म्हणतात ना लादलेले पुढारी वेगळे...मला नेता म्हणा...म्हणणारे वेगळे...आणि वेळ आली की प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणारे विरळच... येथील पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार हे ग्राउंड वर उतरून लोकांसाठी काम करणारे नेते आहेत हे त्यांनी आज पुन्हा दाखवून दिले आहे... शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा तेथील पाटण कॉलनी येथील रहेवाश्यांची गैरसोय होते त्यांना अनेक अडचणी ना सामोरे जावे लागते...याचे भान ठेवून आज जरा पाऊस वाढतोय याचा अंदाज घेऊन स्वतः बांधकाम सभापती रस्त्यावर आले आणि त्यांनी त्या कॉलनीतील लोकांची विचारपूस केली व प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या... प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारे पवार मेहेरबान वेळ पडली की मात्र जनतेसाठी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य कसे पेलतात याचे उदाहरण यानिमित्ताने आज लोकांसमोर आले...
हणमंतराव पवार हे कार्यकर्ता ते नेता असा प्रवास करून त्यांच्या स्वतःच्या राजकीय कष्टावर व लोकांच्या विश्वासावर सलग पालिकेत पोचले आहेत... बांधकाम सभापती म्हणून त्यांच्या नावे रेकॉर्ड झाले आहे...कारण त्यांच्या कालावधी एवढे हे पद अद्याप इतर कोणीच भूषवले नाहीये अशी नोंद आहे...
त्यांनी लॉक डाऊन काळात देखील स्वतः ग्राउंड वर उतरून लोकांसाठी अनेक मदतीचे हात दिले आहेत मास्क सॅनिटायझेर चे वाटप असेल जीवनावश्यक वस्तू तसेच कोरोनाची घरागरातून जनजागृती असेल अश्या अनेक कामातून ते जनतेसमोर वारंवार आले आहेत आणि वैशिठय म्हणजे या विषयीची कोणतीही जाहिरात त्यांनी कधीही केली नाही...लोकांसाठी काम करत राहणे असा त्यांचा कार्यकर्त्यांचा पिंड आहे...मागील पूरपरिस्थिती वेळी देखील त्यांनी लोकांसाठी असंच काम उभे केले आहे
गेले काही दिवस पावसाचा धुमाकूळ चालू आहे शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत तिथे वेळेवर आणि लक्षपूर्वकपणे येणाऱ्या पूर परिस्थितीत तेथील लोकांची काळजी घेणे गरजेचे असते म्हणजे त्याठिकाची गरज ओळखून वेळीच तेथील लोकांचे इतर ठिकाणी स्थलांतर करणे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि याचेच भान शहराचे नगरसेवक म्हणून पवार यांनी वेळीच ओळखून पाटण कॉलनीतील लोकांची आज त्यांनी तातडीने चौकशी करून त्यांच्या यांबाबतीतील अडचणी समजून घेतल्या तसेच तेथील पाहणी करून संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या
कधीही कुठल्याही प्रसिद्धी झोतात न वावरणाऱ्या मात्र गरज पडली की लोकांसाठी सर्वांच्या अगोदर धावून येणाऱ्या बांधकाम सभापतींचे यानिमित्ताने शहरात कौतुक होत आहे
No comments:
Post a Comment