Sunday, July 18, 2021

जर मोहिते जिंकले असते...तर कृष्णा कारखाना निवडणुकीमुळे कोरोना वाढला असे पृथ्वीराज बाबा म्हटले असते...?"कृष्णा' काठी रंगली चर्चा...

अजिंंक्य गोवेकर
वेध माझा ऑनलाइन
कराड
प्रिथ्वीराजबाबांनी नुकतेच असे स्टेटमेंट केले की कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमुळे कराड तालुक्यात कोरोना वाढला...खरतर हा त्यांनी लावलेला शोध खराही असेल,मात्र भोसलेंनी एकतर्फी हा कारखाना हातात घेऊन आ पृथ्वीराज बाबा यांच्या हसक्षेपाला व भविष्यातील मनसुब्याना या निकालाने धुळीस मिळवले हा राग तर बाबा कोरोनाच्या नावाखाली आळवत नसतील ना?अशी चर्चा आहे...जर या ठिकाणी मोहितेंच पॅनल निवडून आले असते...तर बाबानी कोरोनाचे खापर या निवडणुकीवर फोडले असते का? अशी चर्चाही "कृष्णा' काठी आता रंगली आहे

सध्याचे कोरोनाचे कराड तालुक्यातील चित्र फारच विदारक आहे जिल्ह्यात सर्वात अधिक रुग्णसंख्या व मृत्युदर याच तालुक्यात दिसतोय त्यासाठी प्रशासन नेमकं काय काम करतंय हा जिल्ह्यासमोर प्रश्न आहेच... चुकीचे लॉक डाऊन... आकडे घोटाळा... शासन स्तरावरील "मंत्र्यांच्या' ठोस निर्णय क्षमतेची उदासीनता... प्रशासनाचे वारंवार नवीन जी आर काढण्याचे प्रयोग करून एकप्रकारे लोकांच्या जीवनाशी खेळण्याबाबतचे धोरण...तसेच जिल्ह्यातील आमदार महेश शिंदे यांचेसह काही लोकप्रतिनिधी सोडले तर... इतरांची केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याची सोयीस्कर भूमिका... या व अशा अनेक कारणांमुळे कोरोना जिल्ह्याला चिकटूनच बसल्याचे वास्तव लोकांसमोर आहे...याबाबत बाबा कधीच का बोलत नाहीत? जिल्ह्यात आणखी बरीच कारणे कोरोना वाढीसाठी चर्चेत असताना कृष्णा कारखान्याची निवडणूक  कोरोना वाढीसाठी कारणीभूत आहे असे विधान नुकतंच आ प्रिथ्वीराजबाबांनी एका पत्रकार परिषदेतूंन केले आहे...ते करण्यामागे नेमकं कारण काय... याचीच सगळीकडे  चर्चा आहे...

नुकतीच काही दिवसापूर्वी येथील कृष्णा कारखान्याची निवडणूक पार पडली भोसले गटाने या निवडणुकीत प्रतिस्पर्धी दोन्हीं मोहितेना धूळ चारत अद्वितीय असा विजय संपादन करत आत्ता पर्यंत कृष्णेत झालेल्या विजयाचे रेकॉर्ड मोडित काढून सत्ता काबीज केली...दोन्ही मोहित्यांना खजील करणारा प्रराभव पहावा लागला... याचे त्या त्या वेळी सविस्तर विश्लेषण झाले आहे  पृथ्वीराजबाबांनी या निवडणुकीत या दोन्ही मोहिते गटांना एकत्र करण्यासाठी खूप प्रयत्न केले खरे...पण नाही जमले... त्यानंतर निवडणूक पार पडली आणि पुढचा सगळा पट जिल्ह्यासमोर आहेच.... पण दोन दिवसापूर्वी प्रिथ्वीराजबाबां कराड मध्ये पत्रकार परिषदेत म्हणाले की या कारखान्याच्या निवडणुकीमुळे तालुक्यात कोरोना वाढला...कदाचित तसे असेलही...प्रशासनाकडून त्यांना तसे रिपोरटिंग झालेही असेल...पण प्रश्न असा आहे की एवढेच कारण कोरोना वाढीसाठी पुरेसे मानावे का...? ही निवडणूक कोरोनाचा पीक पिरियड असताना तालुक्यात होत आहे हे बाबांना त्याचवेळी माहीत होते... मग त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून ही निवडणूक थांबविण्यासठी काहीच प्रयत्न का केले नाहीत....निवडणूक होऊ नये म्हणून एखादी याचिका...किंवा तक्रार कुठे केली का? तसे केले असते तर, जसे ही निवडणूक झाल्यामुळे कोरोना वाढला असे म्हटले जातंय...तसे ही निवडणूक कॅन्सल होऊन कोरोना आटोक्यात आला असेही म्हणायला वाव होताच की...मात्र तसे प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही... उलट या निवडणुकीत लक्ष घालून दोन्ही मोहित्यांना एकत्र करत भोसलेंना तगडा विरोध व्हावा यासाठी फिल्डिंग लावण्याचा उघड प्रयत्न बाबांनी केल्याचे सर्वांनाच माहीत आहे...एका मोहित्यांकडे ना विश्वजीत कदम होते तर दुसरीकडे युवा नेते ऍड उदयदादा उंडाळकर होते तरी यश आले नाही... निवडणूक तिरंगी होऊन भोसले विजयी झाले...खरतर ही निवडणूक व्हावी असा कोर्टाचा आदेश होता... त्यामुळे निवडणूक ही होणारच होती...ती कोण जिंकेल हे त्यावेळी कोणीच सांगू शकत नव्हते...मग निकाल जाहीर झाल्यानंतर आपण एकत्र करायला निघालेल्या मोहितेना नामुष्कीजनक पराभव सहन करावा लागला याचे शल्य माजी मुख्यमंत्र्यांना आहे का? म्हणून त्यांनी दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील वाढत्या कोरोनाचे खापर या निवडणुकीवर फोडून आपली मळमळ व्यक्त केली का? अशीच यानिमित्ताने चर्चा सुरू आहे...आणि ,हेच जर उलटे झाले असते तर...म्हणजे मोहित्यांनी एवढा मोठा विजय या निवडणुकीत मिळवला असता आणि मोहिते कृष्णेच्या सत्तेत आले असते.. तर... कृष्णा निवडणुकीमुळे कोरोना वाढला असा साक्षात्कार बाबा ना झाला असता का ? याचीच चर्चा आता   सम्पूर्ण "कृष्णा' काठावर सुरू आहे...

1 comment:

  1. पहिल्यांदा निवडणूक घेण्यासाठी यांनी आपल्या अंगाने प्रयत्न केले आहेत निवडणुकीची गरज नव्हती कारण सत्ता भोसले गटाकडे होते पृथ्वीराज चव्हाण यांना इतक्या दिवस कोरोना आहे तरी यांनी काय केले आज पर्यंत ते सांगावे मग बोलावे

    ReplyDelete