 2, वेळे 4, ब्राम्हणशाही 1, रविवार पेठ 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 9, पाचगणी 7, भिलार 4, तळदेव 1,
जावली तालुक्यातील* भिवडी 2, मालचौंडी 1, निझरे 1, माते खुर्द बु 2, कुसुंबी 1, मेढा 2, कारंडी 2, मुरा 1, कुडाळ 2, भुतेघर 1, सायगाव 1, आनेवाडी 1, चोरांबे 2, सरताळे 1, रुईघर 1,
*इतर* 5, खेड बु 1, अटके 1, आलेवाडी 1, पांडेवाडी 1, सणबुर 1, येरफळे 1, सोनगाव 1, बोरेगाव 1, हडको कॉलनी 1, डांगेघर 1, खबालवाडी 1, नांदवळ 1, कोळे सबणबुर 1,
*बाहेरील जिल्ह्यातील* येटगाव ता. कडेगाव 1, वाळवा 1, निरा 3, पुरंदर 1, इस्लामपूर 1, कोल्हापूर 1, खडकी पुणे 1, कडेगाव 1,
*3 बाधितांचा मृत्यु*
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई येथील 51 वर्षीय पुरुष, गोपुज ता. खटाव येथील 55 वर्षीय महिला व झोरे ता. जावली येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -404270*
*एकूण बाधित -65542*
*घरी सोडण्यात आलेले -59997*
*मृत्यू -1906*
*उपचारार्थ रुग्ण-3639*
0000
Tuesday, March 30, 2021
लॉकडाऊन करायचा असल्यास लोकांच्या खात्यात रोख रक्कम जमा करा;माजी मुख्यमंत्र्यांची मागणी
विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट मुंबई-पुण्यासह,मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ,उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे.परिणामी राज्य पातळीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास खालील बाबी विचारात घेणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या सहा मागण्या
● लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देणे.
● लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवणे.
● या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करणे (पाश्चिमात्य देशांप्रमाणे). यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करणे.
● खाजगी वाहनातून प्रवासास मुभा देणे.
● शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालु ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ न देणे.
● लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवणे.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्च मध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन घोषित केले होते. सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाउनचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
उदयनराजेंच्या शिवेंद्रसिहराजेना ट्विटर च्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा...
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे चुलतबंधू. मात्र गेल्या काही काळात दोघांमध्येही विस्तव जात नव्हता. आधी दोघंही राष्ट्रवादीत होते, नंतर दोघंही भाजपात गेले. त्यामुळे मूळचे राष्ट्रवादीचे असलेले दोन्ही राजे सध्या भाजपमध्ये आहेत. भाजपप्रवेशाच्या वेळी दोन्ही राजेंचं मनोमीलन झाल्याचं पाहायला मिळालं.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतीच शिवेंद्रराजे भोसलेंना एक ऑफरही दिली होती. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील, अशी ऑफर शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंना दिली होती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 14 सप्टेंबर 2019 रोजी उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवलं
191 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
सातारा दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 191 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, अपशिंगे 1, खेड 3, गडकर आळी 2, जकातवाडी 1, देगाव रोड 1, विसावा नाका 1, नुने 1, सदरबझार 4, राधिका रोड 2, देगाव 1, करंजे 1, सासुर्वे 1, अंभेखरी 1, खिंडवाडी 1, संगमनगर 1, मालदन 1, सदाशिव पेठ 1, कृष्णानगर 3, गोडोली 2, मिताल 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1, केसरकर पेठ 1, अतित 1, गेंडामाळ 1, वडूथ 1, कोडोली 1, शाहुनगर 1, साई कॉलनी 1,कोंढवे 1,काशिळ 1.
*कराड तालुक्यातील*कराड 2, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, विद्यानगर 1, आगाशिवनगर 2, पाल 1, मलकापूर 3, तांबवे 1, कोळेवाडी 2, जाखीनवाडी 1, शनिवार पेठ 5,पवार वस्ती 1, मंगळवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, शेरे 1, सैदापूर 3, वहागाव 1,गोळेश्वर 1, काले 1, पार्ले 1.
*पाटण तालुक्यातील* पाटण 1, ढेबेवाडी 1, गव्हानवाडी 1, माजगाव 5.
*फलटण तालुक्यातील* बिरदेवनगर 1, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, तरडगाव 1, कोळकी 1, जिंती 2, गिरवी 1, नांदल 1, जाधववाडी 3, बारसर गल्ली 1, बुधवार पेठ 1, भडकमकरनगर 1, मलटण 2, खुंटे 1, संजीवराजे नगर 1, फडतरवाडी 1, सोमवार पेठ 1, साखरवाडी 2, शुक्रवार पेठ 1, नरसोबा नगर 1, गुणवरे 1, काळज 1, सरडे 1, आलगुडेवाडी 1, पाचबत्ती चौक 1, सालपे 1, गोखळी 1.
खटाव तालुक्यातील* पुसेसावळी 4, बुध 2,पुसेगाव 1, चितळी 1,वडूज 3, गोरेगाव वांगी 1.
माण तालुक्यातील*बोराटवाडी 1, दहिवडी 1, गोंदवले खु 1, शिंगणापूर 1, घेरेवाडी 1, पळशी 3.
कोरेगाव तालुक्यातील* ल्हासुर्णे 1, शिरढोण 1, कोरेगाव 6, किरोली वाठार 1.
*वाई तालुक्यातील*गणपती आळी 3, सोनगिरवाडी 2, रविवार पेठ 1, गंगापुरी 1, सिद्धनाथवाडी 1, धर्मपुरी 1, फुलेनगर 1, वाई 2, यशवंतनगर 1, बावधन 1, भुईंज 1, एकसळ 1.
खंडाळा तालुक्यातील* लोणंद 5, शिरवळ 2, विंग 1, खंडाळा 1.
जावली तालुक्यातील* जावली 1.
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 4, मेटगुट 1.
इतर*1, खार्शी 1.
बाहेरील जिल्ह्यातील* शेडगेवाडी ता. शिराळा 1, सांगली 3, मिरज 1, बोंबाळेवाडी 1, पलूस 1, कोपरगाव जि. अहमदनगर 1.
*1 बाधितांचा मृत्यु*
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव येथील 65 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -402823 *
*एकूण बाधित -65153*
*घरी सोडण्यात आलेले -59846*
*मृत्यू -1903*
*उपचारार्थ रुग्ण-3404*
0000
Monday, March 29, 2021
शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर चंद्रकांतदादांचे खळबळजनक विधान... राजकारण्यांच्यात संभ्रमावस्था...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विधान करून संभ्रम वाढविला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचं काही ठरलंच तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल, असे सूचक विधान पाटील यांनी केले आहे.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. होते. पाटील यांना शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमध्ये झालेल्या कथित भेटीविषयी छेडले असता,पाटील म्हणाले की, राजकारणात अशा भेटी झाल्या पाहिजेत, राजकारण हे राजकारणाच्या जागी असते. नेत्यांनी एकमेकांना भेटले पाहिजे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झाल्या होत्या.शाह आणि पवार यांची भेट राजकीय कारणासाठी होते, असे नाही. त्यामागे एखादे समाजोपयोगी कारणही असू शकते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचं काही ठरलंच तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.मात्र शहा पवार यांची नक्की भेट झाली का हे मला माहित नाही.पण अमित शहा यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्य पाहता ही भेट झाली असावी असेही पाटील यांनी सांगितले.महाविकास आघाडीचे नेते वारंवार सरकारला धोका नाही,असे सांगत आहेत.त्यामुळे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हेच सिद्ध होत असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.पवार अहमदाबादला जाऊन शाह यांना का भेटले, याचा विचार झाला पाहिजे असे सांगतानाच, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही पाटील यांनी म्हणाले.
यावेळी त्यांनी संभाव्य लॉकडाऊनवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक रुपयाचे ही पॅकेज महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले नाही.लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे मातोश्रीमध्ये बसून कळणार नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विना शासकीय ताफा वस्त्यांमध्ये फिरावं लागेल.गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल असेही पाटील यांनी सांगितले.कोरोना संसर्गजन्य आजार आहे,हे जगमान्यच आहे.त्यामुळे खबरदारी घेणे हाच त्यावर उपाय आहे. नागरिकांनी मास्क लावणे, सतत हात सॅनिटायझर आणि साबणाने धुतलेच पाहिजेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे बंधनकारक आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी करणे सारखे उपाय चालू शकतात.मात्र, पूर्णतः लॉकडाऊन करून काहीही साध्य होणार नाही असेही पाटील म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत असंघटित कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू केले, तर त्याचा सर्वाधिक फटका हा असंघटित वर्गालाच बसेल. त्यामुळे त्यांना सर्वातआधी दर महिना पाच हजारांचे पॅकेज जाहीर करा, जेणेकरून असंघटित क्षेत्रातील हातावर पोट असणारे फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, रोजंदारी कामगार आदींना आधार मिळेल. पण राज्य सरकार एक ही रुपयाची मदत न करता, लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल. सर्वसामान्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरु, असा पुनरुच्चार पाटील यांनी यावेळी केला.
474 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु
सातारा दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 474 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 23, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 3, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 5, व्यंकटपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, विकास नगर 1, पंताचा गोट 1, रामाचा गोट 1, संभाजीनगर 2, गडकर आळी 1, कूपर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, सदरबझार 9, शाहुपुरी 3, गोडोली 4, कोडोली 1, सैनिक स्कूल 1, देशमुख कॉलनी 1, विराटनगर 1, शाहुनगर 6, एमआयडीसी 1, मोळाचा ओढा 1, संगमनगर 1, सुधाकर नगर 1, उत्तेकर नगर 1, दहिगाव 3, वनवासवाडी 1, जाखणगाव 2, खेड 1, पाडळी 2, करंजपूर 1, राजापुरी 1, नवघरवाडी 1,वासोळे 1, मार्ढे 1, पाटेघर 4, चिंपणेर वंदन 2, वर्णे 1, खेड 1, वेखणवाडी 2, तळबीड 1, बोरखळ 1, अबदानवाडी 1, लवंघर 1, जैतापूर चिंचणेर 1, धनकवडी सातारा रोड 1, कळंबे 1.
*कराड तालुक्यातील* कराड 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, राजाराम नगर 1, विद्यानगर 1, मलकापूर 4, तांबवे 1, घोगाव 1, रेठरे खु 2, चरेगाव 1, उंब्रज 1, तारुख 1, कासारशिरंभे 3, जुळेवाडी 4, मसूर 2, पाल 3, कोळेवाडी 1.
*पाटण तालुक्यातील* पाटण 2, जंगमवाडी 2, शिंदेवाडी 1, चोपदरवाडी 4, अडुळ 1, मार्ली 1, जानुगडेवाडी 3, तामीने 2, निसरे 2, वरेकरवाडी 2, गुढे 1, भोसगाव 2, मुरुड 5, गोरेवाडी 1.
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, शुक्रवार पेठ 1, पद्मावती नगर 1, मेटकरी गल्ली 1, मलठण 1, लक्ष्मीनगर 1, नरसोबा नगर 2, अक्षतनगर कोळकी 1, आदर्की खुर्द 1, अरडगाव 1, हिंगणगाव 1, कांबळेश्वर 1, विढणी 1, वडगाव 2, रावडी 1, राजुरी 1, सांगवी 2, निंबळक 1, शिंदेवाडी 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, वाठार निंबाळकर 2.
*खटाव तालुक्यातील* खटाव 3, पुसेगाव 1, वडूज 11, येराळवाडी 2, शिरसवाडे 1, अंबवडे 1, होळीचागाव 4, तुपेवाडी 1, भुरुकवाडी 6, नेर 1, रैवळकरवाडी 1, भोसरे 3, त्रिमली 1, अंभेरी 1, औंध 5, नांदोशी 1, बुध 2, नागनाथवाडी 1, मायणी 2, ढोकळवाडी 5, चोर्डे 1, फडतरवाडी 1, पुसेसावळी 4, वडगाव 4, पळशी 1, गिरीजाशंकरवाडी 1, लोणी 4, धारपुडी 1, कातरखटाव 1, तडावळ 1, गणेशवाडी 2, येळमरवाडी 3, गुरसाळे 1, लांडेवाडी 1, ललगुण 1, पुसेगाव 2.
*माण तालुक्यातील* शिंगणापूर 1, दहिवडी 9, पांगरी 3, श्रीतव 1, राजवडी 1, बिजवडी 3, झाशी 1, गोंदवले खुर्द 2, किरकसाल 1, दिवड 1, हिंगणी 1, म्हसवड 2, कालचौंडी 1, पळशी 1, मोही 1.
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 8, वाठार स्टेशन 9, बेलेवाडी 1, रहिमतपूर 1, कणेरखेड 1, करंजखोप 1, भोसे 1, मोरबेंड 1, रणदुल्लाबाद 3, वाठार बु 1, देऊर 4, तालीये 2, पळशी 1, दुधानवाडी पळशी 3, ल्हासुर्णे 2, सोळशी 1, शिवांबे 1, खामकरवाडी 1, मोरेबेंड 1.
*वाई तालुक्यातील* वाई 3, गंगापुरी 1, रविवार पेठ 1, शेंदूरजणे 4, बावधन 7, धर्मपुरी 1, पांडेवाडी 4, म्हाटेकरवाडी 2, उंबारवाडी 1, आसरे 1, नागेवाडी 1, वेळे 1, सतालेवाडी 3, अंभेरी 1, भुईंज 4, ओझर्डे 1, पिराचीवाडी 1, जोशीविहीर 1, केंजळ 1, वासोळे 1, वाघजाईवाडी खटेकरवाडी 1.
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 3, लोणंद 1, शिरवळ 4, अजुनज 1, वाहगाव 1, नायगाव 1, मिरजेवाडी 1.
*जावली तालुक्यातील* अलेवाडी 3, कारंडी 5, सोनगाव 1, हाटगेघर 1, विरार 1, भणंग 1, निझरे 1, मोरघर 3, सायगाव 1, रायगाव 1, रांगणेघर 1, रेंगडी 2, भोगावली 8, पिंपळी 2,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 5, नावके 1, खिंगार 7, गोदावली 4, डांगेघर 2, अंब्रळ 1, चर्तुबेट 4, गुरुघर गौताड 1, भेकवली 1, पाचगणी 3, बिरवडी 1, चोरारी तळदेव 1, माचूतार 1,
*इतर* 2.
*बाहेरील जिल्ह्यातील* किनी 1 (कोल्हापूर), येडेमच्छिंद्र 1, बत्तीसशिराळा 1, पुणे 1, चांभारली मोहोपाडा(रत्नागिरी)1, कोंढवा (पुणे)1.
*4 बाधितांचा मृत्यु*
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दुधणेवाडी, ता. कोरेगाव येथील 59 वर्षीय पुरुष, भीमनगर ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड रुग्णालयामध्ये सांगवी ता. खंडाळा येथील 75 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष असे एकूण 4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने - 402154*
*एकूण बाधित - 64968*
*घरी सोडण्यात आलेले - 59543*
*मृत्यू - 1902*
*उपचारार्थ रुग्ण- 3523*
0000
Sunday, March 28, 2021
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले 15 एप्रिल पर्यंत कलम 144 चे सुधारीत आदेश...जिल्ह्यात काय राहणार बंद...आणि काय राहणार सुरू...??
सातारा दि.28 (जिमाका): कोविड 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक 27 मार्च 2021रोजी दिलेल्या सुधारीत सुचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कलम 144 नुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत. हे आदेश 15 एप्रिल रोजीच्या रात्रीपर्यंत पुढीलप्रमाणे लागू राहतील.
I) *सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करणेत येत आहेत*
1) सातारा जिल्हयात रात्रीचे 08.00 वाजलेपासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणेत येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
2) इयत्ता 9 वी पर्यंत सर्व वर्ग (निवासी शाळा वगळून), प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्सिटयुट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट बंद राहतील. तथापी, निवासी शाळा, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषता आंतरराष्ट्रीय विदयार्थ्यांचे वसतीगृह, इयत्ता 10 वी व त्यापुढील सर्व वर्ग, महाविदयालये, शैक्षणिक संस्था चालू ठेवणेस परवानगी असेल. ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील. ऑनलाईन शिक्षण आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील. त्यासाठी शिक्षण विभागाने, आरोग्य व सुरक्षीततेबाबत निर्धारित केले आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औदयोगिक प्रशिक्षण उपक्रम (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मंडळ किंवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर मंत्रालयामध्ये, नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उदयोजकता प्रशिक्षण घेणेस परवानगी राहील. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD), भारतीय उदयोजक संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण प्रदाते यांना देखील परवानगी राहील. त्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण हे प्राधान्यप्राप्त अध्यापनाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी, केवळ उच्च शिक्षण संस्था (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील. केंद्रीय वित्तपुरवठा उच्च शिक्षणासाठी संस्था, संस्था प्रमुख यांची स्वत:ची खात्री झाले नंतरच प्रयोगशाळा / प्रयोगात्मक कामांसाठी विदयार्थांना बोलवणेस परवानगी राहील. इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विदयापीठे, खाजगी विदयापीठे, इत्यादी, ते केवळ संशोधन अभ्यासक (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/ प्रायोगिक कामासाठी परवानगी राहील.
सर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करून काम करणेची परवानगी राहील. यशदा, वनमती, मित्र, एमईआरआय इत्यादी विविध सरकारी ऑफलाईन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात उघडण्यास परवानगी असेल. संबंधित प्रशासकीय विभागामार्फत निर्गमित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक असेल.
3) रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असलेस किंवा आदर्श कार्यप्रणालीनुसार चालू राहील.
4) सर्व सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम (यात्रा/जत्रा इत्यादी) तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा तसेच सभा मंडप, मोकळया जागेत होणारे इतर कार्यक्रम बंद राहतील. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील.
5) सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत येत आहे.
6) पाच पेक्षा जास्त व्यक्तींना, रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यत एकत्र येणेस मनाई करणेत येत आहे.
7) शासकीय कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी, लोकप्रतिनिधी व्यतिरीक्त इतर अभ्यंगतांना बैठकीसाठी बोलविल्याशिवाय तसेच तातडीच्या कामाव्यतिरीक्त येणेस मनाई करणेत येत आहे.
I) *सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील*
1) मॉल, हॉटेल, फुड कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीतच चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तसेच याच कालावधीमध्ये घरपोच सुविधा चालू राहील. तथापि, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत बंद राहील.
2) कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल/थिएटर/मल्टिप्लेक्स/ नाटक थिएटर हे आसनाच्या 50% क्षमतेने सकाळी 7.00 ते सायंकाळी 8.00 या कालावधीतच चालू राहील. यामध्ये कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही तोपर्यत बंद राहील.
3) सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे/ समारंभाचे आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नैआ/कावि/437/2021 दि. 02/03/2021 मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झालेस संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झालेस रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करुन, शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित मालमंत्ता बंद राहील. तसेच कार्यक्रम आयोजकांकडून रक्कम रुपये 10,000/-दंड व फौजदारी कारवाई करावी
4) उत्पादन क्षेत्र पुर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकेल. तथापि संबंधित आस्थापना यांनी मास्कशिवाय तसेच थर्मल स्किनींग शिवाय प्रवेश न देणे, सॅनिटायझरचा वापर तसेच उत्पादनाच्या ठिकाणी त्यांचे कामगारामध्ये पुरेसे सामाजिक अंतर, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित उत्पादक युनिट बंद राहील.
5) अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील.
6) सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 7.00 ते सायंकाळी 8.00 वा. या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत.
7) वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देणेत येत आहे. (घरपोच वितरणासह)
8) कन्टेनमेंट झोन बाहेर, व्यवसायाच्या अनुषंगाने प्रदर्शनास परवानगी राहील. त्यासाठी औद्योगिक विभागाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
9) सातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैदयकीय आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवा पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील.
10) ऑक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे.
11) आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेवर कार्यरत राहतील.शासकीय / निमशासकीय कार्यालयाच्या बाबतीत कार्यालय प्रमुखांनी कोविड -19 चे नियमाचे पालन करुन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेणेत यावा.
12) कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात स्थनिक साप्ताहीक बाजार (जनावरांसह) उघडणेस परवानगी राहील. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
13) राज्य व केंद्र शासनाने कोविड 19 बाबत ठरविलेल्या राजशिष्ठाचारानुसार सर्व रेल्वे यांना राज्यात सुरवात ते शेवट पर्यत प्रवास मुभा राहील.रेल्वेने रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी व मुद्रांकन करणेची आवश्यक नाही. तथापी कोविड- 19 च्या अनुषंगाने या प्रवाश्यांनी सामाजीक आंतर व स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे.
14) केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/1572/2020 दि. 27/06/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.
15) सातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/1477/2020 दि. 11/06/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.
16) इंनडोअर हॉल मधील खेळाच्या सुविधा चालू करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2740/2020 दि. 19/10/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.
17) सातारा जिल्हयातील व्यायामशाळा चालू करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2765-अ/2020 दि. 23/10/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.
18) सातारा जिल्हयातील पर्यटन स्थळे खुली करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2923/2020 दि. 04/11/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.
19) राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिडापट्टूंच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जलतरण तलावांना परवानगी देणेत येत आहे. यासाठी क्रिडा व युवा व्यवहार विभागाकडून निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
20) कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात योग संस्था चालु करणेस परवानगी राहील. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
21) बॅडमिंटन, टेनिस स्क्वॅश, इनडोअर शुटिंग रेंज इ. सर्व खेळांमध्ये शारिरीक व स्वच्छताविषयक पालन करुन चालु करणेस परवानगी राहील.
22) धार्मिक स्थळांच्या ट्रस्ट/बोर्डाने/अधिकृत केलेल्या निर्णयानुसार कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्व सामान्यांसाठी चालू करणेत येत आहेत. तथापि, मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/ डीआय एसएम-1 दि. 14/11/2020 अन्वये निर्गमित करणेत आलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच, मास्कशिवाय प्रवेश न देणे. विश्वस्तांनी थर्मल स्किनींग केले शिवाय भाविकांना प्रवेश न देणे, सॅनिटायझरचा वापर करणे. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे परीसरातील उपलब्ध जागेचा विचार करुन, सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी प्रतितास किती भाविकांना प्रवेश द्यावा याबाबतची निश्चिती करावी. शक्यतो दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करावी.
23) राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण संस्था व क्रीडा स्पर्धा / बैठक/ खेळांचे आयोजन आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी विविध संस्था यांना कंटेनमेंट झोनच्या बाहेर काम करण्यास परवानगी असेल. यामध्ये राज्यातील विविध खेळांच्या स्पोर्टस ॲकॅडमीचा समावेश असेल. तसेच क्रीडा व युवा कार्य विभागामार्फत निर्गमित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
24) गृह अलगीकरणास खालील प्रतिबंधास अधिन राहून परवानगी असेल.
1.गृह अलगीकरण झालेल्या नागरीक/रुग्णाविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायीकाच्या (डॉक्टर) यांच्या देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक आहे.
2. कोविड -19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरुवातीच्या दिवसापासून 14 दिवसांपर्यत दर्शनी ठिकाणी फलक लावावा, जेणेकरुन त्या ठिकाणी कोविड - 19 रुग्ण असलेची माहिती नागरीकांना होईल.
3. कोविड -19 संक्रमित रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine) असा शिक्का उमटवावा.
4. कोविड -19 रुग्ण गृह अलगीकरण ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तिंनीही कमीत कमी संपर्क ठेवावा.तसेच मास्क परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही,याची दक्षता घ्यावी
5. गृह अलगीकरणाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस, कोविड -19 रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरीक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये (CCC) स्थलांतरीत करावे.
25) RTPCR चाचण्यांचे प्रमाण विशेष प्रयत्न करुन 70 %पेक्षा अधिक प्रमाणात वाढविण्यात यावे.
26) कोविड-19 सकारात्मक व्यक्तिंचे संपर्क शोधणे - सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तींचे तात्काळ अलगीकरण करणे, त्याचे संपर्क शोधुन काढून त्यांचे अलगीकरण करणे बंधनकारक असेल. अशा संपर्कातील व्यक्ती किंवा कोविड -19 बाधित रुग्णास गृह अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नसलेस संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.
27) विहीत केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या आणि रुग्ण संपर्क शोधणे याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची जबाबदारी स्थानिक प्रशासन, पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाची असेल.
28) मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी पारित केलेले आदेशामध्ये नमूद केलेल्या सुचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. तसेच अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,सातारा यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट/सामान्य आदेशाव्दारे परवानगी देणेत आलेली कृती करणेस मुभा राहील.
III) *कोविड -19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झालेस दंडात्मक/फौजदारी कारवाईस पात्र राहील*
1) सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारावा.
2) सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु दंड आकारावा
3) दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन झालेस ग्रामीण भागासाठी र.रु.2000/- व शहरी भागासाठी र. रु. 3000/- दंड आकारावा. तसेच 7 दिवसापर्यत दुकान सक्तीने बंद करावे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.
4) हॉटेल, रिसॉर्ट, लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी आयोजीत करणेत आलेल्या कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नैआ/कावि/437/2021 दि. 02/03/2021 नुसार कार्यवाही करावी.
5) जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
6) पाच पेक्षा जास्त व्यक्तींना, रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यत एकत्र आल्यास प्रत्येकी रक्कम रुपये 1000/- दंड आकारावा.
7) बाग, उदयाने आणि करमणुकीच्या उददेशाने सार्वजनिक मोकळया जागा रात्री 08.00 ते सकाळी 7.00 वा या कालावधीत बंद राहतील. उल्लंघन करणाऱ्यावर प्रत्येकी 1000/- दंड आकारावा.
8) सार्वजनिक वाहतुक काही निर्बंधासह चालू करणेत आली आहे. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यास रक्कम रुपये 500/- दंड आकारणेत येईल. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने करावी.
IV) *कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील*
1) शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे.
2) कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. THERMAL SACNNING, हॅडवॉश, सॅनिटायझर, याची ENTRY POINT व EXIT POINT वर व्यवस्था करावी.
3) कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे.
V) *आरोग्य सेतु ॲप चा वापर* - जिल्हयातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील.
VI) ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो, त्या ठिकाणी CONTAINMENT ZONE जाहिर करणेचे अधिकार INCIDENT COMMANDER म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देणेत आलेले आहेत. संबंधित CONTAINMENT ZONE बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील. हा आदेश CONTAINMENT ZONE वगळता सातारा जिल्हयातील इतर क्षेत्रासाठी लागू राहिल तसेच CONTAINMENT ZONE बाबत त्या त्या क्षेत्रातील INCIDENT COMMANDER यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच CONTAINMENT ZONE INACTIVE झालेनंतर सदर क्षेत्राला इकडील आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने CONTAINMENT ZONE जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील.
*कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, सदर आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करून किंवा नवीन आदेश पारीत करून या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचे पुर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.*
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 27/03/2021 मधील Annexure III मध्ये नमूद केलेप्रामणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी.
000
407 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 407 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 6, शहरातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 3, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 1, कोटेश्वर मंदिरजवळ 2, गडकर आळी 1, कल्याण सन्मित्र सोसायटी 1, कमानी हौदाजवळ 1, रामाचा गोट 1, शाहूपूरी 2, अमरलक्ष्मी 1 शिवम कॉलनी 1, देवी कॉलनी 1, करंजे 1, सिव्हील 3, कांगा कॉलनी 2, विकासनगर 1, कल्परत्न सोसासटी 1, कोल्हटकर आळी 1, देशमुखनगर 1, साईबाबा मंदिरजवळ 1, समर्थनगर 1, वनवासवाडी 1, प्रकाशनगर 2, झरेवाडी 1, शेंद्रे 1, कोडोली 2, बोरखळ 2, शिवथर 1, सोनगाव 4, खोकडवाडी 1, अपशिंगे 4, गणेशवाडी 2, कोंडवे 1, बसाप्पावाडी 1, कण्हेर 1, खोजेवाडी 12, शहापूर 4, निनामपाडळी 1, निवदे 1, नागठाणे 2, मल्हार पेठ 1, आरडगाव 1, कोर्टी 1, कौंदणी 1, मोती चौक 2, वासोळे 1, वाढे 1, पाटेघर 5, देगाव 1, धावडशी 1, कुस बु. 1, मर्ढे 1,
*कराड तालुक्यातील* कराड 4, शहरातील शुक्रवार पेठ 1, एकवीरा कॉलनी 1, शनिवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, कार्वे नाका1, मंगळवार पेठ 1, मुंढे 2, रुक्मीणीगार्डनजवळ 1, सोमवार पेठ 1, विद्यानगर 5, मलकापूर 1, आगाशिवनगर 6, पेरले 1, येणके 2, रेठरे बु.3, वहागाव 1, साबळेवाडी 1, कलंत्रेवाडी 1, आटके 1, शेरे 2, कोडोली 1, जुळेवाडी 1, खुडेवाडी 1, विंग 1
*पाटण तालुक्यातील* उब्रंज-पाटण रोड 1,कडणे 1, माजगाव 1, आसलेवाडी 1, हंबराई 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, स्वामी विवेकानंदनगर 4, विडणी 5, निंभोरे 1, बरड 2, गुणवरे 4, मिरढे 2, शिंदेवाडी 1, तरडगाव 2, निरगुडी 1, कोळकी 9, सुरवडी 1, वडजल 4, दुधेभावी 2, पिंप्रद 2, गोखळी 1, राजाळे 3, माठाचीवाडी 1, वडले 1, साठेगाव 1, सरडे 2, हणूमंतवाडी 1, सोनवडी बु.1, सोनवडी खुर्द 1, जयवंतनगर 1, गिरवी 2, लक्ष्मीनगर 4, संगवी 1, जाधववाडी 3, पदमावतीनगर 1, धुमाळवाडी 1, इंदिरानगर 1, आदर्की बु.1, सस्तेवाडी 1, राजूरी 1, बिरदेवनगर 2, हिंगणगाव 1,
*खटाव तालुक्यातील* वडूज 1, इंजबाव 5, खुटबाव 1,
*माण तालुक्यातील* मोही 1, ढाकणी 1, धामणी 1, दिडवाघवाडी 1, कोडलकरवाडी 2, मार्डी 1, म्हसवड 19, वरकुटे मलवडी 2, वावरहिरे 2,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 8, सातारा रोड 3, सोनके 1, वाठार स्टेशन 1, करंजखोप 3, रहिमतपूर 4, सुर्ली 1, तडवळे 1, साप 1, बनवडी 1, पिंपरी 2, तांदुळवाडी 1, भोसे 1, दुधनवाडी 1, कुमठे 1, ल्हासूर्णे 1, नंदगिरी 1, पिंप्रद 1, रणदुल्लाबाद 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 21, पळशी 5, लोणी 1, नायगाव 1, गुठळे 2, संगवी 1, भांदे 1, लोंणद 11, वाठारकॉलनी 1, वहागाव 2, मोरवे 2, विंग 1, खंडाळा 1, मिरजे 1, भाटकी 1, पाडेगाव 1, पवारवाडी 1, शेखमिरवाडी 1.
*वाई तालुक्यातील* वाई शहरातील रविवार पेठ 2, सोनगिरवाडी3, चिखली 1, धावली 1, भूईज 1, चाहूर 1, ओझर्डे 2, पांडेवाडी 3, रामडोह आळी 1, धर्मपूरी 2, धोम 1, सह्याद्रीनगर 1.
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, सिल्वर व्हॅली खिंगर 1, मुनवर सोसायटी 4, खॉजाभाइ सोसायटी 1, रांजणवाडी 1, क्षेत्रमहाबहेश्वर 2, महाबळेश्वर बसस्थानकाजवळ 1, नगरपालिका सोसायटी 1, दांडेघर 1, कलमगाव 1, मेटगुताड 1, पाचगणी 1,
*जावळी तालुक्यातील* वलुथ 1,
*इतर* निरा (पुणे) 1, इस्लामपूर (सांगली )1, वाळवा (सांगली ) 1, बालाजीनगर (पुणे) 1.
*एका बाधितांचा मृत्यु*
खासगी रुग्णालयात शिरंबे ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने - 399756*
*एकूण बाधित - 64506*
*घरी सोडण्यात आलेले - 59464*
*मृत्यू - 1898*
*उपचारार्थ रुग्ण- 3154*
0000
Saturday, March 27, 2021
सातारा शेजारील शहरात पडला ' लॉक डाऊन"...अत्यावश्यक सेवा घरपोच पद्धतीने दिल्या जाणार...
कराड
कोरोनाचा वाढता कहर पाहता शिरवळ शहराला प्रतिबंधक शहर म्हणून आज प्रांताधिकारी यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे शिरवळमध्ये आजपासून लॉक डाऊन पडला आहे त्याठिकाणी अत्यावश्यक सेवा घरपोच पद्धतीने दिल्या जाणार आहेत.
शिरवळ शहराच्या प्रतिबंधक क्षेत्राच्या सर्व बाजू पुढील आदेश येईतोपर्यंत सीलबंद करण्यात आल्या आहेत प्रतिबंध क्षेत्रातील सर्व आस्थापना दुकाने व व्यवसाय बंद राहणार आहेत अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध औषधे भाजीपाला खते किरणामाल इत्यादी सेवा घरपोच पद्धतीने चालू राहणार आहेत ज्या परिसरात रुग्ण आढळला आहे तिथे कोणीही वैद्यकीय कारणा शिवाय बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेतली आहे रुग्णाच्या सहवासातील लोकांची यादी करून प्रतिबंधक क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करून घेण्याबाबत आदेश देण्यात आलेत
दरम्यान शहरात लॉक डाऊन पडणार कळल्यावर लोकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती
चौकशीत वाझे काय बोलणार... या चिंतेमुळे त्याचे सारेच मालक अस्वस्थ - फडणवीस
सचिन वाझे प्रकरणामुळे जेवढी बदनामी महाराष्ट्राची झाली,तेवढी कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही.पोलिस दलातील बदल्या, त्यासाठी पैसे घेणे, हप्ते वसुलीचे टार्गेट देणे यातून एक सिंडीकेट राज वाझेंच्या भरवशावर चालविण्यात आले.त्यामुळेच सचिन वाझेंचे सारे मालक आज चिंतेत आहेत,असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.दरम्यान चौकशीत आता वाझे काय-काय बोलणार, यामुळे त्याचे सारेच मालक अस्वस्थ आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
नागपूर येथे आगमन झाले असता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले एनआयएच्या चौकशीत आता वाझे काय-काय बोलणार, यामुळे त्याचे सारेच मालक अस्वस्थ आहेत. पण, काळजी करण्याचे कारण नाही. एनआयएच्या चौकशीत सारे काही स्पष्ट होणार आहे. बदल्यांच्या रॅकेटसंदर्भातील अहवाल आपण फोडला,असा आरोप नवाब मलिक यांच्याकडून गेला गेला,यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले की, पोलिस बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे गेल्याने सारेच घाबरले आहेत. आपले कोणते बिंग फुटणार,याची त्यांना चिंता लागून आहे. असे असले तरी मी केवळ कव्हरिंग लेटर दिले होते. खरे तर नवाब मलिक यांनीच हा अहवाल फोडला आहे.
मुंबई पोलिस आयुक्तालयातील डीव्हीआरबाबत माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, आपल्या सरकारच्या काळात मुंबईत सीसीटीव्ही यंत्रणा लागली आहे.डीव्हीआर कुणीही गायब केला तरी त्याचे संपूर्ण बॅकअप मेन सर्व्हरमध्ये सुद्धा जमा होत असते. त्यामुळे तो गायब होऊच शकत नाही. त्याचे मिरर इमेजिंग सुद्धा होते. त्याचे डिजिटल फुटप्रिंट ३ ठिकाणी जमा होते. कोणताही एक माणूस ते नष्ट करू शकत नाही. एनआयएच्या चौकशीत सा-या बाबी हळूहळू पुढे येतील. नेमकी हीच भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. वाझेचे खरे मालक महाविकास आघाडीतच आहेत. त्यांच्याकडून ज्यांनी कामे करवून घेतली, ती आता बाहेर येतील का, हीच चिंता त्यांना सतावते आहे. वाझे काय-काय बोलणार, यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत.
देशातील कोरोनाची स्थिती आणि महाराष्ट्राची स्थिती यातील अंतर इतके का आहे, याचा विचार महाराष्ट्र सरकारला करावा लागेल. जितक्या लस केंद्राने दिल्या, त्या अजूनही वापरलेल्या नाहीत. त्यामुळे उगाच केंद्रावर टीका करण्याऐवजी प्रत्यक्ष कोरोना नियंत्रणाचे उपाय राबविले पाहिजे. नागपुरातील स्थिती दिवसांगणिक भयावह होते आहे.४५०० केसेस दररोज आढळत आहेत. स्थिती गंभीर आहे. प्रशासनाने पूर्णपणे अॅक्टिव्ह मोडमध्ये जाऊन लोकांना दिलासा द्यावा आणि प्रत्यक्ष मदतही करावी, असे ते म्हणाले.
कराडमधील उद्याने कोरोनामुळे बंद...
कोरोना विषाणूमुळे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत कराड शहरातील पर्यटन स्थळांवर नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रितिसंगम घाटासह, कराडमधील उद्याने कोरोनामुळे शनिवारपासून बंद करण्यात आली आहेत.
गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील स्व. पी.डी. पाटील उद्यान, प्रितीसंगम उद्यान, टाऊन हॉल्न, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शिवाजी हौसिंग सोसायटी उद्यान कॉलनी आदी पर्यटन स्थळे बंद करण्याबाबत आदेश दिल्याने शनिवारी सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटना तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव प्रस्तावित केलेल्या विविध उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या कराड तालुक्यातील कोरोनाबाधित पालिका क्षेत्र, वॉर्ड क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. कराड शहरात कोविड-१९ प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरीता कराड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शहारातील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात यावीत , असे आशयाचे पत्र प्रांताधिकाऱ्यानी शुक्रवारी देताच शनिवारी पालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली.
शनिवारी सायंकाळी पालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित पर्यटन स्थळी जाऊन ती पर्यटकांसाठी बंद केली. पर्यटन स्थळे बंद केल्यामुळे तेथील चिमुकल्यांच्या किलबिलाटाचा आवाज आता बंद झाला आहे.
परस्परांची काळजी घेऊन साधेपणाने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन_
मुंबई, दि. २७ :- परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. त्यासाठी रविवार (दि.२८) पासून दि. १५ एप्रिल २०२१ पर्यंत रात्रीच्या ( रात्री आठ ते सकाळी ७ वा. पर्यंत) वेळी जमावबंदी लागू केली आहे. या वेळेत उद्याने, चौपाट्या अशा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्क वापरणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन अत्यावश्यक आहे. गृह विभागानेही हे सण साधेपणाने साजरे करावेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश काढण्यात आले आहेत.
या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळी, धुलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया. निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दी नकोच. एकत्र येणे टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असे मानून सण साजरे करावेत. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा देखील अशाच पद्धतीने नियम पाळून व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सणांच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
०००
1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्वं नागरिकांना कोविड लसीकरण... सकाळी 10 ते सायं 5 पर्यंत लसीकरणाचा लाभ घ्या--- प्रशासनाचे आवाहन...
सातारा दि.27 (जिमाका): केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार सातारा जिल्हयातील कोविड-19 अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरु असून यातंर्गत सातारा जिल्हयातील सर्व हेल्थ् केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार 1 एप्रिलपासून सातारा जिल्हयातही 45 वर्षावरील सर्व लोकांना कोविड - 19चे मोफत लसीकरण सुरु करणेत येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरध्द आठल्ये यांनी दिली.
सातारा जिल्हयात 45 वर्षावरील सर्व लोकांना कोविड लसीकरणाचा लाभ मिळण्याकरीता नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in या लिंक चा वापर करुन आपले नावाची नोंदणी करावी. ज्या व्यक्तींना Online नोंदणी करता येणार नाही त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरण केंद्राचे ठिकाणी सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत भेट देवुन नोंदणी करुन लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
सद्यस्थितीत सातारा जिल्हयातील सर्व शासकिय रुग्णालय (सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय व 65 प्राथमिक आरोग्य केंद्र असे 79 शासकिय व 10 खाजगी ठिकाणी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. या मध्ये सातारा जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कराड व फलटण, ग्रामीण रुग्णालय मेढा, महाबळेश्वर, खंडाळा, दहिवडी, वडूज, कोरेगांव, ढेबेवाडी. पाटण, मिशन हॉस्पीटल वाई तसेच जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (यापैकी ठोसेघर ता सातारा, येवती ता कराड, केरळ, मुरुड, सळवे, सणबुर, सोनवडे, ता. पाटण ही ठिकाणे वगळून) व तसेच नागरी आरोग्य केंद्र गोडोली, कस्तूर्बा ता. सातारा व कराड या शासकिय रुग्णालयांमध्ये सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत कोविड-19 चे लसिकरण मोफत देण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत खाजगी आरोग्य संस्था अॅन्को लाईफ सेंटर तामजाईनगर, संजीवन हॉस्पीटल सातारा, कृष्णा हॉस्पीटल कराड, सह्याद्री हॉस्पीटल कराड, शारदा हॉस्पीटल कराड, गुजर मेमोरियल हॉस्पीटल कराड, मानसी मेमोरियल हॉस्पीटल खंडाळा, पाटील हॉस्पीटल कोरेगांव, मंगलमुर्ती क्लिनिक सातारा, घोटवडेकर हॉस्पीटल वाई या ठिकाणी रुपये 250/- प्रती डोस शुल्क घेऊन लस देणेत येणार आहे.
000
365 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 365 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील* सातारा १३, शहरातील शुक्रवार पेठ 3, कृष्णानगर 1, सिव्हील कॉलनी 3, मल्हारपेठ 1, करंजे 1, करंजे पेठ 1, दौलतनगर 1, सहकारनगर 1, विकासनगर 2, सैदापूर 1, गोडोली 1, एसटी कॉलनी गोडोली 2, पिलाणीवाडी 1, कौंदणी 1, परमाळे 1, मालगाव 1, जकातवाडी 1, पाडळी 1, पिलके स्टोअर्स 1, खोजेवाडी 1, कोडोली 3, पेरले 2, विक्रांतनगर 2, जिहे1, चंदननगर 2, राजापूरी 4, देगाव 1, दत्तनगर 1, सोनगाव 1, रायगाव 1, टोळेवाडी 1, लिंबगोवे 1, खिंडवाडी 1, त्रिपूटी 2, माजगाव 1, आळेवाडी 2, कोंडवे 1.
कराड तालुक्यातील* कराड 6, शहरातील मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 4, विद्यानगर 1, खुबी 3, बेलवडे बु.1, बारवकरनगर 2, कोडोली 1, शेरे 4, संगमनगर 1, शेणोली 1, मलकापूर 6, कोळेवाडी 1, घोणशी 1, पाडळी 4, हेळगाव 1, साकुर्डी 3, सुपने 3, देलेवाडी 1, केसे 6, अंधारवाडी 1, कासारशिरंबे 1, चरेगाव 1, वनमासमाची वाडी 1, गुरुवार पेठ 1, काले 1, तळबीड 1, जुळेवाडी 1, उंडाळे1 , कार्वे 1,
पाटण तालुक्यातील* पाटण 1, कडेकरवाडी 1,शिंदेवाडी 1, नवारस्ता 1, सुळेवाडी 1, चोपडी 1, सोनवडे 2, अडूळ 1, मोरगिरी 1, डवरी 1, चोपदारवाडी 1, पापर्डे 1, भांबे 1, घोट 1,
फलटण तालुक्यातील* फलटण 7, शहरातील डिएड चौक 1, सोमवार पेठ 1, कसबा पेठ 1, रामबाग 1, जिंती नाका 1, बुधवार पेठ 1, हडको कॉलनी 1, रविवार पेठ 4, गिरवी नाका 1, भडकमकरनगर 1, संजीवराजेनगर 3, गोळीबार मैदान 1, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 5, नाइकबोमवाडी 1, कोळकी 13, घाडगेमळा 1, तरडगाव 6, मलठण 3, शुक्रवार पेठ 2, राजाळे 2, शिंदेवाडी 2, गोखळी 1, निंबोडी 6, मळेगाव 2, विडणी 1, संगवी 1, गुणवरे 1, गुरसाळे 1, निंबळक 1, चव्हाणवाडी 1, ठाकूरकी 1, आळजापूर 1, ताथवडा 1, निरगुडी 1, सोनवडी 4, वाखरी 1, माठाचीवाडी 2, वाठार निंबळक 1, जाधववाडी 3, मिरगाव 1, हिंगणगाव 1, साखरवाडी 1, बोडकेवाडी 2, बिरदेवनगर 3, मुरुम 1
*खटाव तालुक्यातील* राजापूर 1, ललगुण 1, पुसेसावळी 1,
*माण तालुक्यातील* माण 1, खडकी 1, राणंद 1, काळचौंडी 1, शेटेमळा म्हसवड 2.
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 7, सालपे 2, आर्वी 1, टकले 1, जांबखुर्द 1, किन्हई 1, चिमणगाव 1, आसरे 1, ल्हासूर्णे 1, वाठार स्टेशन 1.
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 3, भादे 4, लोणंद 19, आरडगाव 1, शेरेचेवाडी 1, खानवडी 1, शिरवळ 8, विंग 1, गुठळे 1, लोणी 5, धनगरवाडी 2, नायगाव 1, पाडेगाव 1, बावडा 1, पडळ 1.
*वाई तालुक्यातील* वाई शहरातील रविवार पेठ 1, किसनवीर चौक 1, बावधन 1, धावडी 1, व्याजवाडी 1, सोनगिरवाडी 2, पाचवड 1, भूईज 1, सुरुर 1, वेलंग 1, खडकी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर शहरातील वॉटरसप्लाय 1, मनोहर सोसायटी 1, गवळी मोहल्ला 2, स्कुल मोहल्ला 1, पाचगणी 6, मेटगुताड 1, मधूसागर 1, नाकिंदा 1, गोगवे 1,
*इतर* हडपसर (पुणे)2, वाळवा (सांगली) 1,
*4 बाधितांचा मृत्यु*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे रांजणवाडी ता. माण येथील 67 वर्षीय महिला, गोरेवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, विविध खासगी रुग्णालयात गौळीबार मैदान सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, पांढरवाडी ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष या चार कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने - 397511*
*एकूण बाधित - 64104*
*घरी सोडण्यात आलेले - 59307*
*मृत्यू - 1897*
*उपचारार्थ रुग्ण- 2900*
0000
सचिन तेंडुलकर कोरोना पोझिटिव्ह...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याने शनिवारी याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. त्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सचिन सध्या होम क्वारंटाइन आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे.
सचिनने सांगितले की, मी सलग माझी टेस्ट करुन घेत होतो आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व काळजी घेत होतो. तरीही मी कोरोनाच्या विळख्यात सापडलो आहे. मी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मला सौम्य लक्षणे आढळली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन सचिनने केले आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. नुकतीच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही कोरोनाची लागण झाली आहे. देशातील अनेक दिग्गजांनाही कोरोनाने विळखा घातला आहे.
Friday, March 26, 2021
राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी... राज्यात लॉक डाऊन करण्याची इच्छा नाहीये... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य...
मुंबई
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत दरम्यान राज्यात लॉक डाऊन करण्याची इच्छा नाहीये...असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे....
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक,जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ दीपक सावंत,मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड,मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता,महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.
लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण...
मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
धोका टळला नाही उलट वाढला
ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने ही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
कडक निर्बंधांचे संकेत
जनतेने ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतू डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
लसीकरणाचा वेग वाढवा
लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषोद्धोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे
याचीही काळजी घ्या
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्नि सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेडस ची संख्या वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला ५० हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टींगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
अधिक लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी करावी- अमित देशमुख
गावात लसीकरणाची पुर्वतयारी झाली का याची शहनिशा केली जावी तसेच लसीकरणाचा वेग वाढवतांना राज्याला केंद्राकडून मोठ्यासंख्येने लस उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे मागणी करावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. त्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी त्याची मागणी उत्पादकांपर्यंत वेळेत पोहोचण्याची गरजही व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालये सुरु होण्यापूर्वी शिक्षक आणि प्राध्यापकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, ट्रान्सपोर्ट व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांनाही लस देण्यात यावी असेही ते म्हणाले. राज्याच्या ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई पुण्याप्रमाणे ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढते आहे तिथे ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी, तसेच लक्षणे नसलेल्या परंतू विलगीकरणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी कोविड सेंटर्स उभारली जावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या.
राज्यात ५२ लाख लोकांना लस देण्यात आली असून राज्य आजघडीला लसीकरणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
...
केंद्र सरकारच्या विरोधात कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन ; शेतकरी कायदा, आणि पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात कराडच्या दत्त चौकात केला निषेध ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आणि राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कराड येथे दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून केंद्र सरकारने केलेला शेतकरी कायदा, पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ, गॅस दरवाढ विरोधी निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने केलेले शेतकरी कायदे, रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, केंद्रातील . इंधन गॅस, पेट्रोल, डिझेलच्या प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. म्हणून संयुक्त किसन मोर्चा या बॅनरखाली देशातील ५०० पेक्षा जास्त संघटना, पक्ष एकत्र येऊन दिल्ली येथे शेतकरी बांधव गेली 100 दिवसांपासून जास्त काळ आंदोलन करत आहेत.या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
याप्रसंगी कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार बटाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पोपटराव साळुंखे, अखतर अंबेकरी, शिवाजी पवार, माजी नगरसेवक सुहास पवार, मोहम्मद आवटे, अनिल धोतरे, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, माजी उपनगराध्यक्ष संभाजीराव सुर्वे, भाऊ पवार, सतीश भोंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क प्रमुख सुहेल बारस्कर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
495 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.26 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 495 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील* सातारा 14, शनिवार पेठ 3, रविवार पेठ 1, विद्यानगर 2, लिंब 1, शिवथर 2, कोडोली 2, गोडोली 5, सदर बझार 4, शाहुनगर 3, गजवडी 1, खेड 2, चिंचणेर वंदन 1, आरे 1, अंबवडे बु 3, कारंडी 2, अपशिंगे 1, शेरेवाडी 1, पाटेघर 2, शहापूर 1, एकसळ 1, शेरेवाडी 7, सोनपूर 1, मालनपूर 1, करंजे पेठ 1, यादोगापाळपेठ 4, कमानी हौद 1, सोमवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2, कुरुन 1, मल्हार पेठ 1, समर्थ मंदिर 1, अलेवाडी 1, शाहुपुरी 1, किडगाव 1, धनगरवाडी 1, कठापूर 1, कोंढवे 1, पाडळी 9, निनाम 3, सायगाव 1,
कराड तालुक्यातील* कराड 15, विद्यानगर 3, सोमवार पेठ 1, शेरे 1, गुरसाळे 1, तांबवे 1, काले 1, विंग 3, जुळेवाडी 3, हजारमाची 2, मसूर 2, कुसुर 1, येळगाव 1, मलकापूर 2, आगाशिवनगर 2, वारुंजी 1, साळशिरंभे 1, व्याघेरी 1, सुपणे 1,
फलटण तालुक्यातील* फलटण 5, शुक्रवार पेठ 3, रविवार पेठ 2, लक्ष्मीनगर 10, बुधवार पेठ 1, विद्यानगर 1, बुरुड गल्ली 1, संजीवराजे नगर 1, उमाजी नाईक चौक 1, खाटीक गल्ली 1, भडकमकरनगर 1, गोळीबार मैदान 2, जिंती रोड 1, सगुणामाता नगर 6, कसबा पेठ 4, मलठण 4, दत्तनगर 1, शिंदेवाडी 2, जाधववाडी 1, कोळकी 8, आदर्की 1, गिरवी नाका 2, पिराचीवाडी 1, कुरवली 2, वाठार निंबाळकर 2, धुमाळवाडी 1, मुरुम 2, साखरवाडी 1, खुंटे 2, वाखरी 1, नवा मळा ठाकुरकी 2, मिरेवाडी 1, सोनवडी 1, विढणी 1, गुणवरे 1, घाडगेवाडी 1, पिंपळवाडी 3, वडले 1, फडतरवाडी 1, आंदरुड 1, गोखळी 2, काळज 1, चौधरवाडी 2, भाडळी खु 1, गिरवी 2, निरगुडी 1, सुरवडी 1,
*माण तालुक्यातील* दिवड 3, मलवडी 6, म्हसवड 6, दहिवडी 2, भकती 1, पळशी 1, कोडालकरवाडी 2, जांभुळणी 1, शिंदी खु 1, बिदाल 3, गोदंवले खु 2, टाकेवाडी 1,
खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, लोणंद 6, शिरवळ 1, निंबोडी 2, मोर्वे 1, पाडेगाव 2, अहिरे 2,
*वाई तालुक्यातील* वाई 1, रविवार पेठ 2, सतालेवाडी 1, धोम कॉलनी 1, एमआयडीसी 1, पांडेवाडी 1, शेंदूरजणे 1, खोलेवाडी 1, बावधन 5, यशवंतनगरी 1,व्याजवाडी 2, वेळे 2, मलटापूर 1, भुईंज 3, मांढारदेव 1, शिवाजीनगर 1, सिध्दनाथवाडी 1, कवठे 1, मोरजीवाडा 1, लागडवाडी 1,
जावली तालुक्यातील* जावळी 2, कुडाळ 1, रांगणेघर 1, मेढा 1, मोरघर 1, सोनगाव 5, वाळंजवाडी 1, अंधारी 6, माहीगाव 2, निझरे 1, तांबी 1, कुसुंबी 1, आनेवाडी 1.
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, बुध 3, पुसेगाव 5, काटवडी बु 2, मायणी 2, वेटाणे 1, ललगुण 1, भोसरी 4, नांदोशी 2, पुसेसावळी 4, लाडेगाव 1, कुरोली 1, जाखणगाव 2, काळेवाडी 1, फडतरेवाडी 1, मोळ 1, मुसंडवाडी 1, होळीचागाव 1, गुरसाळे 2, औंध 6, विसापूर 1, गोडसेवाडी 1, खतगुण 1, तडवळे 4, वडूज 1, एनकुळ 1, तुपेवाडी 1, भुरुकवाडी 7, ध्रापुडी 2, वरुड 1,
कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 12, जळगाव 1, बिचुकले 2, तांदुळवाडी 1, चौधरवाडी 2, वाठार स्टेशन 14, ल्हासुर्णे 2, पिंपोड बु 1, रहिमतपूर 2, गोगावलेवाडी 1, साप 2, किरोली 2, मोहितेवाडी 1,वाठार 1, पिंपाडे बु 1, अंबवडे पळशी 4, धामणेर 1, अरबवाडी 1, देऊर 1, धोंडवाडी 1,तडवळे 1, अर्वी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 8, क्षेत्र महाबळेश्वर 1, खारोशी 1, तापोळा 1, आंब्रळ 1, भोसे 2, डोगेघर 2, गोदावली 1, मेटगुटाड 1,
*पाटण तालुक्यातील* पाटण 1, सणबूर 1, चाळकेवाडी 1, गोरेवाडी 1, दौलतनगर 1.
*इतर* 18, विकास नगर 5, चाहुर खेड 2,
*बाहेरील जिल्ह्यातील* औरंगाबाद 2, पुणे 1, शिराळा 1, सांगली 1, पंढरपूर 1.
1 बाधितांचा मृत्यु*
जिल्हा रुग्णालय सातारा येथील भांबे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष अशा एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -395293*
*एकूण बाधित -63739*
*घरी सोडण्यात आलेले -58983*
*मृत्यू -1893*
*उपचारार्थ रुग्ण-2863*
0000
Thursday, March 25, 2021
278 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 278 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -392370*
*एकूण बाधित -63247*
*घरी सोडण्यात आलेले -58983*
*मृत्यू -1892*
*उपचारार्थ रुग्ण-2372*
00000
गुड फ्रायडे व इस्टर सन्डे उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आदेश
सातारा दि.25 (जिमाका): कोरोनाचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता गुड फ्रायडे व इस्टर सन्डे हे उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 11973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारानुसार जारी केले आहेत.
याआदेशानुसार दि. 28 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान "होली विक" मध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्या वेळी चर्चमधील जागेनुसार लोकांच्या उपस्थितीचे नियमन करावे. मोठे चर्च असल्यास त्यामध्ये जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती व चर्चमधील जागा कमी असल्यास तिथे 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. जणेकरुन चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी न होत सोशल डिस्टन्सींग राहील. आवश्यकतेनुसार 4 ते 5 खास प्रार्थना सभांचे आयोजन करावे. भाविकांना प्रार्थनासभेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल. तसेच चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था चर्चचे व्यवस्थापक यांनी करावी. चर्चचे व्यवस्थापक यांनी प्रार्थना सभेच्या वेळी ऑनलाईन प्रक्षेपाणाची सुविधा उपलबध करुन देण्याची व्यवस्था करावी. तसेच या सणांसाठी दिले जाणारे संदेश व्हॉटस्ॲप, फेसबुक, युट्युब यासारख्या सोशल मिडीया माध्यमांतून प्रासरीत करावे. चर्चच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे वा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु नयेत. तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. या आदेशापेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनांनी यापूर्वी लादले असतील तर ते लागू राहतील अथवा यानंतर देखील कडक निर्बंध लादू शकतील. या आदेशानंतर काही नवीन सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भातीय साथरोग अधिनियम 1897 व भातीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आदेशात नमुद केले आहे.
0000
कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांची संकलन यादी करुन जमीन वाटपाची प्रक्रिया सुरु करावी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. 25 :- ‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे इतर प्रश्न मार्गी लावण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. ‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करुन येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, सातारा जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली, मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (व्हिसीद्वारे), पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, श्रमिक मुक्तीदलाचे नेते डॉ. भारत पाटणकर (व्हिसीद्वारे) आदी मान्यवरांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विकासात कोयना धरणाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे बघितलं जातं. या धरणासाठी प्रकल्पग्रस्त झालेल्या कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या संकलनयादीच्या अद्ययावतीकरणाचे काम कालबध्द पध्दतीने 30 एप्रिलपर्यंत पुर्ण करण्यात यावे. पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया महाराष्ट्र दिनापासून सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विशेष बाब म्हणून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ‘आयटीआय’ प्रमाणपत्रधारक पाल्यांना ‘महावितरण’मध्ये प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोयना प्रकल्पग्रस्त आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना राबविण्यात याव्यात, या माध्यमातून तेथील प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
****
होळी, धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश...
सातारा दि.25 (जिमाका): कोरोनाचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हे उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 11973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारानुसार जारी केले आहेत.
यावर्षी दि. 28 मार्च रोजी होळी, 29 मार्च रोजी धुलिवंदन व दि. 2 एप्रिल रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहे. होळी-शिमगा हा सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता साधेपणाने साजरा करावा. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.
होळी-शिमगा निमित्ताने खास करुन सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू या वर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल अशी उपाययोजना करावी. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देणे. होळी व धुलिवंदन हे उत्सव सार्वजनिक ठिकाणी व सार्वजनिक स्वरुपात आयोजित करु नये. तसेच इतर कोणतेही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. या आदेशापेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनांनी यापूर्वी लादले असतील तर ते लागू राहतील अथवा यानंतर देखील कडक निर्बंध लादू शकतील. या आदेशानंतर काही नवीन सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भातीय साथरोग अधिनियम 1897 व भातीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आदेशात नमुद केले आहे.
0000
371 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 371 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 21, सदर बझार 4, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, व्यंकटपुरा पेठ 1, शनिवार पेठ 1, शाहुनगर 2, पंताचा गोट 1, शनिवार पेठ 1, मतकर कॉलनी 11, गडकर आळी 2, देशमुख कॉलनी 1, विकास नगर 3, कोडोली 2, प्रतापगंज पेठ 1, राधिका रोड 1, नागठाणे 1, पिरवाडी 1, खोजेवाडी 1, वर्ये 1, जिहे 1, चिमणगाव 1,
*कराड तालुक्यातील* कराड 3, सोमवार पेठ 2, मलकापूर 3, वाहगाव 3, उंब्रज 1, कार्टी 1, कवठे 2, लाहोटीनगर मलकापूर 1, खराडे 1, कोयना वसाहत 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 6, कसबा पेठ 3, रविवार पेठ 7, मेटकरी गल्ली 2, बुधवार पेठ 2, रंगारी मंदिर 1, आदर्शनगर 1, कोळकी 3, आनंद नगर 2, शाहुनगर 1, गुणवरे 2, पिंप्रद 3, तरडगाव 2, लक्ष्मीनगर 5, मलठण 1, संत बापुदास नगर 2, सोमेश्वर 1, कांबळेश्वर 2, राजाळे 5, सांगवी 13, सस्तेवाडी 3, मठाचीवाडी 1, धुळदेव 2, शारदानगर कोळकी 1, नरसोबानगर कोळकी 1, पाडेगाव 1, संजगय गांधी नगर 1, भुजबळ मळा 1, दुधेबावी 1, बिरदेव नगर 2, साठेफाटा 1, हणुमंतवाडी 1, सरडे 1, विढणी 1, निंबळक 2, सोमंथळी 1, गोखळी 1, हिंगणगाव 1, फडतरवाडी 1, बोडकेवाडी 1, साखरवाडी 1,
माण तालुक्यातील* दिवड 1, म्हसवड 1, ढाकणी 1,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 2, लोण्ंद 6, मोर्वे 2, वाहगाव 2, अहिरे 3, भादे 2, धावडवाडी 1, पारगाव खंडाळा 1, शिरवळ 10,
*वाई तालुक्यातील* दत्तनगर 1, रविवार पेठ 1, गंगापूरी 1, रामढोक आळी 4, जांब 1, मालेदेवाडी 1, शिरगाव 2, पाचवड 1, पांडेवाडी 3, फुलेनगर 2, धोम कॉलनी 1, सोनगिरवाडी 1, बावधन 1, सोनजाईनगर 1, धावली 1,
*जावली तालुक्यातील* भणंग 1,
खटाव तालुक्यातील* खटाव 1, पुसेगाव 2, वडूज 2, पडळ 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, खेड 2, करंजखोप 2, एकंबे 2, बाबाचीवाडी 1, तांदुळवाडी 1, वाठा स्टेशन 3, भोसे 1, ल्हासुर्णे 1,
महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1,
*पाटण तालुक्यातील* पाटण 1, ढेबेवाडी 1, निसरे 1,
इतर* 5, पाडळी गावठाण 3,
बाहेरील जिल्ह्यातील* जालना 6, इस्लामपूर 1, कडेगाव 2, खानापूर 1, वाळवा 1, निरा 1,
*3 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पीटलमध्ये कलेढोण ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, माळेवाडी भुईंज ता. वाई येथील 42 वर्षीय पुरुष, खोजेवाडी ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -392370*
*एकूण बाधित -63247*
*घरी सोडण्यात आलेले -58705*
*मृत्यू -1892*
*उपचारार्थ रुग्ण-2650*
0000
Wednesday, March 24, 2021
123 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; राज्यात आज दिवसभरात तब्बल 28 हजार 699 नवे कोरोनाबाधित रुग्ण...
सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 123 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान,महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 28 हजार 699 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.
*एकूण नमुने -389669*
*एकूण बाधित -62875*
*घरी सोडण्यात आलेले -58705*
*मृत्यू -1889*
*उपचारार्थ रुग्ण-2281*
00000
कृष्णा कारखान्यात जे उत्कृष्ठ व्यवस्थापन आहे, ते महाराष्ट्रात इतर कुठल्याही कारखान्यात नाही ; माजी चेअरमन मदनदादांचे गौरवोद्गार...
याप्रसंगी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, संचालक दयानंद पाटील, निवासराव पाटील, संजय पाटील, सुजीत मोरे, ब्रिजराज मोहिते, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, सरपंच जयवंत कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभासदांशी संवाद साधताना मदनराव मोहिते पुढे म्हणाले, की कृष्णा कारखान्यास आज ६० वर्षे पूर्ण झाली. जुन्या लोकांनी कष्ट केले. कारखाना ही आपल्या चुलीशी निगडित संस्था आहे. पण अविनाश मोहितेंच्या पाच वर्षात जे घडले ते चुकीचे घडले. महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या इतिहासात जे घडले नाही ते कृष्णा कारखान्यात घडले. जवळपास ९५ दिवस माजी अध्यक्षाला तुरुंगात बसावे लागले. त्यामुळे काय चुकीचे व काय बरोबर हे आपल्याला समजायला हवे. कारखाना हे गंमतीचे ठिकाण नाही. लोकांची प्रगती झाली पाहिजे. व्यवस्थापन प्रामाणिक असेल तर कारखाना टिकेल. स्व. जयवंतराव भोसले यांनी पुढाकार घेतला म्हणून आज जलसिंचन योजना झाल्या. हा परिसर हिरवागार बघायला मिळत आहे.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की आज आपण कारखान्याची गाळप क्षमता वाढविली. डिस्टीलरीचे आधुनिकीकरण केले. इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढविली. कारखानदारी चांगल्या विचाराने चालवली तर टिकेल. पण मागील संचालक मंडळाने अनेक चुका केल्या, ज्या अजूनही आम्हाला भोगाव्या लागत आहेत. त्यांना गोडाऊनचे पत्रेदेखील बदलता आले नाहीत. घरात बसून कामगारांना पगार दिले गेले, ते कामगारच होते का? कार्यकर्ते पोसण्याचा प्रकार माजी अध्यक्षांनी केला. संस्था मोडून खाण्याचा उद्योग या मंडळींनी केले. आम्ही मात्र ही संस्था टिकली पाहिजे, हे एकच उद्दीष्ट ठेऊन पाच वर्षे काम केले. आज साखर कारखानदारीत पुन्हा कृष्णा पहिल्या पाचमध्ये आहे.
यावेळी सागर कणसे व त्यांच्या मित्र परिवाराने सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलमध्ये जाहीर प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचा डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मनोज पाटील, कृष्णा कामगार सोसायटीचे अध्यक्ष पैलवान आनंदराव मोहिते, नारायण शिंगाडे, संदीप पाटील, प्रतापराव कणसे, अधिकराव निकम, माणिकराव कणसे, प्रकाश कणसे, समीर पाटील यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.
...हो दुसऱ्यांदाही कोरोना होतो.....धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण...
“माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी pos0itive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी”, असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी बुधवारी रात्री केलंय.
जून 2020 मध्ये कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
यापूर्वी 12 जून 2020 रोजी धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 22 जून 2020 रोजी कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.
रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आलीय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण झालीय. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनाही कोरोना
गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे.
293 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु...
सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 293 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील*सातारा 26, शनिवार पेठ 6, गुरुवार पेठ 1, सोमवार पेठ 3, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 3,शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 2, सदाशिव पेठ 1, संगमनगर 1,कृष्णानगर 1,प्रतापगंज पेठ 1, सदरबझार 4, गोळीबार मैदान 3, यादोगोपाळ पेठ 1, विसावा नाका 2, विकास नगर 1, गोडोली 6, गडकर आळी 1, संभाजीनगर 1, शाहुपुरी 4, शाहुनगर 2, सोनगाव 1, कण्हेर 1, खोजेवाडी 6, राजापुरी 1, खेड 2, मोरेवाडी 1, सैदापूर 1, जैतापूर 1, कोंडवे 3, दौलतनगर 4, जकातवाडी 1, लिंब 1, पाडळी 1, नागठाणे 3.
कराड तालुक्यातील* कराड 6, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, विंग 1, केसे पाडळी 1, गोळेश्वर 3, मलकापूर 3, सुर्ली 1, अने 1, घोगाव 2, कुसुर 2, कर्वे नाका 1, रेठरे बु 1, वाखन रोड 2, उंब्रज 1,पाली 1, रुक्मिणी नगर 1, सैदापूर 1, खराडे 1, चिखली 1, कबीरवाडी 1, मसूर 1, यनके 1.
फलटण तालुक्यातील* फलटण 3, उमाजी नाईक चौक 1, शुक्रवार पेठ 1,दत्तनगर 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 4, लक्ष्मीनगर 4, संजीवराजे नगर 2, नारळी बाग 1, गिरवी नाका 3, तरडगाव 1, वाखरी 1, जाधववाडी 2, विचुरणी 1, सोनवडी खुर्द 1, आसु 1, हणमंतवाडी 1, उपळवे 1, कोळकी 1, मारवाड पेठ 1, तावडी 2, वडगाव 1, बिरदेवनगर 1, गजानन चौक 1, धावली 1, पुजारी कॉलनी 1.
माण तालुक्यातील*मार्डी 1, तेलदरा 1,मलवडी 1, गोंदवले बु 1.
*खंडाळा तालुक्यातील*लोणंद 2, खंडाळा 6, अहिरे 1, शिरवळ 1, जावळे 1, नायगाव 1, शिरवळ 4.
*वाई तालुक्यातील* वाई 2,यशवंतनगर 1, धर्मपुरी 5, पसरणी 2, गंगापुरी 1, पाचवड 1.
*जावली तालुक्यातील* जावली 2, सायगाव 1, ताळेमाळ 1, कुडाळ 1.
*खटाव तालुक्यातील* पुसेगाव 3,गुरसाळे 1, पुसेसावळी 1.
कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 4, एकसळ 4, त्रीपुटी 1,तडवळे 1, ल्हासुर्णे 2, जळगाव 1, नलवडेवाडी 4, नांदवळ 2, वाठार स्टेशन 4.
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 5, घोनसपुर 11, रांजणवाडी 1.
*पाटण तालुक्यातील* पाटण 1, ढेबेवाडी 2, म्हावशी 1, मालदन 1, सुतारवाडी 2, सुर्यवंशीवाडी 1.
*इतर* 9, जाधववाडी 1, खावली 1, ततली 1, विखरी 2, देगाव 2, किकली 1, वहागाव 2
*बाहेरील जिल्ह्यातील* पुणे 2, राजस्थान 1, जालना 2,
2 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पीटलमध्ये राजुरी ता. फलटण येथील 55 वर्षीय पुरुष व शुक्रवार पेठ, कराड येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -389669*
*एकूण बाधित -62875*
*घरी सोडण्यात आलेले -58582*
*मृत्यू -1889*
*उपचारार्थ रुग्ण-2404*
0000
Tuesday, March 23, 2021
नाविन्यपूर्ण कामाकरिता सात कोटी साठ लाख मंजूर ; लोकशाही आघाडीच्या प्रयत्नांना यश ; गटनेते सौरभ पाटील यांनी दिली माहिती...
कराड
शहरातील लोकशाही आघाडीने एकूम 7 नवीन नाविन्यपूर्ण कामे मंजूर करून आणली आहेत त्यामुळे शहराच्या वैभवात भरच पडणार आहे.या एकून कामकरिता 7 कोटी 60 लाख मंजूर करण्यात आल्याची माहिती लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांनी दिली आहे ना बाळासाहेव पाटील यांच्या प्रयत्नातून व सौरभतात्यांच्या संकल्पनेतून हा निधी शहरासाठी उपलब्ध होणार आहे.
कृष्णा पूल परिसर सुशोभित करण्यासाठी आपल्या प्रभागासाठी तात्यांनी पालीकेतून त्याचा प्रस्ताव तयार करून घेतला त्यात रुकमिनी नगरच्या पूर्वेस संरक्षक भिंत,व मोकळ्या जागेत म्यूरल्स,वाकींग ट्रॅक, लॉन्स होणार आहे या कामाकरिता 80 लाखाची मंजुरी मिळाली आहे
मंडईतील सोमेशवर मंदिरानजीक आरक्षण क्रमांक 26आहे तिथे 100 गाड्या पार्क होतील अशी मेकॅनिकल पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे त्यासाठी 3 कोटी मंजूर करण्यात आलेत
यशवन्तराव चव्हाण स्मृतिसदनात कलादालन आहे तिथे प्रदर्शन कार्यशाळेचे इव्हेंट्स व्हावेत हा हेतू होता मात्र तिथे सुविधा नव्हत्या त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून सौरभ तात्यांनी या कामासाठी 50 लाखाची तरतूद करून घेतली आहे
श्री हॉस्पिटल समोरील आरक्षण क्रमांक 53 या जागेत स्केटिंग रिंग टेनिस कोर्ट शूटिंग रेंज या क्रीडा व्यवस्था होणार आहेत यासाठी 2 कोटी मंजूर झालेत रंगार्वेस येथील महादेव मंदिरनजीक घाट निर्मितीसाठी 50 लाख तर संतसखू मंदिर परिसरात बगीचा निर्मितीसाठी 30 लाखाची तरतूद करण्यात आल्याचेही सौरभ पाटील यांनी सांगितले
216 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
*216 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 216 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -387388*
*एकूण बाधित -62585*
*घरी सोडण्यात आलेले -58582*
*मृत्यू -1887*
*उपचारार्थ रुग्ण-2116*
00000
विरोधकाकडून बिनबुडाचे आरोप होतायत ; डॉ अतुल भोसले यांनी टीका
कृष्णा कारखान्याला यंदाच्या ५ वर्षांच्या काळात खऱ्या अर्थाने उर्जितावस्था प्राप्त झाली असतानाही, विरोधक मात्र बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. या विरोधी गटाच्या मागील संचालक मंडळाने सत्तेचा उपयोग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केल्यामुळेच त्यांना सभासदांनी घरी बसविले, अशी टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केली. येरवळे व शिंदेवाडी-विंग (ता. कराड) येथे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, की. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी पाच वर्षे कारखान्याचा कारभार पारदर्शी पद्धतीने केला. त्यामुळे विरोधकांना बोलायलासुद्धा मुद्दा न राहिल्याने, विरोधक आता बिनबुडाचे आरोप करीत सुटले आहेत. सभासदांनी या पाच वर्षाचा कारभार जवळून बघितला आहे. गेल्या ५ वर्षात सभासदांना चांगला दर, मोफत साखर मिळाली. पण विरोधकांना या चांगल्या गोष्टी बहुदा दिसत नाहीत. खरंतर विरोधकांनी मुळातच भ्रष्ट कारभार केल्यामुळे त्यांची दृष्टी तशी बनली असावी. कारखान्याला तोडणी वाहतुकीसाठी दरवर्षी २० कोटी लागतात. पण विरोधकांच्या सत्तेच्या काळात त्यांना ६० कोटी लागत होते. मग वरचे ४० कोटी कोण वापरत होते? त्यांच्या काळात साखर उतारा एक टक्का कमी होता. रस ओढ्याला जाईपर्यंत यांचा कारभार किती आंधळा होता, यावरून लक्षात येते. आम्ही जसे पाच वर्षात काय केले सांगतोय, तसे ते का सांगत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी संचालक दयानंद पाटील, उपसरपंच अशोकराव जाधव, सुनील यादव, विलासराव यादव, ॲड. आनंदराव यादव, राहुल यादव, शिंदेवाडीचे उपसरपंच बाबासाहेब पवार, सुरेश शिंदे, निवासराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्या अंजना साळुंखे, सुनंदा शिंदे उपस्थित होते.
सहकार पॅनेलमध्ये मान्यवरांचा जाहीर प्रवेश
-----------------------------------------------------------
येरवळे (ता. कराड) येथे आयोजित य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद संपर्क बैठकीत सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष सयाजी यादव, सोसायटीचे अध्यक्ष भरत यादव, माजी सरपंच नरेंद्र पाटील, रमेश लोकरे, बाबुराव यादव यांनी स्व. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Subscribe to:
Posts (Atom)