Tuesday, March 2, 2021

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ९३ लाख ७० हजार मंजूर निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन...

कराड:
कराड दक्षिण मतदार संघाचा आमदार या नात्याने प्रत्येक गावाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास हाच माझा ध्यास असेल व प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असेन असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी गोटे येथील विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी रयत सह. साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जि.प.सदस्या मंगलाताई गलांडे, जि प सदस्य शंकरराव खबाले, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवानेते इंद्रजीत चव्हाण, बांधकाम विभाग उपअभियंता श्री सुनील म्हेत्रे, माजी उपसरपंच अशोक पवार, गंगाराम पवार, अविनाश पवार, सुधीर पवार, रझाक पटेल, ताहीर आगा, माजी सरपंच अजीम इनामदार आदीच्या सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

 *याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* कराडच्या विकासासाठी मी कायमच कटिबद्ध राहिलो आहे. मुख्यमंत्री असताना मोठा निधी मला आणता आला. तसेच त्यानंतर मागील ५ वर्षात सुद्धा कराड दक्षिण या माझ्या मतदारसंघासाठी निधी आणता आला व विविध विकासकामे करता आली. प्रत्येक गावाचा विकास होणे हा माझा ध्यास असल्याने अधिकाधिक निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. हायवेवरील व कराड शहराच्या जवळील एक समृद्ध असं हे गोटे गाव, या गावाने कायमच काँग्रेस च्या विचारांची पाठराखण केली आहे. 
-----------------------------------------------------------

No comments:

Post a Comment