Thursday, July 8, 2021

म न से शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त "कॉटेज' मधील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे रोटरी क्लब ऑफ कराडच्या माध्यमातून रोज रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण वाटप करण्यात येते. कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक दाते या उपक्रमाला हातभार लावून आपली बांधीलकी जपताना दिसतात म न से चे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरीच्या अन्नछत्र सेवेच्या माध्यमातून नुकतेच एका दिवसाच्या जेवणाचे वाटप केले.

कॉटेज हॉस्पिटल मधील रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरील गावावरून अथवा घरून जेवण आणणे शक्य होत नाही. त्यांच्या जेवणाचे हाल होत असतात. लॉक डाऊन मुळे बाहेरही कुठे जेवण मिळत नाही. यासाठी रोटरीच्या वतीने अन्नछत्र सेवा कायमस्वरूपी सुरू केली आहे त्या माध्यमातून रोज ताजे, पौष्टिक व भरपेट जेवण रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येते. सागर बर्गे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमांतर्गत नुकतेच जेवणाचे वाटप करण्यात आले.
      
  यावेळी दै.पुढारी चे कराड  कार्यालय प्रमुख  सतीश मोरे, दक्ष कराडकर चे  प्रमोद बापू पाटील, जॉन्टी थोरात, गणेश पवार, सतीश भोंगाळे,दत्तात्रय दुपटे,  रोटरी क्लब अॉफ कराड चे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे, राहुल पुरोहित व प्रकल्प प्रमुख प्रबोध पुरोहित  आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment