कराड
येत्या बुधवार पासून सकाळी 9 ते 4 या वेळेत सर्व प्रकारची दूकाने उघडणार तसेच दंड केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करू असा इशारा आज येथील व्यापाऱ्यांच्या वतीने तहसीलदार अमरदीप वाकडे याना निवेदनाद्वारे देण्यात आला
या निवेदनात म्हंटले आहे कि, सातारा जिल्ह्यात पुन्हा 3 जुलैला लॉकडाऊन लागू केला आहे.2 जुलै पर्यंत कृष्णा कारखाना इलेक्शन चालू होते, हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर होते त्यावेळी आपण लक्ष दिले नाही आणि इलेक्शन संपले की लगेच लॉकडाऊन लागू केले. सामान्य लोकांनी कसे जगायचे हे तरी आपण सांगा. एक तर कामधंदा नाही, त्यात महागाई वाढली आहे. त्यात कर्जाचे हप्ते, दुकान - घर भाडे, लाईट बिल, विविध कर कसे भरायचे...? लोक रोज घरी येत आहेत त्यांना काय उत्तर दयायचे. आता घाण ठेवायला ही काही शिल्लक राहिले नाही. लॉकडाऊन लागून आत्महत्या करण्यापेक्षा ते कोरोनाने मेलेलं बरं असेच आता वाटू लागले आहे. आपण सर्वजण सर्वसामान्य लोकांचा विचार न करता राजकारण करत आहे असेच दिसत आहे. आपणाकडून काय उत्तर मिळणार ?त्यामूळे लाॅकडाउन आदेश रद्द करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कराड व्यापारी महासंघ व कराड तालुका दक्ष नागरिक संघाने निवेदनाद्वारे दिला आहे
दरम्यान, आ.पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी, यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी आपला पाठिंबा व्यापाऱ्यांना जाहिर केला...
No comments:
Post a Comment