लायन्स क्लब आँफ कराडच्या सन 2021-22 या वर्षासाठी अध्यक्षपदी खंडू इगळे यांची निवड करण्यात आली आहे सचिवपदी संजय पवार तर खजिनदार म्हणून मिलिंद भंडारे यांची निवड करण्यात आली आहे.
खंडू इंगळे हे दैनिक कर्मयोगी चे कार्यकारी संपादक म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत कर्मयोगीच्या माध्यमातून सामाजिक विषयामधून त्यांचा सहभाग शहरात दिसला आहे
मिलिंद भंडारे हे वर्तमानपत्र वितरण व्यवसायातील शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्व आहे त्यांनी तब्बल दोन दशकाहून या व्यवसायात आपले योगदान देत आपली बांधीलकी जपली आहे
संजय पवार हे गेल्या 8 ते 10 वर्षांपासून लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात शहर व परिसरातून अग्रेसर आहेत
लायन्स क्लब आँफ कराडला सुमारे 54 वर्षाची परंपरा असून कराड व परिसरात या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध समाजकार्य केले जाते .या संस्थेचे लायन्स आय हाँस्पीटलसह एकुण 18 कायमस्वरूपी प्रकल्प कराड शहर परिसरात आजही कार्यरत आहेत.या माध्यमातून या परिसरात मोठे सेवाभावी काम चालू आहे या निवडीबद्दल खंडू इंगळे,संजय पवार व भांडारे यांचे अभिनंदन होत आहे
No comments:
Post a Comment