Tuesday, July 27, 2021

नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे "आदर्श नगराध्यक्षा ' पुरस्काराने सन्मानित...नवभारत वृत्त समूहाने केला सन्मान... नगराध्यक्षानी पुरस्कार केला कराड वासीयांना समर्पित...राज्यात कराड शहराचा झाला गौरव...

अजिंक्य गोवेकर
कराड
आघाडीच्या असणा-या नवभारत वृत्त समूहाच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा 
आदर्श नगराध्यक्षा" पुरस्कार यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे याना नुकताच प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलमताई गो-हे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले 

दरवर्षी नवभारत वृत्तपत्र ग्रुपच्या वतीने नारीशक्तीचा सन्मान केला जातो. समाजासाठी विधायक काम करणा-या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यात येते त्यासाठी नवभारत वृत्त समूहाच्या वतीने सर्व्हेक्षण करून  उत्कृष्ठ काम करणा-या महिलांची निवड केली जाते. यावर्षी  देण्यात येणारा  मानाचा "आदर्श नगराध्यक्षा" पुरस्कार कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे याना काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला होता त्यानुसार नुकतेच त्याचे वितरण पुणे बालेवाडी येथे मोठ्या दिमाखात करण्यात आले... या पुरस्काराने कराड शहराचा सन्मान सम्पूर्ण राज्यात वाढला आहे अशी भावना आता व्यक्त होताना दिसत आहे...
  
दरम्यान पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना  नगराध्यक्षा सौ शिंदे म्हणाल्या...कोणत्याही क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीला पुरस्कार रूपी कौतुकाची थाप मिळाली की त्या व्यक्तीला नव्या ऊर्जेने, उत्साहाने अजून जास्त चांगले काम करण्याचे बळ मिळते, असे मला प्रामाणिकपणे वाटते. सर्व दिग्गज सन्माननीय व्यक्तींच्या उपस्थितीत हा पुरस्कार मला मिळाला ,ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. हा पुरस्कार केवळ माझ्या एकटीचा नसून माझ्या सर्व शहरवासीयांचा आहे तसेच कराड नगर परिषदेचे माझे सर्व सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी या सर्वांचा आहे असे मी मानते हा पुरस्कार मी याना समर्पित करते. कारण आम्ही सर्वांनी एकत्रित केलेल्या कामामुळेच हा पुरस्कार मला मिळाला अशी माझी भावना आहे आमचे नेते डॉ.अतुलबाबा भोसले,  शेखरजी चरेगावकर, श्री.विक्रमदादा पावसकर यांनी दाखवलेला माझ्यावरील विश्वास, तसेच वेळोवेळी केलेले मागर्दर्शन, यामुळे हा पुरस्कार मिळवणे शक्य झाले. या पुरस्कारावर या सर्वांचाही माझ्या इतकाच अधिकार आहे ,तसेच माझा झालेला सन्मान म्हणजे या सर्वांचाच सन्मान आहे असे मी मानते .
नवभारत वृत्तसमूह हा वृत्तपत्र क्षेत्रातील संपूर्ण देशात लोकप्रिय असा समूह आहे. या वृत्त समूहाच्या नवमहाराष्ट्र, या दैनिकाला संपूर्ण राज्यभरात एक मानाचे स्थान आहे . या वृत्तपत्राने माझी, माझ्या कामाची योग्य दखल घेतली, कामाचे कौतुक केले, याबद्दल याबद्दल मी मनापासून नवभारत व नवमहाराष्ट्र दैनिकाच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानते. माझ्याकडून शक्य होईल तेवढे सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून माझ्या शहरवासीयांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन असेही नगराध्यक्षा सौ शिंदे यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या यावेळी आवर्जून त्यांचे कौतुक करण्यासाठी माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर या सोहळ्यास उपस्थित राहिले
नगराध्यक्षा सौ शिंदे यांच्या कुटुंबीयांनी देखील एवढा मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment