Wednesday, July 7, 2021

कराडात व्यापाऱ्यांचे आंदोलन फसले... प्रशासनाशी व्यापाऱ्यांची किरकोळ वादावादी...प्रशासनाला सम्पूर्ण सहकार्य करणार ; दुकाने उघडण्याला तात्पुरती स्थगिती ; व्यापारी नितीन ओसवाल यांनी केलं स्पष्ट...

वेध माझा ऑनलाइन
कराड
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी आदेश काढले आहेत कि, इतर दुकाने कोणत्याही परिस्थितीत उघडली जाऊ नये. मात्र सोमवारी कराड शहरातील व्यापारी चांगलेच आक्रमक झाले. कराड शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवार पासून नऊ ते चार या वेळेत व्याOपारी आपली दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले होते. यावरून आज शहरातील मंडई परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु ठेवल्यामुळे सकाळी पोलीस, पालिका प्रशासनाने 12 व्यापाऱ्यांवर कारवाई केली. शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा व नगरपालिकेचे कर्मचारी केल्याने व्यापाऱ्यांचे आंदोलन फसले. मात्र, यावेळी व्यापारी व प्रशासन याचा कर्मचाऱ्यांच्या किरकोळ वादावादी झाली.दरम्यान आम्ही सर्व व्यापारी प्रशासनाला सम्पूर्ण सहकार्य करणार आहोत तसेच प्रशासनाच्या विनंती वरून आम्ही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे असे व्यापारी नितीन ओसवाल यांनी सांगितले


कराड पालिकेच्यावतीने कराड शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यासंदर्भात शहरातून सूचना देण्यात आली होती. त्यामध्ये सध्या शहरात फक्त अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेत सुरू आहेत या व्यतिरिक्त अन्य दुकाने उघडल्यास जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार येईल असे म्हंटले होते. मात्र, बुधवारी सकाळपासून व्यापाऱ्यांकडून आदेशाचे उल्लंघन केले जाऊ नये म्हणून येथील दत्त चौका परिसरासह शहरातील अनेक ठिकाणी पोलीस, पालिका प्रशासनाकडून बंदोबस्तही ठेवण्यात आला.

बुधवारी सकाळी काही व्यापारी व पोलिसांमध्येही किरकोळ वादावादी झाल्याच्या प्रकार घडला. त्यानंतर पोलिसानी वादावादी घालणाऱ्या व्यापाऱ्यांना ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यातही नेले आहे. कराड शहरातील व्यापार्‍यांनी खा. श्रीनिवास पाटील यांना ही आपल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर खा. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे व्यापार्‍यांना 9 ते 4 या वेळेत कोरोनाचे नियम पाळून दूकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दरम्यान आम्ही सर्व व्यापारी प्रशासनाला सम्पूर्ण सहकार्य करणार आहोत तसेच प्रशासनाच्या विनंती वरून आम्ही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे असे व्यापारी नितीन ओसवाल यांनी सांगितले आहे

No comments:

Post a Comment