कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांचे एकनिष्ठ व खन्दे समर्थक, शहरातील ऍक्टिव्ह सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील (नाना) यांच्या पुढाकाराने रणजित पाटील मित्र परिवाराच्या माध्यमातून ना.बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पूर ग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून नुकतेच पाटण तालुक्यातील कोंडावळे येथे जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले
एकूण 111किटचे वाटप याठिकाणी करण्यात आले
याप्रसंगी पाटण तहसिलदार.प्रशांत थोरात सर्कल संकपाळ प्रतीक पाटील.अनिल कदम.विजय निकम.प्रविण पाटील.नितिन पाटील.व नेचलेचे संरपच राम मोहिते .कोंडवळेच्या संरपच.सौ.निता इंगळे.पोलिस पाटील राजाराम इंगळे व इतर सहकारी उपस्थित होते
गेल्या आठवड्यात पाटण तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला अनेकजण बेघर झाले काही बेपत्ता झाले तर अनेकांचे अतिवृष्टीने मृत्यू झाले बिकट अवस्था झालेल्या पाटण तालुक्यातील पीडित लोकांसाठी राज्यभरातून लाख मोलाची मदत येऊ लागली कोंडावळे येथे जाऊन रणजित नानांनी नामदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेथील गरजूं व पीडिताना मदत द्यायचे ठरवले आणि आपली मदत तात्काळ त्याठिकाणी पोच करून आपली समाजाप्रती असणारी बांधीलकी जपली नानांच्या या भूमिकेचं शहरातून कौतुक होताना दिसतय...
ना बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले रणजित पाटील(नाना) हे शहरातील प्रथितयश उद्योजक आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरात त्यांची ओळख आहे कोविड काळात त्यांनी खूप मोठं काम केले आहे अडचणीत असेल त्याला मदत करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे गणेशोत्सव काळात ते शहरांतील गणपती मंडळांतील भक्तांची दरवर्षी मोफत जेवणाची व्यवस्था करून देत आपली सामाजिक बांधिलकी नेटाने सांभाळताना दिसतात त्यांच्या कार्याचे शहरात नेहमीच कौतुक होत असते त्यांनी नुकतेच नामदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिनी मौजे कोंडावळे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लोकांसमोर सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे इतरांनी देखील अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी रंजितनानांसारखे पुढे आले पाहिजे अशी आता लोक अपेक्षा करताना दिसत आहेत
मौजे.चाफ्याचा खडक,बाविचावाडा,किसरुळे या ठिकाणी 84 किटचे वाटप रणजीत नानांनी केले आहे नांदगाव मनव येथेही मदत पोच झाली आहे आज पाली येथे तर उद्या चिपळूणला त्यांच्याकडून पीडितांना ही मदत पोच होणार आहे एकूणच नानांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होताना दिसत आहे
No comments:
Post a Comment