दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणीं पुर परिस्थिती निर्माण झाली आहे कराड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कराड तालुक्यातील कोळे ते अंबवडे गावांदरम्यान असणार्या बंधार्याचे व लगतच्या शेतजमिनीचे फार मोठे नुकसान झाले आहे सदर नुकसानग्रस्त ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे उपाध्यक्ष मा शिवराज मोरे दादा यांनी भेट देऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानी संदर्भात कराडचे तहसीलदार अमर्दिप वाकडे यांच्याशी फोनवरून चर्चा करुन योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले
यावेळी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
शिवराज मोरे हे युवक काँग्रेसचे राज्याचे पदाधिकारी आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात कराड शहर व तालुक्याच्या राजकारणात सध्या ते अग्रेसिव्ह दिसत आहेत मधल्या काळात त्यांनी पालिकेच्या राजकारणात लक्ष घालत आ प्रिथविराज चव्हाण यांची बाजू मांडुन पत्रकार परिषदेतून आत्तापर्यंत पृथ्वीराजबाबांनी शहरात दिलेल्या निधीचा खुलासा केला होता तालुक्याच्या राजकारणात व सहकारात देखील त्यांनी आपले आपले योगदान देत शेतकरी बांधवांसाठी आपली भूमिका अनेकदा मांडली आहे नुकताच कराड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यातील कोले ते अंबवडे या दरम्यानच्या परिसरातील शेतजमिनीचे मोठी हानी झाल्याने तेथील शेतकरी हवालदिल झाला आहे त्याठिकाणची पाहणी करून शिवराज मोरे यांनी तहसीलदार वाकडे याना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत विनंती केली आहे
No comments:
Post a Comment