Saturday, July 31, 2021

842 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.31 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार    842  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 11  (9342), कराड 170  (34820), खंडाळा 32   (13093), खटाव 73 (21647), कोरेगांव 72 (19042), माण 83  (14806), महाबळेश्वर 6 (4509) पाटण 19 (9572), फलटण 108 (30883), सातारा 204 (45322), वाई  51(14323) व इतर 13  (1650) असे आज अखेर एकूण 219009 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (199), कराड 2 (1032), खंडाळा  2(165), खटाव 2(517), कोरेगांव  1 (408), माण   1 (301), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2  (333), फलटण 3 (530), सातारा 3  (1328), वाई  0 (325) व इतर 0 (73), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5297 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Friday, July 30, 2021

कराडात रणजित पाटील मित्र परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी ; ना बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केली गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत ; शहरातून होतंय कौतुक...

वेध माझा ऑनलाइन
कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांचे एकनिष्ठ व खन्दे समर्थक, शहरातील ऍक्टिव्ह सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील (नाना) यांच्या पुढाकाराने रणजित पाटील मित्र परिवाराच्या माध्यमातून ना.बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पूर ग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून नुकतेच पाटण तालुक्यातील कोंडावळे येथे जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले 
एकूण 111किटचे वाटप याठिकाणी करण्यात आले 

याप्रसंगी पाटण तहसिलदार.प्रशांत थोरात सर्कल संकपाळ प्रतीक पाटील.अनिल कदम.विजय निकम.प्रविण पाटील.नितिन पाटील.व नेचलेचे संरपच राम मोहिते .कोंडवळेच्या संरपच.सौ.निता इंगळे.पोलिस पाटील राजाराम इंगळे व इतर सहकारी उपस्थित होते

गेल्या आठवड्यात पाटण तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला अनेकजण बेघर झाले काही बेपत्ता झाले तर अनेकांचे अतिवृष्टीने मृत्यू झाले बिकट अवस्था झालेल्या पाटण तालुक्यातील पीडित लोकांसाठी राज्यभरातून लाख मोलाची मदत येऊ लागली कोंडावळे येथे जाऊन रणजित नानांनी नामदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेथील गरजूं व पीडिताना मदत द्यायचे ठरवले आणि आपली मदत तात्काळ त्याठिकाणी पोच करून आपली समाजाप्रती असणारी बांधीलकी जपली नानांच्या या भूमिकेचं शहरातून कौतुक होताना दिसतय... 

ना बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले रणजित पाटील(नाना) हे शहरातील प्रथितयश उद्योजक आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरात त्यांची ओळख आहे कोविड काळात त्यांनी खूप मोठं काम केले आहे अडचणीत असेल त्याला मदत करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे गणेशोत्सव काळात ते शहरांतील गणपती मंडळांतील भक्तांची दरवर्षी मोफत जेवणाची व्यवस्था करून देत आपली सामाजिक बांधिलकी नेटाने सांभाळताना दिसतात त्यांच्या कार्याचे शहरात नेहमीच कौतुक होत असते त्यांनी नुकतेच नामदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिनी मौजे कोंडावळे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लोकांसमोर सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे इतरांनी देखील अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी रंजितनानांसारखे पुढे आले पाहिजे अशी आता लोक अपेक्षा करताना दिसत आहेत 

 मौजे.चाफ्याचा खडक,बाविचावाडा,किसरुळे या ठिकाणी 84 किटचे वाटप रणजीत नानांनी केले आहे नांदगाव मनव येथेही मदत पोच झाली आहे  आज पाली येथे तर उद्या चिपळूणला त्यांच्याकडून पीडितांना ही मदत पोच होणार आहे एकूणच नानांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होताना दिसत आहे






सातारा जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता...हवामान खात्याचा अंदाज...

वेध माझा ऑनलाइन
कराड
राज्यात मागील काही दिवसांपूर्वी पावसाने चांगलीच दैना उडवून दिली. त्यानंतर आता पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. काही ठिकाणी माध्यम ते तुरळक स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान आज 3-4 तासांमध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, शोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून मान्सूनचा असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग काहीसा उत्तरेकडे सरकला असून पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीवर आहे. उत्तर बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरावर आहे. दोन दिवसात हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल झारखंड, बिहार कडे सरकत आहे. अरबी समुद्रात गुजरात पासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

पूर्व भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून बिहार मध्यप्रदेश सहित उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे उद्या दिनांक 31 कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने वर्तवला आहे.

861 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  861 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 41 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 24 (9331), कराड 152 (34650), खंडाळा 58  (13061), खटाव 127 (21574), कोरेगांव 84 (18970), माण 78 (14723), महाबळेश्वर 3 (4503) पाटण 18 (9553), फलटण 115 (30775), सातारा 149 (45118), वाई 42 (14272) व इतर 11 (1637) असे आज अखेर एकूण 218167 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2(199), कराड 9 (1030), खंडाळा 0 (163), खटाव 5(515), कोरेगांव 2 (407), माण 2 (300), महाबळेश्वर 0 (86), पाटण 3 (331), फलटण 11 (527), सातारा 2 (1325), वाई 4 (325) व इतर 1 (73), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5281 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Thursday, July 29, 2021

नुकसानग्रस्तांच्या पाठीशी राज्यशासन ठाम - आ पृथ्वीराज चव्हाण

 कराड
 गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, राहती घरे यासह जनजीवनावर अपरिमित नुकसान ओढवले आहे. नुकसानग्रस्त लोकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम आहे. प्रशासनाने लोकांना अधिकाधिक मदत पोहचवावी, असे सांगून कराड दक्षिण मतदारसंघातील दक्षिण मांड नदीच्या पुरामध्ये नुकसान झालेल्या बाधितांना भरपाई देण्यास अग्रक्रम ठेवावा. नदीवरील काले नांदगाव, टाळगावच्या पुलांच्या आवशयक दुरुस्त्या करण्याच्या सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. व पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवण्यासाठी प्राधान्यक्रम ठेवावा. असे त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (गुरुवारी) कराड दक्षिण पूरग्रस्त (अतिवृष्टी) भागात दौरा केला. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सार्वजनिक बांधकाम उपविभागचे उपअभियंता संजय दाभोळे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता आर. जे. पाटील, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, जलसंपदा विभागाचे संजय धोत्रे, जलसंधारणाचे श्रीकांत आढाव, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. राख, महसूल विभागाचे मंडलाधिकारी नागेश निकम, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, नरेंद्र नांगरे - पाटील, नितीन थोरात, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, उदयआबा पाटील - उंडाळकर, पैलवान तानाजी चवरे, देवदास माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. चव्हाण यांनी काले येथील मांड नदीवरील पुलाची पाहणी केली. या पुलाची उंची वाढवता येईल का? यासंबंधी प्रशासनाकडून अधिक माहिती घेतली जाईल, असे उपस्थितांना सांगितले. नांदगाव येथील पुलाची पाहणी करताना त्यांनी सरपंच हंबीरराव पाटील, उपसरपंच अधिकराव पाटील व ग्रामस्थांशी संवाद साधला. व संबंधित अधिकाऱ्यांना नांदगाव पुलाच्या कठड्यांची तात्पुरती दुरुस्ती करावी, असे सांगून योग्य ती खबरदारी घेवून हा पूल वाहतुकीस खुला करावा असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी पुलावरील वाढती प्रवाशी व ऊस वाहतूक विचाराधीन घेवून या उंची वाढवावी. तसेच दुहेरी वाहतूक व उंच पूल व्हावा, अशी मागणी केली. यावर आ. चव्हाण शासनाकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ माळी, माजी सरपंच टी. के. पाटील, डॉ. नरेंद्र माळी, सागर कुंभार, सयाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, प्रशांत सुकरे, विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. चव्हाण यांनी उंडाळे येथील जिंती रोडवरील पूल व तुळसण फाट्यावरील पुलाची पाहणी केली. जिंती रोडवरील पुलाचा भराव व जवळच्या बंधाऱ्याच्या सांडवा दुरुस्तीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तर तुळसण फाट्यावरील पुलावरील रस्ता उखडला आहे. हे काम लवकर होईल. तोपर्यंत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याची सूचना दिली. यावेळी उपसरपंच बापूराव पाटील, उदय पाटील, शैलेश पाटील, व्ही. टी. पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाळगाव येथील गावाजवळच्या पुलाची व खचलेल्या भरावाची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शालन मोहिते, जयवंत जाधव, गणेश काळे, उत्तमराव साळुंखे, धनाजी देशमुख, सुभाष पाटील, विकास देशमुख, प्रगतशील शेतकरी संजय जाधव - उंडाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सवादे येथील बांदेकरवाडी येथील साकव पुलाचा पडलेला भराव व तेथील नुकसानीची पाहणी केली. व पूल दुरुस्तीच्या कामात गती देण्यास सांगितले. यावेळी नितीन थोरात, सरपंच लक्ष्मी सुतार, उपसरपंच पुजाराणी थोरात - पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाजीराव थोरात, माजी चेअरमन निवास थोरात, उदय थोरात, माजी उपसरपंच सचिन थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.

1073 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  1073 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 21 (9307), कराड 300 (34498), खंडाळा 83  (13003), खटाव 50 (21447), कोरेगांव 99 (18886), माण 84 (14645), महाबळेश्वर 10 (4500) पाटण 36 (9535), फलटण 142 (30660), सातारा 170(44969), वाई 68 (14230) व इतर 10(1626) असे आज अखेर एकूण 217306 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(197), कराड 5 (1021), खंडाळा 0 (163), खटाव 0(510), कोरेगांव 3 (405), माण 0 (298), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1 (328), फलटण 0 (516), सातारा 0 (1323), वाई 1 (321) व इतर 1 (72), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5240 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Wednesday, July 28, 2021

701 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 46 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  701 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 46 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 33(9296), कराड 202 (34198), खंडाळा 19 (12920), खटाव 48 (21397), कोरेगांव 55 (18787), माण 73 (14561), महाबळेश्वर 1 (4490) पाटण 14(9499), फलटण 72 (30518), सातारा 144 (44799), वाई 34 (14162) व इतर 6 (1616) असे आज अखेर एकूण 216233 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (197), कराड 6 (1016), खंडाळा 2 (163), खटाव 6 (510), कोरेगांव 1 (402), माण 3(298), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2 (327), फलटण 8 (516), सातारा 14 (1313), वाई 3 (320) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5229 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Tuesday, July 27, 2021

मुस्लिम समाजाच्या वतीने चिपळूणच्या पुरपीडितांना "लाख मोलाची' मदत...

वेध माझा ऑनलाइन
कराड
शहरातील समस्त मुस्लिम समाज हापिझ उलमा कमिटी आणि मोमीन मोहल्ला बैतुलमाल कमिटी यांच्या वतीने चिपळूण येथिल पुरपीडित जनतेला मदतीचा हात नुकताच देण्यात आला मुस्लिम समाजाने अवघ्या काही तासात लाखोंची मदत चिपळूण कडे रवाना केली त्यांबद्दल शहरातून त्यांच मोठं कौतुक होतंय

मुस्लिम समाजाचे योगदान नेहमीच शहरातील कोणत्याहि अडचणींवेळी आवर्जून दिसून येते
मागील वर्षी ची पूरपरिस्थिती असो... कोविड चे संकट आसो...कुपोषित बालकांना मदतीचा विषय असो...आणि आता सध्याची पूरपरिस्थिती असो... येथील मुस्लिम समाज नेहमीच जनतेच्या मदतीसाठी धावून आला आहे 

गेल्या आठवड्यात सर्वत्र पावसाचा अक्षरशः हाहाकार झाला त्यात विशेषतः चिपळूनमध्ये अनेकजण बेघर झाले,मृत्यू मुखी पडले तर अनेकजण बेपत्ता झाले  त्याठिकाणी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची वानवा झाली वृद्ध लोक लहान मुले महिला यांचे हाल महाराष्ट्राला पाहवेनात सम्पूर्ण राज्यातून चिपळूण मधील पीडितांसाठी मदतीचा ओघ येऊ लागला अनेक संवेदनशील लोक वाटेल त्या मार्गाने त्याठिकाणी सहायय करण्यासाठी पुढे येऊ लागले
येथील समस्त मुस्लिम समाज मोमीन मोहल्ला बैतुलमाल कमिटी यांच्यावतीने चिपळूण मध्ये मदत पोचवण्यासाठी धडपड सुरू केली आणि अवघ्या काही तासातच त्याठिकाणी लाखो रुपयांची मदत उभी राहिली अन्नधान्य अंथरून पांघरून औषधे कपडे अशा अनेक प्रकारची मदत घेबून मुस्लिम समाजातील युवक चिपळूणला रवाना झाले 
येथील नगरसेवक फारुख पटवेकर बरकत पटवेकर याकूब वाईकर शेरु कुरेशी मुसद्दीक वाईकर अब्राहम मुल्ला यांच्यासह पटवेकर यांच्या अनेक सहकाऱ्यांनी पुढे येऊन ही मदत पोच करण्यासाठी प्रयत्न केले  

कोविड संकटात देखिल मुस्लिम समाजाने कराडात मोठे काम केले आहे कोविड सेन्टरची उभारणी करून अनेकजणांना मोफत उपचार त्याठिकाणी देत अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत व त्यानिमित्ताने रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्यदेखील या समाजाने फुलवले आहे  नेहमीच येथील मुस्लिम समाज जनतेला संकटात सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी जनसेवेसाठी अग्रेसर राहिला आहे   

नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे "आदर्श नगराध्यक्षा ' पुरस्काराने सन्मानित...नवभारत वृत्त समूहाने केला सन्मान... नगराध्यक्षानी पुरस्कार केला कराड वासीयांना समर्पित...राज्यात कराड शहराचा झाला गौरव...

अजिंक्य गोवेकर
कराड
आघाडीच्या असणा-या नवभारत वृत्त समूहाच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा 
आदर्श नगराध्यक्षा" पुरस्कार यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे याना नुकताच प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलमताई गो-हे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले 

दरवर्षी नवभारत वृत्तपत्र ग्रुपच्या वतीने नारीशक्तीचा सन्मान केला जातो. समाजासाठी विधायक काम करणा-या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यात येते त्यासाठी नवभारत वृत्त समूहाच्या वतीने सर्व्हेक्षण करून  उत्कृष्ठ काम करणा-या महिलांची निवड केली जाते. यावर्षी  देण्यात येणारा  मानाचा "आदर्श नगराध्यक्षा" पुरस्कार कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे याना काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला होता त्यानुसार नुकतेच त्याचे वितरण पुणे बालेवाडी येथे मोठ्या दिमाखात करण्यात आले... या पुरस्काराने कराड शहराचा सन्मान सम्पूर्ण राज्यात वाढला आहे अशी भावना आता व्यक्त होताना दिसत आहे...
  
दरम्यान पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना  नगराध्यक्षा सौ शिंदे म्हणाल्या...कोणत्याही क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीला पुरस्कार रूपी कौतुकाची थाप मिळाली की त्या व्यक्तीला नव्या ऊर्जेने, उत्साहाने अजून जास्त चांगले काम करण्याचे बळ मिळते, असे मला प्रामाणिकपणे वाटते. सर्व दिग्गज सन्माननीय व्यक्तींच्या उपस्थितीत हा पुरस्कार मला मिळाला ,ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. हा पुरस्कार केवळ माझ्या एकटीचा नसून माझ्या सर्व शहरवासीयांचा आहे तसेच कराड नगर परिषदेचे माझे सर्व सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी या सर्वांचा आहे असे मी मानते हा पुरस्कार मी याना समर्पित करते. कारण आम्ही सर्वांनी एकत्रित केलेल्या कामामुळेच हा पुरस्कार मला मिळाला अशी माझी भावना आहे आमचे नेते डॉ.अतुलबाबा भोसले,  शेखरजी चरेगावकर, श्री.विक्रमदादा पावसकर यांनी दाखवलेला माझ्यावरील विश्वास, तसेच वेळोवेळी केलेले मागर्दर्शन, यामुळे हा पुरस्कार मिळवणे शक्य झाले. या पुरस्कारावर या सर्वांचाही माझ्या इतकाच अधिकार आहे ,तसेच माझा झालेला सन्मान म्हणजे या सर्वांचाच सन्मान आहे असे मी मानते .
नवभारत वृत्तसमूह हा वृत्तपत्र क्षेत्रातील संपूर्ण देशात लोकप्रिय असा समूह आहे. या वृत्त समूहाच्या नवमहाराष्ट्र, या दैनिकाला संपूर्ण राज्यभरात एक मानाचे स्थान आहे . या वृत्तपत्राने माझी, माझ्या कामाची योग्य दखल घेतली, कामाचे कौतुक केले, याबद्दल याबद्दल मी मनापासून नवभारत व नवमहाराष्ट्र दैनिकाच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानते. माझ्याकडून शक्य होईल तेवढे सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून माझ्या शहरवासीयांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन असेही नगराध्यक्षा सौ शिंदे यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या यावेळी आवर्जून त्यांचे कौतुक करण्यासाठी माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर या सोहळ्यास उपस्थित राहिले
नगराध्यक्षा सौ शिंदे यांच्या कुटुंबीयांनी देखील एवढा मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

874 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  874 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 39(9253), कराड 212 (33995), खंडाळा 27 (12901), खटाव 75 (21349), कोरेगांव 93(18732), माण 78 (14488), महाबळेश्वर 11(4489) पाटण 24(9485), फलटण 116 (30446), सातारा 151(44655), वाई 37(14128) व इतर 11(1610) असे आज अखेर एकूण 215531 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1(196), कराड 7 (1010), खंडाळा 0 (161), खटाव 0(504), कोरेगांव 1(401), माण 1 (295), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2(325), फलटण 7(508), सातारा 5 (1309), वाई 2 (317) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5183 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Monday, July 26, 2021

पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आले "राजेंद्रसिह यादव'...कराड,येरावळे तेथे केली नाश्ता जेवण आणि मेडिकल कॅम्प ची व्यवस्था... जनतेने मानले आभार...

वेध माझा ऑनलाइन
कराड 
 गेल्या आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे त्याप्रमाणे कोयना धरणातून पाण्याचा केलेला विसर्ग यामुळे कोयना नदीला पूर येऊन या पुराचे पाणी कराड शहरातील काही भागातील घरात शिरले विशेषता पाटण कॉलनीतील रहिवाशांच्या घरात पाणी असल्याचे समजतात कराड नगर परिषदेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी तात्काळ रात्रीच्या वेळी पाटण कॉलनी येथे धाव घेऊन येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले त्यांना  कराड परिषदेच्या शाळेत सर्व कुटुंबासहित ठेवण्यात आले आहे जोपर्यंत पूर परिस्थिती कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर येत नाही  तोपर्यंत पूरग्रस्तांना चहा नाष्टा व जेवणाची जबाबदारी तसेच त्यांच्या आरोग्यासाठी लागणारे औषधे सर्व सुविधा पुरवण्याचे काम गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी हाती घेतले आहे 

ज्या ज्या वेळी  कराड शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी राजेंद्रसिंह यादव पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत राजेंद्रसिंह यादव यांनी पूरग्रस्तांच्या बद्दल घेतलेली सहकार्याची भूमिका याबद्दल पूरग्रस्तांनी  राजेंद्रसिंह यादव यांना धन्यवाद दिले आहे यावेळी कराडनगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके नगर अभियंता ए आर  पवार विजयसिंह यादव नगरसेवक हणमंतराव पवार बाळासाहेब यादव किरण पाटील गजेंद्र कांबळे निशांत ढेकळे ओमकार मुळे बापू देसाई नरेंद्र लिबे तसेच राजेंद्रसिंह यादव, विजय यादव मित्रपरिवार उपस्थित होते
तसेच कराड तालुक्यातील येरवळे येथे वांग नदी पात्राचे पाणी  बौद्ध वस्तीत शिरल्याने येथील रहिवाशांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला ही माहिती मिळतात गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी तात्काळ येरवळे  येथे जाऊन तेथील रहिवाशांची चौकशी करून जोपर्यंत पूर परिस्थिती कमी होत नाही तोपर्यंत  बौद्ध वस्तीमधील रहिवाशांना अन्नदान सेवा देण्याची जबाबदारी राजेंद्रसिंह यादव यांनी घेतली आहे त्यांच्या दातृत्वामुळे येरवळे येथील रहिवाशांनी यादव यांना धन्यवाद दिले आहेत
आपल्या गावासाठी धावून आलेले राजेंद्रसिंह यादव यांचे गावकऱ्यांनी आभार मानलेत

586 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 7 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.26 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  586 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 7 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 9(9214), कराड 105 (33783), खंडाळा 65 (12874), खटाव 30 (21274), कोरेगांव 85(18639), माण 20 (14410), महाबळेश्वर 2(4478) पाटण 16(9461), फलटण 103 (30330), सातारा 120(44504), वाई 29(14091) व इतर 2(1599) असे आज अखेर एकूण 214657 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(195), कराड 1 (1003), खंडाळा 1 (161), खटाव 0(504), कोरेगांव 2(400), माण 1 (294), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1(323), फलटण 0(501), सातारा 1 (1304), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5157 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Sunday, July 25, 2021

जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत 37 जणांचा मृत्यु- बेपत्ता, भूस्खलन व पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांचे शोध घेण्याचे काम सुरु

सातारा, 
 सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील भूस्खलनामुळे 26 जण, छत पडून 1 जण, 2 जण दरड कोसळल्यामुळे  तर 8 जणांचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे असे एकूण  37 जणांचा  दुर्दैवीपणे मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
वाई तालुक्यातील 3 जण, जावली तालुक्यातील 4 जण, पाटण तालुक्यातील 27 जण,  सातारा  तालुक्यातील 2 जण, तर महाबळेश्वर तालुक्यातील 1 जणांचा मृत्यु झाला आहे.
वाई तालुक्यातील कोंढावळे येथील 2 महिलांचा भूस्खलनामुळे तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यु झाला आहे.
जावली तालुक्यातील रेंगडी येथील 2 महिला व वाटंबे येथील एका पुरुषाचा तर  मेढा येथील एका पुरुषाचा  पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे.
पाटण तालुक्यातील बोंद्री येथील एक पुरुष, जळव येथील एका पुरुषाचा  पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे. मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यु झाला आहे. आंबेघर तर्फ मरळी येथील 5 पुरुष व 6 महिलांचा तर काहीर येथील एका महिलेचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे. रिसवड येथील 2 पुरुष व 2 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे. मिरगाव येथील 4 पुरुष व 4 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे.
सातारा तालुक्यातील कुस बु येथील एका महिलेचा व कोंडवे येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे. 
महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका पुरुषाचा दरड कोसळलयाने मृत्यु झाला आहे.
पाटण तालुक्यातील भुस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचे शोध व बचाव काम सुरु असून अद्यापही अंदाजित एकूण 5 नागरिक बेपत्ता असून जावली व वाई तालुक्यातील प्रत्येकी 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध घेण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
0 0 0  0

704 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  704 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 23(9205), कराड 203 (33678), खंडाळा 20 (12809), खटाव 59 (21244), कोरेगांव 46(18554), माण 52 (14390), महाबळेश्वर 4(4476) पाटण 12(9445), फलटण 60 (30227), सातारा 172(44384), वाई 47(14062) व इतर 6(1597) असे आज अखेर एकूण 214071 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1(195), कराड 4 (1002), खंडाळा 0 (160), खटाव 0(504), कोरेगांव 1(398), माण 0 (293), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1(322), फलटण 3(501), सातारा 4 (1303), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5150 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Saturday, July 24, 2021

जिल्ह्यातील 379 गावे बाधित तर 1 हजार 324 कुटुंबाचे स्थलांतर - 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु...

सातारा, दि.24 (जिमाका): गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या  नुकसानीमध्ये  जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील  एकूण 1 हजार 324  कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आलेले असून एन डी आर एफ एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण 167 गावे पुर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झोलली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पुर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील 10 गावे पुर्णत: व 60 गावे अंशत: अशी एकूण 70 गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पुर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील 13 गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील 102 गावे अशत: बाधित झाली आहेत.
*जिल्ह्यातील 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु*
जिल्ह्यातील एकूण 18 जणांचा मृत्यु झाला असून 24 जण बेपत्ता आहेत तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे.  यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत व्यक्ती, 2 जण बेपत्ता व 20 मृत पशुधन, कराड तालुक्यात 3 हजार मृत पशुधन (कोंबडी), पाटण तालुक्यात 12 मृत व्यक्ती व 20 जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत व्यक्ती व 2 मृत पशुधन, सातारा तालुक्यात 2 मृत पशुधन, जावली तालुक्यात 2 मृत व्यक्ती व 2 जण बेपत्ता झाले आहेत.
*जिल्ह्यातील 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जण स्थलांतरित*
         जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये  वाई तालुक्यातील 72 कुटुंबातील 390 जण, कराड तालुक्यातील 876 कुटुंबातील 3 हजार 836 जण, पाटण तालुक्यातील 325 कुटुंबातील 1 हजार 300 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 51 कुटुंबातील 130 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
*कार्यरत टिम*
जिल्ह्यात एकूण 3 एन डी आर एफ च्या टीम कार्यरत असून एका टिमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
0 0 0 0

कराड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची काँग्रेस नेते शिवराज मोरे यांनी केली पाहणी...

कराड
दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणीं पुर परिस्थिती निर्माण झाली आहे  कराड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कराड तालुक्यातील कोळे ते अंबवडे गावांदरम्यान असणार्या बंधार्याचे  व लगतच्या शेतजमिनीचे फार मोठे नुकसान झाले आहे सदर नुकसानग्रस्त ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे उपाध्यक्ष मा शिवराज मोरे दादा यांनी भेट देऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानी संदर्भात कराडचे तहसीलदार अमर्दिप वाकडे यांच्याशी फोनवरून चर्चा करुन योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले
 यावेळी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

शिवराज मोरे हे युवक काँग्रेसचे राज्याचे पदाधिकारी आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात कराड शहर व तालुक्याच्या राजकारणात सध्या ते अग्रेसिव्ह दिसत आहेत मधल्या काळात त्यांनी पालिकेच्या राजकारणात लक्ष घालत आ प्रिथविराज चव्हाण यांची बाजू मांडुन पत्रकार परिषदेतून आत्तापर्यंत पृथ्वीराजबाबांनी शहरात दिलेल्या निधीचा खुलासा केला होता तालुक्याच्या राजकारणात व सहकारात देखील त्यांनी आपले आपले योगदान देत शेतकरी बांधवांसाठी आपली भूमिका अनेकदा मांडली आहे नुकताच कराड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यातील कोले ते अंबवडे या दरम्यानच्या परिसरातील शेतजमिनीचे मोठी हानी झाल्याने तेथील शेतकरी हवालदिल झाला आहे त्याठिकाणची पाहणी करून शिवराज मोरे यांनी तहसीलदार वाकडे याना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत विनंती केली आहे

937 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  937 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 29(9182), कराड 171 (33475), खंडाळा 88 (12789), खटाव 92 (21185), कोरेगांव 90(18508), माण 58 (14338), महाबळेश्वर 17(4472) पाटण 15(9433), फलटण 112 (30167), सातारा 219(44217), वाई 37(14015) व इतर 9 (1591) असे आज अखेर एकूण 213372 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(194), कराड 4 (998), खंडाळा 0 (160), खटाव 1(504), कोरेगांव 1(397), माण 0 (293), महाबळेश्वर 1 (86), पाटण 0(321), फलटण 4(498), सातारा 3 (1299), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5136 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

सोमवार पासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल ; व्यापाऱ्यांना दिलासा...

 कराड
सातारा जिल्हा आता तिसर्‍या स्तरात पोहचल्याने सर्व प्रकारची दूकाने सोमवार ते शूक्रवार सकाळी 9 ते 4 या वेळेत सूरू करण्याची परवानगी सातारा जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.शनिवारी आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील असेही जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सांगितले आहे

सोमवार ते शूक्रवार अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत सूरू ठेवण्यास परवानगी, हॉटेल रेस्टाॅरेंट 50% क्षमतेने सूरू करण्यास परवाणगी, खेळ, धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत तर विविध कार्यक्रमावर निर्बंध राहणार आहेत. संस्था सभांना व व्यायाम शाळांना, 50% क्षमतेने सूरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात मेडिकल, हाॅस्पिटल सर्व दिवशी सूरू राहतील.अत्यावश्यक सेवातील दूकाने सर्व दिवशी
सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेतच सुरू राहतील व अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी 9 ते 4 या वेळेत सुरू राहतील मात्र शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी ही दुकाने बंद राहणार आहेत.

जिल्हादंडाध्किारी शेखर सिंह यांनी केले नव्याने आदेश जारी....
सध्यस्थितीत सातारा जिल्हयातील RT-PCR टेस्ट पॉझीटीव्हीटी रेट पाहता, सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्येच समावेश झाला असलेने शासन आदेश दि. 4 जून 2021 मधील सूचनेनुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शेखर सिंह  यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 26 जुलै 2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे नव्याने आदेश पारित केले आहे.
आर्थिक, सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करणेत येत आहेत

सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करणेत येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करणेत येत आहे.

सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.   अत्यावश्यक बाबीची दुकाने,आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास  परवानगी असेल. मात्र मेडिकल,औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल,औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास  परवानगी असेल.  

अत्यावश्यक नसलेली दुकान, आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास  परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ पुर्णपणे बंद राहतील.  सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास  परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास  परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास  परवानगी असेल. ज्या हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे, अशा हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना  सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते 04.00 या कालावधीमध्ये आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट चालू ठेवण्यास  परवानगी असेल. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजलेनंतर व शनिवार, रविवार या दिवशी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनाच आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सेवा पुरविणेस परवानगी असेल. परंतु, हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये जेवण, नाष्टा घेणाऱ्या व्यक्तींनी लॉजिंगसाठी अगोदर बुकींग करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविणे साठी आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत परवानगी असेल. सर्व खाजगी कार्यालयांना सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास  परवानगी असेल. शासकीय, निम-शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देणेत येत आहे.   खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत चालू ठेवण्यास  परवानगी असेल. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल. चित्रीकरण - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी 05.00 नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक, प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे हे पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक, धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. मात्र शासकीय कार्यक्रमांसाठी जागेच्या 50% क्षमतेने आयोजीत करण्यास परवानगी असेल. सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात, एक हॉल, कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील दि. 02 मार्च 2021 आदेश मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांच्याकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झालेस रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करावी. तसेच  कोविड -19 च्या अनुषंगाने निर्गमीत अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधाचा भंग करणाऱ्या कुटूंबास रक्कम रु 25,000/- इतका दंड आकारला जाईल. शासनाच्या दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित मालमंत्ता बंद राहील. जास्तीत जास्त 20 नातेवाईक, नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करण्यास परवानगी असेल. बैठका, निवडणुक - स्थानिक संस्थांच्या, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा या ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेणेस परवानगी असेल. सर्व बांधकामांना परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल त्यांनी बांधकाम करण्यास हरकत नाही तथापि, ज्या मजूरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी नसेल अशा मजूरांनी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत बांधकाम ठिकाण सोडावे. शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व  त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवडयाचे सर्व दिवशी सायं. 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास  परवानगी असेल. तसेच शेती विषयक (मशागत) करणेची सेवा करण्यास आठवडयाचे सर्व दिवशी सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी असेल. ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा नियमितपणे चालू ठेवण्यास  परवानगी असेल. केश कर्तनालय, सौदर्य केंद्रे ही आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने फक्त अगोदर भेटीची वेळ (prior Appointment) ठरवून तसेच विना-वातानूकुलीत (Non AC) जागेसाठी सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास  परवानगी राहील. व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर बंद राहतील. सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 100 टक्के क्षमतेने चालु ठेवण्यास  परवानगी राहील. कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करणेची परवानगी नसेल.मालवाहतूक वाहनामधून वाहन चालक, मदतनीस/ क्लिनर किंवा इतर असे एकुण जास्तीत जास्त 3 व्यक्तीस प्रवासास परवानगी असेल. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल.

उत्पादन क्षेत्र - निर्यातभिमुख यंत्रणा की ज्यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग  ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास  परवानगी असेल. उत्पादन-जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक (कोणत्याही वस्तूसाठी कच्चा माल, पॅकेजिंग तयार करणार आवश्यक वस्तू आणि घटक, वस्तू आणि संपूर्ण पुरवठा साखळी), सतत प्रक्रिया उदयोग की जे तातडीने थांबवता येत नाहीत आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय पुन्हा सुरु होवू शकत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उदयोग, डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता - अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास  परवानगी असेल. 
उत्पादन -  उत्पादन क्षेत्रातील इतर उत्पादन  घटक जे आवश्यक, ‍निरंतर प्रक्रिया किंवा निर्यात देणाऱ्या घटकाअंतर्गत येत नाहीत अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास  परवानगी असेल. सदर कर्मचारी यांची हालचाल TRANSPORT BUBBLE मध्ये असणे बंधनकारक राहील.  शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास  परवानगी असेल

सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना....
ज्या आस्थापनांना सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास  परवानगी देणेत आली आहे., त्या आस्थापनावरील कर्मचारी यांना त्यांचे घरी पोहोच होणेसाठी सायं 05.00 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी असेल. स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड-19 व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा 100% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह चालू राहतील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.

अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल...

रुग्णालये,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण. व्हेटरनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स. वनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन,  चिकन, अंडी,  मासे दुकाने,  इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने. कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा सार्वजनिक वाहतूक - विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस.   राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम / सातारा जिल्हयाचे पश्चिम भागातील खाजगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा. भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा. सेबीच्या सर्व कार्यालये बाजारातील मूलभूत सुविधा संस्थांसारख्या स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि इतर मध्यस्थी सेबीकडे नोंदणीकृत आहेत.  दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती, देखभालीसाठी आवश्यक सेवा. माल वाहतूक, पाणीपुरवठा सेवा.शेती संबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राचे अखंड निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित क्रियाकलाप आणि त्याशी संबंधित संलग्न उपक्रम. सर्व वस्तूंची निर्यात-आयात. ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी).अधिकृत मीडिया. पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने. गंभीर पायाभूत सुविधा आणि सेवांना आधार देणारी डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस,आयटी सेवा.सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा. ATM,s ,पोस्टल सेवा, कस्टम हाऊस एजंट्स, परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर  जे लस/जीवनरक्षक औषधे, फार्मास्युटिकल उत्पादनांच्या हालचालीशी संबंधित आहेत.कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग सामग्रीची निर्मिती करणारे घटक. व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामध्ये गुंतलेली यंत्रणा. मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पंक्चर दुकाने. 

सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 02.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी, ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा

सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)

केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था. सहकारी, पीएसयू आणि खाजगी बँका. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये. विमा, वैद्यकीय हक्क सबंधित सेवा. उत्पादन, वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारी फार्मास्युटिकल कंपनीची कार्यालये. रिझर्व्ह बॅंकेने स्टँड अलोन प्राइमरी डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि आरबीआयच्या नियमन केलेल्या बाजारपेठेत कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागींसह घटक आणि मध्यस्थ. सर्व नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. सर्व सूक्ष्म वित्त संस्था. न्यायालये, न्यायाधिकरण किंवा चौकशी आयोगांचे कार्य चालू असल्यास वकिलांची कार्यालये.

वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके- वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असे.
आयसोलेशन बबल- म्हणजे कामकाजासाठी ऑनसाईट निवासस्थान किंवा जवळपासची सोय. समर्पित वसाहतींद्वारे ज्यात हालचाली समर्पित परिवहन सेवेद्वारे केली जातात, ज्यात जास्तीत जास्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी बाहेरून येतात.  "ट्रान्सपोर्ट बबल" म्हणजे सार्वजनिक वाहनातून नव्हे तर समर्पित परिवहन सेवेतील बाहेरील कर्मचार्यांहची हालचाल.

दंड- सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विना मास्क असणाऱ्या व्यक्तींकडून 500/- रु दंड आकारण्यात यावा.  रेस्टॉरंट, हॉटेल बाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी 1000/- रु दंड आकारणेत यावा. तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही दुसऱ्यांदा सदर नियमांचे उल्लंघन झालेस पुढील एक महिन्यापर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. त्यानंतरही वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना बंद केली जाईल.

अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर   रु  500/-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड- 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1,000/-इतका दंड आकारला जाईल. या कारवाई नंतरही दुसऱ्यांदा सदर नियमांचे उल्लंघन झालेस पुढील एक महिन्यापर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. त्यानंतरही वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना, दुकान बंद केले जाईल. विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तिंविरुध्द रक्कम रुपये 500/- दंड आकारण्यात यावा. 
CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय,  कायदेशीर कारवाई करण्यात येईल

Friday, July 23, 2021

कराड दक्षिण मध्ये पावसाचा हाहाकार उदयदादांकडून परिस्थितीची पाहणी


कराड
कराड दक्षिण विभागातील दक्षिण मांड व वांग नदीला पूर आला असून बहुतेक पूल पाण्याखाली गेले आहेत. नांदगांव, टाळगांव येथील नदीकाठावरील 40 कुटुंबाचे स्थलांतर केले आहे. नांदगांव पूल कमकुवत झालेने वाहतुकीसाठी बंद केला आहे. शेवाळेवाडी -घोंगाव येथील जिल्हा परिषद तलाव फुटला असून खोचरेवाडी तलावाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे तर उंडाळे तलावाचे पाण्याने सरंक्षण भिंत तुडल्याने जिंती रस्ता खचू लागला आहे. या सर्व परिस्थिती ची जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेस चे दक्षिणचे नेते ऍड उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी पाहणी केली व शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.

ऍड उदयदादांनी नांदगांव,उंडाळे,घोंगाव ,
टाळगांव येथे भेटी देऊन पूरस्थितीची पहाणी केली. यावेळी प्रा धनाजी काटकर,राजेंद्र पाटील,नांदगांव चे उपसरपंच अधिकाराव पाटील,टाळगांव चे उपसरपंच सचिन पाटील,राजेंद्र जाधव,टी के पाटील,अशोक पाटील,अमोल कांबळे यांची उपस्थिती होती. पूर काळात लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन यावेळी उदयसिंह पाटील यांनी केले. नुकसानी बाबत मा. तहसीलदार, गटविकास अधिकारी,जिल्हा परिषद व ल पा विभागाच्या अधिकारी ,बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानी बाबतची फोन वरून माहिती दिली.

844 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 12 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  844 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 12 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 23(9153), कराड 198 (33303), खंडाळा 35 (12701), खटाव 49 (21093), कोरेगांव 42(18418), माण 72 (14280), महाबळेश्वर 6(4455) पाटण 31(9418), फलटण 109 (30055), सातारा 175(43998), वाई 96(13978) व इतर 8 (1582) असे आज अखेर एकूण 212434 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3(194), कराड 1 (994), खंडाळा 0 (160), खटाव 0(503), कोरेगांव 0(396), माण 2 (293), महाबळेश्वर 0 (85), पाटण 5(321), फलटण 0(494), सातारा 1 (1296), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5122 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Thursday, July 22, 2021

कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांना नवभारत वृत्तपत्र समूहाचा आदर्श नगराध्यक्षा पुरस्कार जाहीर...

वेध माझा ऑनलाइन
राड
 कराडच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांना नवभारत वृत्तपत्र समुहाचा मानाचा "आदर्श नगराध्यक्षा' पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ शिंदे यांच्या कार्यालयातून पत्रकाद्वारे देण्यात आली आहे त्यांच्या आत्तापर्यंतच्या एकूणच सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्या जिल्ह्यातील त्या एकमेव नगराध्यक्षा आहेत त्यांचे सम्पूर्ण राज्यभरातून अभिनंदन होत आहे 

या सोहळ्यास सहकारमंत्री ना बाळासाहेब पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. वंदना चव्हाण, आ. रोहित पवार, आ. निलम गोर्‍हे, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरीचिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, औरंगाबाद जिल्हा पोलीस प्रमुख मोक्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

 नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समुहाच्यावतीने प्रतिवर्षी शासकीय,सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आदी क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या महिलांचा वुमेन्स अ‍ॅवॉर्ड देवून यथोचित सन्मान केला जातो. सन 2021साठी कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांचा या पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे.
 
कराड शहराच्या नगराध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पालिकेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी तसेच कर्मचारी यांना बरोबर घेवून त्यांनी शहराच्या विकासात्मक कामकाजाला सुरूवात केली. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत राज्य व देशपातळीवर यश मिळविण्यासाठी योगदान दिले. माझी वसुंधरा अभियानात त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने उत्कृष्ठ कामगिरी बजावली. मागील महापूरात त्यांनी स्वतः नागरिकांना धीर देवून सर्वोतोपरी सहाय्य केले. 
 त्यांनी कोरोना संकटात केलेलं कामदेखील विसरून चालणार नाही  एका कोरोना मृतदेहावर चक्क अंत्यसंस्कार करून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळेपणाही दाखवून दिला होता...  एक महिला नगराध्यक्षां कोविड मृतदेहावर अंत्यसंकार करते हे राज्यातील पहिलेच उदाहरण ठरले होते... आणि म्हणूनच त्यांचे त्यावेळी राज्यभर कौतुकही झाले होते...स्वतः त्या कोरोना पोसिटीव्ह झाल्या होत्या,  त्यावर मात करून काही दिवसातच लोकांसाठी कोरोनाशी लढताना पुन्हा त्या दिसल्या होत्या...
 
त्यांच्या एकूणच सामाजिक कार्याची दखल घेवून नवभारत वृत्तसमुहाने आदर्श नगराध्यक्षा म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.  सदर पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दि. 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल रामदा प्लाझा (बालेवाडी) येथे होणार आहे 

कराडात पाऊस वाढला...बांधकाम सभापती लोकांसाठी उतरले रस्त्यावर...हणमंतराव पवारांच्या प्रसंगावधान ओळखून लोकांसाठी काम करण्याचे होतय कौतुक...

कराड
म्हणतात ना लादलेले पुढारी वेगळे...मला नेता म्हणा...म्हणणारे वेगळे...आणि वेळ आली की प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणारे विरळच... येथील पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार हे ग्राउंड वर उतरून लोकांसाठी काम करणारे नेते आहेत हे त्यांनी आज पुन्हा दाखवून दिले आहे... शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा तेथील पाटण कॉलनी येथील रहेवाश्यांची गैरसोय होते त्यांना अनेक अडचणी ना सामोरे जावे लागते...याचे भान ठेवून आज जरा पाऊस वाढतोय याचा अंदाज घेऊन स्वतः बांधकाम सभापती रस्त्यावर आले आणि त्यांनी त्या कॉलनीतील लोकांची विचारपूस केली व प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या...  प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारे पवार मेहेरबान वेळ पडली की मात्र जनतेसाठी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य कसे  पेलतात याचे उदाहरण यानिमित्ताने आज लोकांसमोर आले...

हणमंतराव पवार हे कार्यकर्ता ते नेता असा प्रवास करून त्यांच्या स्वतःच्या राजकीय कष्टावर व लोकांच्या विश्वासावर सलग पालिकेत पोचले आहेत... बांधकाम सभापती म्हणून त्यांच्या नावे रेकॉर्ड झाले आहे...कारण त्यांच्या कालावधी एवढे हे पद अद्याप इतर कोणीच भूषवले नाहीये अशी नोंद आहे...
त्यांनी लॉक डाऊन काळात देखील स्वतः ग्राउंड वर उतरून लोकांसाठी अनेक मदतीचे हात दिले आहेत मास्क सॅनिटायझेर चे वाटप असेल जीवनावश्यक वस्तू तसेच कोरोनाची घरागरातून जनजागृती असेल अश्या अनेक कामातून ते जनतेसमोर वारंवार आले आहेत आणि वैशिठय म्हणजे या विषयीची कोणतीही जाहिरात त्यांनी कधीही केली नाही...लोकांसाठी काम करत राहणे असा त्यांचा कार्यकर्त्यांचा पिंड आहे...मागील पूरपरिस्थिती वेळी देखील त्यांनी लोकांसाठी असंच काम उभे केले आहे
गेले काही दिवस पावसाचा धुमाकूळ चालू आहे शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत तिथे वेळेवर आणि लक्षपूर्वकपणे येणाऱ्या पूर परिस्थितीत तेथील लोकांची काळजी घेणे गरजेचे असते म्हणजे त्याठिकाची गरज ओळखून वेळीच तेथील लोकांचे इतर ठिकाणी स्थलांतर करणे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि याचेच भान शहराचे नगरसेवक म्हणून  पवार यांनी वेळीच ओळखून पाटण कॉलनीतील लोकांची आज त्यांनी तातडीने चौकशी करून त्यांच्या यांबाबतीतील अडचणी समजून घेतल्या तसेच तेथील पाहणी करून संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या
कधीही कुठल्याही प्रसिद्धी झोतात न वावरणाऱ्या मात्र गरज पडली की लोकांसाठी सर्वांच्या अगोदर धावून येणाऱ्या बांधकाम सभापतींचे यानिमित्ताने शहरात कौतुक होत आहे

886 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 8 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  886 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 8 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 29(9130), कराड 220 (33155), खंडाळा 44 (12666), खटाव 53 (21094), कोरेगांव 64(18376), माण 74 (14208), महाबळेश्वर 3(4449) पाटण 36(9387), फलटण 95 (29946), सातारा 181(43925), वाई 80(13880) व इतर 7 (1574) असे आज अखेर एकूण 211790 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(191), कराड 0 (993), खंडाळा 0 (160), खटाव 3(503), कोरेगांव 0(396), माण 0 (291), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(316), फलटण 2(494), सातारा 1 (1295), वाई 2 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5110 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Wednesday, July 21, 2021

जिल्ह्यात सरासरी 76.2 मि.मी. पाऊस

सातारा, दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज  गुरुवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 76.2  मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 196.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 100.6(192.6) मि. मी., जावळी- 140.2(295) मि.मी., पाटण-132.9 (290.4) मि.मी., कराड-81.4(156.6) मि.मी., कोरेगाव-50.2 (134.9) मि.मी., खटाव-37.3 (83.3) मि.मी., माण- 8.1 (126.4) मि.मी., फलटण- 4.7 (70.1) मि.मी., खंडाळा- 23.7 (68.7) मि.मी., वाई-112.4 (232.8) मि.मी., महाबळेश्वर-198.3 (848.4) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
                                                                       0000

1012संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  1012 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 15(9101), कराड 267 (32935), खंडाळा 66 (12622), खटाव 101 (21041), कोरेगांव 71(18312), माण 76 (14134), महाबळेश्वर 10(4446) पाटण 12(9351), फलटण 138 (29851), सातारा 188(43144), वाई 63(13800) व इतर 5 (1567) असे आज अखेर एकूण 210904 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
 

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(191), कराड 3 (993), खंडाळा 2 (160), खटाव 1(500), कोरेगांव 0(396), माण 1 (291), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(316), फलटण 1(492), सातारा 4 (1294), वाई 2 (313) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5102 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

कोयना धरण निम्मे भरले...धरणात 55.07 टीएमसी एवढा पाणीसाठा...

कराड
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. दरम्यान चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात अडीच टीएमसीने वाढ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरणात 55.07 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून 33 हजार 912 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाला संबोधले जाते. या धरणातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती व पुरवठाही केला जातो. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नवजा येथील पर्जन्यमापकावर 79 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना परिसरात सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे.
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चोवीस तासात मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार कोयना धरणाच्या पाणी पातळी 2113 फूट तर पाणीसाठा 55.07 टीएमसी हाला आहे. धरणातील पाण्याची आवक 33 हजार 912 क्युसेसने सुरु आहे. चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात कोयना येथे 52 मिमी, (एकूण 1453), नवजा 79 मिमी (एकूण 2055) तर महाबळेश्वर 46 मिमी (एकूण 1989) एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

Tuesday, July 20, 2021

जिल्ह्यात सरासरी 19.8 मि.मी. पाऊस

सातारा, दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज  मंगळवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 19.8  मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 119.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 23.3 (91.7) मि. मी., जावळी- 47(154.8) मि.मी., पाटण-35.0 (157.5) मि.मी., कराड-14.0(75.0) मि.मी., कोरेगाव-9.7 (84.7) मि.मी., खटाव-7.8 (46.0) मि.मी., माण- 3.6 (118.3) मि.मी., फलटण- 0.7 (65.4) मि.मी., खंडाळा- 2.7 (45.0) मि.मी., वाई-18.3 (120.4) मि.मी., महाबळेश्वर-85.6 (636.3) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
                                                                       0000

आज आषाढी निमित्त डॉ तेजस्वी सौरभ पाटील यांनी उलगडला "माझे माहेर पंढरी' चा भक्तीपूर्ण प्रवास...

कराड
येथील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांचा राजकारणासह इतर विषयातील माहितीपूर्ण अभ्यास त्यांच्याशी बोलले की लगेच समजतो...हातच्या काकणाला आरशाची गरज नसते याची प्रचिती त्यांच्याशी बोलताना येते...वेगळे सिद्ध करायची गरज नसते...त्यांच्या सुविद्य पत्नी तेजस्वी सौरभ पाटील या डॉक्टर आहेत...लसीकरण मोहिमेमध्ये पतीच्या खांद्याला खांदा देत त्यानी सुरुवातिपासून आपले डॉक्टर म्हणून कर्तव्य लीलया पार पाडल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे...कर्तव्याबरोबरच आपल्या अध्यात्मिक संस्कारांना देखील त्यांनी उत्कट भक्तीसह जपल्याचे जाणवते हे त्यांच्या विठ्ठल भक्तीतून... त्यांचे माहेर पंढरी... अवघ्या विश्वाची माऊली  सावली बनून त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे याचा साक्षातकार त्यांचे भक्तीपूर्ण शब्द वाचून होतो...आणि,आज आषाढी...  सौ तेजस्वी पाटील या परमेश्वरी अधिष्ठानाला आपलेसे करणारे शब्द लिहुन जेव्हा आपल्या "माहेर पंढरी' च्या आठवणी सांगू लागतात तेव्हा "पंढरीच जणू अवतरली' असा अनुभव येतो.  

 सौ तेजस्वी सौरभ पाटील यांच्या "आषाढी' आठवणी त्यांच्याच शब्दात...त्यांनी लिहिलेलं जसे च्या तसे...

वारी_एक_अनूभव
माझे माहेर पंढरी,
आहे भीवरेच्या तीरी!
बाप आणि आई,
माझी विठ्ठल रखुमाई!!
संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला अभंग मला खूप जवळचा वाटतो. त्याला कारण देखील तसेच आहे. माझे माहेर पंढरपूर आहे... त्यामुळे विठ्ठल, रुक्मिणी, वारी, वारकरी, संत परंपरा हे सर्व माझ्या माहेरचे असल्याने मी थोडा जास्त अधिकार वाणीने यावर बोलू शकते...
  
माझे आजोबा श्री आनंदराव जगताप, आम्ही तात्या म्हणायचो त्यांना, हे निस्सीम विठ्ठल भक्त... दररोज पहाटे चार वाजता उठून हरिपाठ म्हणत...  अंघोळ झाली कि ज्ञानेश्वरी वाचन हा नित्यक्रम... त्यानंतर आजी सोबत विठ्ठल दर्शनाला मंदिरात जात असत... घराबाहेर अंगणामध्ये पांढरा केशरी पारिजातकाचा सडा पडलेला... आजी जाताना आवर्जून देवासाठी फुले घेऊन जायची... 
   आषाढी वारी हा तर सर्व वैष्णवांचा हजारो वर्षांपासूनचा ठरलेला मेळा... देहू आळंदी मधून ज्ञानोबा तुकोबा रायांच्या पालख्या निघाल्या कि इकडे आम्हाला वेध लागायचे... एकादशी चे....
   घरी भलं मोठं अंगण... तात्यांनी साधारण शंभर वारकरी थांबू शकतील अशी सोय केलेली होती... अनेक वयस्कर वारकरी दहा पंधरा दिवस आधी यायचे... सोबत कोरडा शिधा आणलेला असायचा.... तात्या त्यांना चूल, जळण, तेल मीठ, चटणी लागेल ती सामग्री द्यायचे... 
ज्या प्रमाणे नदीला पूर येताना पाण्याची पातळी हळू हळू वाढते तशीच काहीशी सुरुवात सुरूवात असायची... जस जसा एकादशीचा दिवस जवळ येतो तस तसा भक्तीचा आणी भक्तांचा महापूर पंढरपुरात उसळतो.. 
   अंगणामध्ये सतत अभंग, भजन, कीर्तन सुरू असायचे... चार वाजता प्रवचन तर रात्री नऊ वाजता जेवणानंतर  कीर्तन आणी हरिनामाचा गजर असे... आजही ते खणाणणारे टाळ, चिपळ्या, मृदंग, साथ देणारी वीणा कानामध्ये तसाच नाद करत आहे... आणि नंतर यायचा विठोबा रखुमाई चा जयघोष... 
     आषाढी यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा... मग यात छोटे मोठे  झोपाळे, खेळण्यांची पाले, रंगीबेरंगी लाईट्स, मेव्याची दुकाने बहरात येतात... आम्हाला शाळांना पण सुट्टया असायच्या... आमच्या बच्चे कंपनीला तर तिकडची ओढ लागलेली... तात्या खेळणी आणायला प्रत्येकाला पैसे द्यायचे आम्ही जातानाचा यात्रेत काय काय घ्यायचं, काय काय करायचं यावर चर्चा करत करत घराबाहेर पडून त्या गर्दीचा भाग होऊन जायचो...
   कधी कधी कीर्तनाच्या आधी भारूड असतं... ते आम्हा लहानांसाठी विशेष आकर्षण असायचं. आमच वय तर अभंग समजायचं नव्हतं पण भारूड मनोरंजनातून जनजागृती करतं... 
  दशमीला पालख्यांसोबत आलेले अनेक वारकरी बारीला (दर्शनाची रांग) येऊन थांबायचे. मग यायचा तो एकादशीचा दिवस. माझी आई, बाबा, काका, काकी, आत्या, मामा सगळे कुटूंबच हसतमुखाने वारकऱ्यांच्या सेवेत रमलेले असत... आम्हा मुलांना पंगतीत वाढपीचे काम असे... तसा घरच्यांचा आग्रह होता... कारण स्वतः विठ्ठल पंगतीत जेवतो अशी मान्यता आहे... लहानांना पत्रावळ्या, द्रोण,मीठ, लिंबू असे तर मोठ्यानां शाक भात वाढायला मिळत... दशमीच्या पंगतीत डाळीची आमटी(शाक) भात आणि शिरा असा बेत असे एकादशीला फराळ आणि द्वादशीला पुरी भाजी, मसाले भात असा बेत असतो... तासंतास बारीला उभं राहून विठू माऊलीच निर्मळ विश्वव्यापी रूप डोळ्यात साठवून मग वारकरी आमच्या घरी यायचे... समाधान भरून पावलेले ते वारकरी जाताना तात्यांच्या पाया पडून जात आणी तात्या पण दर्शन घेऊन आलेल्या माऊलीच्या पाया पडत...
  साधारणपणे वारकरी हा सर्वसामान्य कुटूंबातील असतो. जाताना एसटी चे टायमिंग बघून ते परतीचे नियोजन करतात. वारकऱ्याचा पाय निघत नसतो ना आम्हाला त्यांना सोडावं वाटतं. दर्शन करून येताना आमच्या साठी मेवा बत्तासे घेऊन येत... काही वारकरी मुक्कामी राहतात. दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. ते सर्व नियोजन आम्हा कुटूंबियांमार्फत केले जाते... संकल्प सोडून महाप्रसाद केला जातो. पोर्णीमेपर्यंत वारकर्यानी पंढरी गजबजलेली राहते. पोर्णीमेला पंढरपूर शेजारील गोपाळपूर येथे आणि घरीही काला होतो. काल्याचे कीर्तन होते... काला म्हणजे सर्व विठ्ठलभक्त एकत्र येऊन भगवान श्रीकृष्णाच्या गवळणी गातात, अभंग कीर्तने होतात. एकत्र येऊन जेवण करतात. मग पंढरी रिकामी व्हायला सुरुवात होते...
  यावर्षी देखील मात्र ना वारी आली ना वारकरी ना यात्रा भरली ना दुकाने सजली. पण माझा पांडुरंग, माझी रखुमाई अठ्ठाविस युगे आम्हा लेकरांची काळजी घेत  पंढरी मध्ये उभे आहेत.  उभे राहतील...

 डाॅ. सौ तेजस्वी सौरभ पाटील.
   कराड.

आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता...

कराड
किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबई, ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभागात धुवाधार पाऊस सुरू असून, तो विक्रमाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्य़ात देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कमी दाबाचा पट्टा आणखी तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने मुंबई, ठाण्यासह कोकणात आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये या कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.


महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारीही (१९ जुलै) मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आदी जिल्ह्य़ांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळला. कोकणात नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, मुंबई-ठाण्यातील जोरदार पावसाने जनजीवनावर परिणाम झाला आहे. मध्य महाराष्ट्रात नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत हंगामात प्रथमच मुसळधार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर, नाशिक, पुणे, जिल्ह्यातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोल्हापुरातील गगनबावडा येथे 179 मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक मधील हरसूल येथे 126.2 पेठ मध्ये 183 सुरगाणा 117.1 पुण्यातील लोणावळा 167. 1 मिलीमीटर पाऊस पडला. नगर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात व खानदेशात देखील ढगाळ वातावरण आहे.
मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे उशिरा पेरणी केलेल्या पिकांना आधार मिळाला विदर्भात देखील अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडलाय.

निसर्गवारीचे वृक्षलागवडीचे काम सर्वश्रेष्ठ :जिल्हाधिकारी शेखर सिंह; निसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण...

कराड ः 
संतांनी निसर्गात देव शोधला. हेच काम निसर्ग वारीच्या माध्यमातून सुरू आहे. निसर्गवारी ग्रुप वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

पुनर्वसीत डिचोली (धोंडेवाडी) (ता. कराड) येथे निसर्गवारी 2021 अंतर्गत आयोजित 'संकल्प 221 वृक्ष लागवडीचा' या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, निसर्ग वारी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे, सहप्रमुख रणजित पाटील. सदस्य व नगरसेवक विजय वाटेगावकर, गौतम करपे, संदीप सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, डॉ. अमित खाडे तसेच जि.प. सदस्य मंगलताई गलांडे, सरपंच रेखा काकडे, उद्योजक बाळासाहेब कोळेकर, माणिक गंगवणे, अनिल पवार, संजय काकडे, शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेखर सिंह म्हणाले, निसर्ग वारीच्या माध्यमातून हाती घेतलेला वृक्षलागवडीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ङ्गझाडे म्हणजे देव आहेफ झाडांमधील देवाला ओळखून निसर्ग वारीच्या माध्यमातून काम झाले आहे. निसर्गवारी ग्रुप जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ  आहे.

जर्मनीमध्ये अतिवृष्टी होऊन पूर आला. त्यामध्ये 180 ते 200 लोकांचे मृत्यू झाले. अरबी समुद्रात कधी सायक्लॉन येत नव्हते परंतु 2001 पासून ते येऊ लागले आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये 50 डिग्री सेल्सीअस होते. याला कुठे न कुठे माणूसच जबाबदार आहे. वृक्षतोड कारणीभूत आहे. या परिस्थितीत निसर्गवारी ग्रुपचे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन समाजाला दिशा देणारे ठरेल.

पहिला पाऊस जून-जुलै, ऑगस्ट मध्ये पडत होता. मात्र गेली 10 ते 15 वर्षांपासून पाऊस अवेळी पडत आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे झाडे लावण्यामध्ये मोठा वाटा शेतकरी बांधवांचा वाटा असला पाहिजे. आपण आषाढी वारी निमित्त झाडे लावतो आहे. आपण विठ्ठलाचे रुप म्हणून त्याचे संगोपन करा. डिचोली ग्रामस्थ झाडांची काळजी घेतील. सयाजी शिंदे सुद्धा वृक्ष लागवड व संवर्धनाची संकल्पना राबवित असतात. सातारा जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीबाबत चळवळ उभी रहात आहे, याचे समाधान आहे.

सतीश मोरे म्हणाले, 2015 पासून आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे. मात्र कोरोनामुळे वारी बंद आहे. मागील वर्षी मनमंदिर  वारी केली. यावर्षी वारी कशी करावी असा विचार सुरू होता. ऑक्सिजनची वाढलेली गरज आणि वाढणारे प्रदूषण ओळखून 221 वडाची झाडे लावण्याचा संकल्प केला. आळंदी ते पंढरपूर अंतर 221 कि.मी.असल्यामुळे येवढी झाडे लावली. प्रत्येक झाडात माउलीचे रूप आहे.  डिचोलीत वृक्षारोपणाचा योग आला. येथे लावलेल्या झाडांचे संगोपन येथील ग्रामस्थ करतील याची खात्री आहे. आज वारी सार्थकी लागली आहे. 'याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा', याची प्रतिची आली.  

बाळासाहेब कोळेकर म्हणाले, तीन ठिकाणी पुनर्वसीत झालेल्या डिचोली गावाच्या काही अडचणी आहेत. जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत. निसर्ग वारीमुळे येथील वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळाले आहे.  

प्रास्ताविक  व सूत्रसंचालन सचिन काकडे यांनी केले.आभार सुरेश चौघुले यांनी मानले.यावेळी डिचोली येथे 104 वृक्षारोपण ग्रामस्थ व निसर्गवारु  परिवाराच्या वतीने करण्यात आले.

 वडाची डिचोली म्हणून गाव ओळखले जाईल 
..
पुनर्वसीत डिचोलीमधील ग्रामस्थ वृक्षप्रेमी आहेत. येथील प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे याची जाणीव करून देत आहेत. वृक्षांबाबत त्यांचे प्रेम पाहूनच येथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निर्णय निसर्गवारी गु्रपने घेतला आहे. आज येथे 104 झाडे लावण्यात आली आहेत. यातील 75 झाडे वडाची आहेत. येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. भविष्यात हे गाव केवळ डिचोली म्हणून नव्हे तर वडाची डिचोली म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद सतीश मोरे आणि रणजित पाटील यांनी व्यक्त केला.

कृष्णा हॉस्पिटल लसीकरणासाठी पुन्हा सज्ज...गुरुवारपासून लसीकरणास प्रारंभ... कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लशींचे डोस दाखल

कराड, ता. २० : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वांत महत्वाचा भाग असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी कृष्णा हॉस्पिटल पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लसीचे ६००० डोस; तर कोव्हॅक्सिनचे २८८० डोस उपलब्ध झाले आहेत. गुरुवार दि. २२ जुलैपासून कृष्णा हॉस्पिटलमध्ये वय वर्षे १८ पूर्ण झालेल्या व त्यापुढील वयाच्या लोकांना सकाळी ९.३० ते ५ या वेळेत माफक दरात ही लस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती, कृष्णा चॅरिटेबरल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटल सुरवातीपासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनावरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड निर्मितीबरोबरच कोरोना चाचणी व लसीकरणात कृष्णा हॉस्पिटल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून ६००० हून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच पहिल्या टप्पातील लसीकरण मोहिमेअंतर्गत कृष्णा हॉस्पिटलमध्ये जवळपास ९००० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

या लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्याच्या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटल पुन्हा एकदा सज्ज झाले असून, गुरूवारपासून (ता. २२) कृष्णा हॉस्पिटलमध्ये सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ पर्यंत नियमित लसीकरणाला प्रारंभ होत आहे. सध्या कृष्णा कोविशिल्ड लसीचे ६००० डोस; तर कोव्हॅक्सिनचे २८८० डोस उपलब्ध झाले आहेत. यापैकी कोविशिल्डच्या एका डोसची किंमत ७८० रुपये असून, कोव्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत १२०० रुपये इतकी आहे. लसीकरणासाठी येताना नागरिकांनी सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड व आधारला लिंक असणारा मोबाईल आणावा. ज्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुरू आहेत अशा रुग्णांनी, तसेच इमनोकोंप्रमाईज रुग्ण, तसेच मधुमेही अथवा उच्चरक्तदाब असणाऱ्या रूग्णांनी आपल्या डॉक्टरला तब्येत दाखवून, त्यांच्याकडून लस घेण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन यावे.

कोरोनावर प्रतिबंध आणण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याने, नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

862 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  862 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 26(9086), कराड 246 (32668), खंडाळा 28 (12556), खटाव 104 (20940), कोरेगांव 50(18241), माण 94 (14058), महाबळेश्वर 3 (4436) पाटण 18 (9339), फलटण 77 (29713), सातारा 124 (43556), वाई 75 (13737) व इतर 17 (1562) असे आज अखेर एकूण 209892 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3 (191), कराड 12 (990), खंडाळा 0 (158), खटाव 4(499), कोरेगांव 3(396), माण 1 (290), महाबळेश्वर 0 (85), पाटण 1(316), फलटण 0(491), सातारा 9 (1290), वाई 1 (311) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5088 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

जिल्ह्यात सरासरी 9.2 मि.मी. पाऊस

सातारा, दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज  मंगळवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 9.2  मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 100 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात सकाळी 10वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 7.5 (68.4) मि. मी., जावळी- 16.8(107.8) मि.मी., पाटण-19.1 (122.5) मि.मी., कराड-7.4(61.0) मि.मी., कोरेगाव-3.1 (75.0) मि.मी., खटाव-2.6 (38.2) मि.मी., माण- 1.6 (114.7) मि.मी., फलटण- 0.5 (64.7) मि.मी., खंडाळा- 1.1 (42.3) मि.मी., वाई-6.9 (102.1) मि.मी., महाबळेश्वर-56.1 (553.7) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
                                                                       0000

अण्णा पावस्करांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; 14 जुलै च्या सभेतील"तो'ठराव रद्द करा ; स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी निधीचा गैरवापर झाल्याची पावसकरांची तक्रार....

वेध माझा ऑनलाइन
कराड
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना शहराच्या विकासासाठी 5 कोटी निधी आणला होता त्यातला अडीच कोटीचा निधी शासन आदेश डावलून दोन नगरसेवकाच्या 2 कामासाठी वळवण्यात आला असल्याने 14 जुलै च्या सभेतील विषय क्रमांक 17 बाबतचा ठराव हा कलम 308 खाली रद्द करावा अशी तक्रार भाजपा चे पालिकेतील गटनेते अण्णा पावसकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे केली आहे त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी निधीचा गैरवापर करण्याच्या प्रकारला यानिमित्ताने पायबंद बसेल असेही पत्रकात म्हटले आहे 

पत्रकात म्हटले आहे की,भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष.विक्रम विनायक पावसकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना कराड शहराच्या विकासासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून आणला होता.त्यामध्ये शहरातील २८ रस्त्यासाठी सुमारे २.५० कोटी निधी टाकण्यात आला होता. सदरचे रस्ते पूर्ण झालेले आहेत. उरलेला २.५० चा निधी हा शहरातील L.E.D. दिवे बसवण्यासाठी म्हणून आणलेला होता.परंतु सरकारने शहरातील L.E.D. दिवे बसवण्यासाठी नवीन अटी घालून योजना अमलात आणल्यामुळे सदरचा २.५० कोटी रुपयांचा निधी नगपरिषदेच्या अखत्यारीतील ४ जागांचा विकास करण्यासाठी म्हणून व ६ कामे गावातील ले आउट मधील विकास करण्यासाठी म्हणून ठराव करून तो शासनास देवून त्याला मंजुरी घेतली. या कामामध्ये, सोमवार पेठेतील जुन्या मतीमंद शाळेच्या ठिकाणी वाचनालय अभ्यासिका बांधणे. शॉपिंग सेंटर बांधणे. कुंभार पाणवठा येथील दशक्रिया विधी शेड सुशोभिकरण करणे, कृष्ण नाका प्लॉट मध्ये आभ्यासिका बांधणे.
वरील कामासाठी म्हणून १ कोटी ५५ लक्ष रुपये खर्च करावेत तसेच शहरातील ले आउट मधील ६ ओपन स्पेस
यासाठी ९५ लाख रुपये खर्च अपेक्षित केला परंतु नगरसेविका सौ.स्मिता हुलवान यांच्या वार्ड क्र.११ यामधील २ ओपन प्लॉट मध्ये २.५० कोटी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे खर्च करण्याचा घाट घातला गेला....... त्यावेळेला आम्ही तक्रार केल्यानंतर सदरचे बेकायदेशीर काम थांबवण्यात आले  

नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये याबाबतचा विषय क्रमांक  १७ हा अतिशय घाईगडबडीत मंजूर करण्यात आला आहे  शासन निर्णयानुसार कुठल्या कामावर किती खर्च करावा याचे स्पष्ट आदेश दिले आहेत शासनाचे आदेश डावलून  मुख्याधिकारी डाके  यांच्याकडून चुकीचा अहवाल घेवून त्यांच्या सहकार्याने कल्याणी कॉलनीमध्ये जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांचा बंगला असल्याने व नगरसेविका सौ.स्मिता हुलवान यांचा वार्ड क्र.११ येत असल्याने बेकायदेशीरपणे ठराव करून स्वतःच्या
वार्डात व स्वतः च्या गटनेत्यांच्या बंगल्याशेजारील भाग विकसित करण्याचा घाट घातला गेला आहे. तरी नगरपरिषदेच्या विकास कामामध्ये अडथळे आणून शहराचा विकास न करता सरकारकडून आलेल्या निधीचा वापर फक्त २ कामावर करून स्वतःचा फायदा करून घेण्याचा घाट घातला गेला असून यासाठी या ठरवास आमचा विरोध आहे ३०८ खाली हा ठराव रद्द करण्यात यावा अशी मागणी गटनेते अण्णा पावसकर यांनी केली आहे त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी निधीचा गैरवापर करण्याच्या प्रकारला पायबंद बसेल असेही पत्रकात म्हटले आहे

Monday, July 19, 2021

570 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  570 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 13 (9060), कराड 108 (32422), खंडाळा 38 (12528), खटाव 59 (20836), कोरेगांव 52 (18191), माण 36 (13964), महाबळेश्वर 11 (4433), पाटण 21 (9321), फलटण 54 (29636), सातारा 136 (43432), वाई 36 (13662) व इतर 6(1545) असे आज अखेर एकूण 209030 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (188), कराड 2 (978), खंडाळा 0 (158), खटाव 1 (495), कोरेगांव 1 (393), माण 1 (289), महाबळेश्वर 0 (85), पाटण 1(315), फलटण 2 (491), सातारा 3 (1281), वाई 0 (310) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5054 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

जिल्ह्यात सरासरी 8.2 मि.मी. पाऊस

सातारा, दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज  सोमवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 8.2  मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 90.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 6.4 (260.9) मि. मी., जावळी- 9.4(91) मि.मी., पाटण-10.3 (103.1) मि.मी., कराड-6.1(53.6) मि.मी., कोरेगाव-5.1 (71.9) मि.मी., खटाव-4.3 (35.6) मि.मी., माण- 5.6 (113.1) मि.मी., फलटण- 1.8 (64.2) मि.मी., खंडाळा- 0.5 (41.2) मि.मी., वाई-10.9 (95.2) मि.मी., महाबळेश्वर-49.9 (497.6) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
                                                                       0000

Sunday, July 18, 2021

जर मोहिते जिंकले असते...तर कृष्णा कारखाना निवडणुकीमुळे कोरोना वाढला असे पृथ्वीराज बाबा म्हटले असते...?"कृष्णा' काठी रंगली चर्चा...

अजिंंक्य गोवेकर
वेध माझा ऑनलाइन
कराड
प्रिथ्वीराजबाबांनी नुकतेच असे स्टेटमेंट केले की कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमुळे कराड तालुक्यात कोरोना वाढला...खरतर हा त्यांनी लावलेला शोध खराही असेल,मात्र भोसलेंनी एकतर्फी हा कारखाना हातात घेऊन आ पृथ्वीराज बाबा यांच्या हसक्षेपाला व भविष्यातील मनसुब्याना या निकालाने धुळीस मिळवले हा राग तर बाबा कोरोनाच्या नावाखाली आळवत नसतील ना?अशी चर्चा आहे...जर या ठिकाणी मोहितेंच पॅनल निवडून आले असते...तर बाबानी कोरोनाचे खापर या निवडणुकीवर फोडले असते का? अशी चर्चाही "कृष्णा' काठी आता रंगली आहे

सध्याचे कोरोनाचे कराड तालुक्यातील चित्र फारच विदारक आहे जिल्ह्यात सर्वात अधिक रुग्णसंख्या व मृत्युदर याच तालुक्यात दिसतोय त्यासाठी प्रशासन नेमकं काय काम करतंय हा जिल्ह्यासमोर प्रश्न आहेच... चुकीचे लॉक डाऊन... आकडे घोटाळा... शासन स्तरावरील "मंत्र्यांच्या' ठोस निर्णय क्षमतेची उदासीनता... प्रशासनाचे वारंवार नवीन जी आर काढण्याचे प्रयोग करून एकप्रकारे लोकांच्या जीवनाशी खेळण्याबाबतचे धोरण...तसेच जिल्ह्यातील आमदार महेश शिंदे यांचेसह काही लोकप्रतिनिधी सोडले तर... इतरांची केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याची सोयीस्कर भूमिका... या व अशा अनेक कारणांमुळे कोरोना जिल्ह्याला चिकटूनच बसल्याचे वास्तव लोकांसमोर आहे...याबाबत बाबा कधीच का बोलत नाहीत? जिल्ह्यात आणखी बरीच कारणे कोरोना वाढीसाठी चर्चेत असताना कृष्णा कारखान्याची निवडणूक  कोरोना वाढीसाठी कारणीभूत आहे असे विधान नुकतंच आ प्रिथ्वीराजबाबांनी एका पत्रकार परिषदेतूंन केले आहे...ते करण्यामागे नेमकं कारण काय... याचीच सगळीकडे  चर्चा आहे...

नुकतीच काही दिवसापूर्वी येथील कृष्णा कारखान्याची निवडणूक पार पडली भोसले गटाने या निवडणुकीत प्रतिस्पर्धी दोन्हीं मोहितेना धूळ चारत अद्वितीय असा विजय संपादन करत आत्ता पर्यंत कृष्णेत झालेल्या विजयाचे रेकॉर्ड मोडित काढून सत्ता काबीज केली...दोन्ही मोहित्यांना खजील करणारा प्रराभव पहावा लागला... याचे त्या त्या वेळी सविस्तर विश्लेषण झाले आहे  पृथ्वीराजबाबांनी या निवडणुकीत या दोन्ही मोहिते गटांना एकत्र करण्यासाठी खूप प्रयत्न केले खरे...पण नाही जमले... त्यानंतर निवडणूक पार पडली आणि पुढचा सगळा पट जिल्ह्यासमोर आहेच.... पण दोन दिवसापूर्वी प्रिथ्वीराजबाबां कराड मध्ये पत्रकार परिषदेत म्हणाले की या कारखान्याच्या निवडणुकीमुळे तालुक्यात कोरोना वाढला...कदाचित तसे असेलही...प्रशासनाकडून त्यांना तसे रिपोरटिंग झालेही असेल...पण प्रश्न असा आहे की एवढेच कारण कोरोना वाढीसाठी पुरेसे मानावे का...? ही निवडणूक कोरोनाचा पीक पिरियड असताना तालुक्यात होत आहे हे बाबांना त्याचवेळी माहीत होते... मग त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून ही निवडणूक थांबविण्यासठी काहीच प्रयत्न का केले नाहीत....निवडणूक होऊ नये म्हणून एखादी याचिका...किंवा तक्रार कुठे केली का? तसे केले असते तर, जसे ही निवडणूक झाल्यामुळे कोरोना वाढला असे म्हटले जातंय...तसे ही निवडणूक कॅन्सल होऊन कोरोना आटोक्यात आला असेही म्हणायला वाव होताच की...मात्र तसे प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही... उलट या निवडणुकीत लक्ष घालून दोन्ही मोहित्यांना एकत्र करत भोसलेंना तगडा विरोध व्हावा यासाठी फिल्डिंग लावण्याचा उघड प्रयत्न बाबांनी केल्याचे सर्वांनाच माहीत आहे...एका मोहित्यांकडे ना विश्वजीत कदम होते तर दुसरीकडे युवा नेते ऍड उदयदादा उंडाळकर होते तरी यश आले नाही... निवडणूक तिरंगी होऊन भोसले विजयी झाले...खरतर ही निवडणूक व्हावी असा कोर्टाचा आदेश होता... त्यामुळे निवडणूक ही होणारच होती...ती कोण जिंकेल हे त्यावेळी कोणीच सांगू शकत नव्हते...मग निकाल जाहीर झाल्यानंतर आपण एकत्र करायला निघालेल्या मोहितेना नामुष्कीजनक पराभव सहन करावा लागला याचे शल्य माजी मुख्यमंत्र्यांना आहे का? म्हणून त्यांनी दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील वाढत्या कोरोनाचे खापर या निवडणुकीवर फोडून आपली मळमळ व्यक्त केली का? अशीच यानिमित्ताने चर्चा सुरू आहे...आणि ,हेच जर उलटे झाले असते तर...म्हणजे मोहित्यांनी एवढा मोठा विजय या निवडणुकीत मिळवला असता आणि मोहिते कृष्णेच्या सत्तेत आले असते.. तर... कृष्णा निवडणुकीमुळे कोरोना वाढला असा साक्षात्कार बाबा ना झाला असता का ? याचीच चर्चा आता   सम्पूर्ण "कृष्णा' काठावर सुरू आहे...

821 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 29 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  821 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 29 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 20 (9047), कराड 230 (32364), खंडाळा 43 (12490), खटाव 51 (20777), कोरेगांव 57 (18139), माण 22 (13928), महाबळेश्वर 1 (4422), पाटण 15 (9300), फलटण 95 (29612), सातारा 189 (43347), वाई 88 (13626) व इतर 10(1539) असे आज अखेर एकूण 208591 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3 (188), कराड 15 (976), खंडाळा 1 (158), खटाव 1 (494), कोरेगांव 2 (392), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 2(314), फलटण 0 (489), सातारा 5 (1278), वाई 0 (310) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5043 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

कराडच्या स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन...सामाजिक कार्यकर्ते विजय यादव यांच्या हस्ते झाले शिबिराचे उदघाटन...

कराड
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित येथील सेवा केंद्राच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकते विजय यादव यांच्या हस्ते करण्यात आले
 यावेळी माजी नगराध्यक्षा सौ संगीता देसाई ,बापू देसाई,गलांडे,गणेश पवार आदी उपस्थित होते

सध्या कोविड च्या संकटात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय सामाजिक बांधीलली मानून या शिबिराचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले ही स्वामी समर्थ सेवा संस्था ही राज्यभर अध्यात्मिक कार्य करत असते समाजकाऱ्यात देखील या संस्थेचे मोठे काम आहे 
दरम्यान येथील स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या घेतलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे

Saturday, July 17, 2021

कराडात होणार शंभर बेड चे कोविड सेंटर: मोफत उपचार मिळणार - आ पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा...

कराड
वेध माझा ऑनलाइन
कोरोनाच्या संभाव्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्ट 2021 पर्यंत हे सेंटर कार्यान्वित होणार असून याठिकाणी सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. तसेच कराड दक्षिणेतील ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा सुधारण्याकरिता आमदार फंडातून 1 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी कोरोना संपलेला नाही. नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने तसेच न्यायालयाच्या आदेशामुळे कारखान्याची निवडणूक झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील गावामध्ये रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तर कराड दक्षिणमधील ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा सुधारण्याकरिता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडाळे ग्रामीण रुग्णालय व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड नागरी सुविधा केंद्रांसाठी आमदार फंडातून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केली आहे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने कराडला महा जम्बो कोविड सेंटरला मंजूरी दिली असून या ठिकाणी 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत हे सेंटर कार्यान्वित होेणार आहे. या ठिकाणी आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले

जिल्ह्यात 878 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू....

सातारा
सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.जावली 35 (9027), कराड 207 (32134), खंडाळा 36 (12447), खटाव 81 (20726), कोरेगांव 53 (18082), माण 73 (13906), महाबळेश्वर 8 (4421), पाटण 35 (9285), फलटण 79 (29517), सातारा 185 (43158), वाई 78 (13538) व इतर 8 (1529) असे आज अखेर एकूण 207770 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (186), कराड 7 (959), खंडाळा 0 (157), खटाव 2 (493), कोरेगांव 2 (390), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(312), फलटण 0 (489), सातारा 3 (1274), वाई 0 (310) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5014 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Friday, July 16, 2021

801 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  801 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 17 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 21 (8992), कराड 274 (31927), खंडाळा 29 (12411), खटाव 57 (20645), कोरेगांव 71 (18029), माण 40 (13833), महाबळेश्वर 6 (4413), पाटण 29 (9250), फलटण 50 (29438), सातारा 168 (42973), वाई 40 (13460) व इतर 16 (1521) असे आज अखेर एकूण 206892 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


 आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (186), कराड 9 (956), खंडाळा 0 (156), खटाव 2 (493), कोरेगांव 2 (389), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(312), फलटण 1 (488), सातारा 3 (1270), वाई 0 (309) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5003 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

ढवळाढवळ करणाऱ्या उचा"पतींची' पालिकेत रोज हजेरी...कशासाठी ? कारभारात ढवळाढवळ... वादावादिला कारण... शहरात चर्चा...

अजिंंक्य गोवेकर

वेध माझा ऑनलाइन
कराड
 येथील काही नगरसेविकांच्या पतींच्या पालिकेतील कारभारात होणाऱ्या हस्तक्षेपाच्या कारणावरून नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत खडाजंगी पहायला मिळाली लोकशाही आघाडीच्या नगरसेविका सौ पल्लवी पवार व नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्यात हा वाद झाल्याचे दिसून आले एकीकडे राजकीय विरोधकांकडून पालिकेच्या कारभारावर टीका होत असताना आता नगरसेविकांचे पती कारभारात हस्तक्षेप करतात हा मुद्दा ऐरणीवर आला आहे याला जबाबदार कोण?अशी चर्चा असताना त्यांना बरोबर घेऊन फिरणाऱ्या नेत्यांकडे लोक बोट दाखवताना दिसत आहेत...
 
 नगरसेविकांचे पती पालिकेतील कामात हस्तक्षेप करतात या कारणाने पालिकेची सभा चांगलीच गाजली यात नगरसेविका सौ पल्लवी पवार व नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्या पतींच्या कामात ढवळाढवळ करण्याचा मुद्दा पुढे आला पालिकेत असणाऱ्या सर्वच नगरसेविकांचे पती  उचापती करीत नाहीत हे खरे असले... तरी काहींना रोज पालिकेत हजरी लावल्याशिवाय चैनच पडत नाही... शासनाने पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिले आहे त्यानुसार महिला निवडून येतात त्यात काहीजणी स्वतः यशस्वीपणे कारभार करताना दिसतात तर काही महिलांचे पती  निवडणूकीनंतर त्यांच्या जागी स्वतःच कारभार करताना दिसतात... 

हे लोक एखाद्या राजकीय पार्टीच्या माध्यमातून राजकारण करताना त्या पार्टीप्रमुखाला भविष्यात अडचणीचे ठरू शकतात... त्यांचा हस्तक्षेप कारभारात वाढतो... तेच स्वतःला निवडून आलेले पुढारी समजतात...आणि पुढे जाऊन घोळ होऊन बसतो...त्यापैकी काही उचापतीच्या हस्तक्षेपामध्ये टेंडर चा स्वार्थ असतो..? तर काहींचा स्वार्थ राजकारणात पदे मिळावीत यासाठी दिसतो... ? पण त्यामुळे कारभारात व्यत्यय येण्याचे प्रकार वारंवार घडतात...पार्टीमधले इतर कार्यकर्ते... सारखे तुम्ही याच लोकांना बरोबर घेऊन का फिरता? असे म्हणत पार्टी नेत्यावर नाराजही होताना बऱ्याचवेळा दिसतात...असे  अनेक प्रकार यांतून झालेले यापूर्वी पहायला मिळाले आहेत...  झालेला पालिकेच्या सभेमधील नगरसेविकांचा वाद उचापतीच्या कारभारात ढवळाढवळ करण्यामुळेच झाला हे नाकारता येईल का...? या वादावेळी त्यांची बाजू जे-जे राजकारणी लोक घेत होते त्यांनी पालिकेतील कारभारात या उचापतींचा हस्तक्षेप पुन्हा होऊच नये याची खबरदारीदेखील यापुढे घ्यायला हवी...लोकशाहीआघाडी, भाजपा, आणि जनशक्ती यामधून अनेक महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत... त्यांपैकी काही नगरसेविकांचे पती स्वतःच नगरसेवक आहोत असे वावरताना दिसतात...त्यांना लोक "मेहेरबान' म्हणतात...आणि हे त्या हाकेला प्रतिसादही देतात .. लोक मेहेरबान कुणाला म्हणतात...? का म्हणतात...? या शब्दाचा अर्थ व जबाबदारी काय असते...हे शहराचे नेते सुभाषकाका पाटील यांनी सविस्तरपणे काही दिवसांपूर्वी सांगितले आहे... 

दरम्यान उचापती म्हणून चर्चेत असणारे पालिकेतील  केबिन मध्ये बसून शीपाई किंवा इतर कर्मचाऱ्यांना कामासबंधी ऑर्डर सोडताना दिसतात..वेळ पडली त्यांना वरच्या आवाजात बोलतात... अशी चर्चा असते...हे लोक दिवसभर पालिकेतच असतात... नेत्याच्या खुर्चीला खुर्ची लावून फोनाफोनी करत  इतर कामात विनाकारण लक्ष घालतात... आणि...हे सगळं त्यांच्या नेत्यांच्या समोर चालू असते...तरी त्या नेत्यांना हे कसे चालते...हा शहराला पडलेला प्रश्न आहे... यामध्ये काही माजी नगरसेविकांचे पतीदेखील हस्तक्षेपाच्या भानगडी करताना पालिकेत दिसतात अशी चर्चा असते 

दरम्यान,ग्रामपंचायतीत महिला सरपंच असेल तर त्यांच्या पतीला त्याठिकाणी कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही असा कायदा नुकताच पास झाला आहे...पतीचा हस्तक्षेप झाल्यास कारवाईची तरतूद देखील त्या कायद्यात केली आहे... पालिका स्तरावर असा कोणताच कायदा अस्तित्वात नसला तरी... या लोकांना बरोबर घेऊन फिरणाऱ्या नेत्यांकडूनच या उचापतींच्या हस्तक्षेपाला आवर घालणे आता गरजेचे आहे...कारण हे प्रकार आता थांबले पाहिजेत अशी लोकांची भावना आहे