Friday, July 23, 2021

कराड दक्षिण मध्ये पावसाचा हाहाकार उदयदादांकडून परिस्थितीची पाहणी


कराड
कराड दक्षिण विभागातील दक्षिण मांड व वांग नदीला पूर आला असून बहुतेक पूल पाण्याखाली गेले आहेत. नांदगांव, टाळगांव येथील नदीकाठावरील 40 कुटुंबाचे स्थलांतर केले आहे. नांदगांव पूल कमकुवत झालेने वाहतुकीसाठी बंद केला आहे. शेवाळेवाडी -घोंगाव येथील जिल्हा परिषद तलाव फुटला असून खोचरेवाडी तलावाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे तर उंडाळे तलावाचे पाण्याने सरंक्षण भिंत तुडल्याने जिंती रस्ता खचू लागला आहे. या सर्व परिस्थिती ची जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेस चे दक्षिणचे नेते ऍड उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी पाहणी केली व शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.

ऍड उदयदादांनी नांदगांव,उंडाळे,घोंगाव ,
टाळगांव येथे भेटी देऊन पूरस्थितीची पहाणी केली. यावेळी प्रा धनाजी काटकर,राजेंद्र पाटील,नांदगांव चे उपसरपंच अधिकाराव पाटील,टाळगांव चे उपसरपंच सचिन पाटील,राजेंद्र जाधव,टी के पाटील,अशोक पाटील,अमोल कांबळे यांची उपस्थिती होती. पूर काळात लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन यावेळी उदयसिंह पाटील यांनी केले. नुकसानी बाबत मा. तहसीलदार, गटविकास अधिकारी,जिल्हा परिषद व ल पा विभागाच्या अधिकारी ,बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानी बाबतची फोन वरून माहिती दिली.

No comments:

Post a Comment