Thursday, July 15, 2021

दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्याच होणार जाहीर...शिक्षणमंत्री

वेध माझा ऑनलाइन
कोरोनामुळे दहावीतील विद्यार्थ्यांचे निकाल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने रोखून ठेवले होते. त्यामुळे राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांमधून निकाल कधी लागणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ट्विट करीत दहावीचा निकाल उद्याच होणार असल्याचे जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै,२०२१ रोजी दु. १ वाजता जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा! अस शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्याने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरविले होते.

No comments:

Post a Comment