Friday, July 30, 2021

सातारा जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता...हवामान खात्याचा अंदाज...

वेध माझा ऑनलाइन
कराड
राज्यात मागील काही दिवसांपूर्वी पावसाने चांगलीच दैना उडवून दिली. त्यानंतर आता पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. काही ठिकाणी माध्यम ते तुरळक स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान आज 3-4 तासांमध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, शोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून मान्सूनचा असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग काहीसा उत्तरेकडे सरकला असून पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीवर आहे. उत्तर बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरावर आहे. दोन दिवसात हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल झारखंड, बिहार कडे सरकत आहे. अरबी समुद्रात गुजरात पासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

पूर्व भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून बिहार मध्यप्रदेश सहित उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे उद्या दिनांक 31 कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने वर्तवला आहे.

No comments:

Post a Comment