वेध माझा ऑनलाइन
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून दिल्लीकडे सगळ्यांकडे लक्ष लागलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह काही जणांची नावे चर्चेत होती. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी वेगवान घडामोडी सुरू होत्या. शपथविधीची वेळ जवळ येत असतानाच कुणाला मंत्रिमंडळात घेणार याविषयी राजकीय वर्तुळात धाकधूक वाढली होती. मात्र, अखेर यावरील पडदा दूर झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या ४३ मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यात नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चार जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नव्याने ४३ जणांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे...
१. नारायण राणे२. सर्बांनंद सोनोवोल३. विरेंद्र कुमार४. ज्योतिरादित्य शिंदे५. रामचंद्र प्रसाद सिंग६. अश्विनी वैष्णव७. पशुपति कुमार पारस८. किरण रिजाजू९. राजकुमार सिंह१०. हरदीप सिंग पुरी११. मनसुख मंदाविया१२. भूपेंद्र यादव१३. पुरुषोत्तम रुपेला१४. जी. किसन रेड्डी१५. अनुराग सिंग ठाकूर9१६. पंकज चौधरी१७. अनुप्रिया सिंग पटेल१८. सत्यपाल सिंग बघेल१९. राजीव चंद्रशेखर२०. शोभा करांडलाजे२१. भानूप्रताप सिंह वर्मा२२. दर्शना विक्रम जरदोश२३. मीनाक्षी लेखी२४. अन्नपूर्णा देवी२५. ए. नारायणस्वामी२६. कौशल किशोर२७. अजय भट्ट२८. बी. एल. वर्मा२९. अजय कुमार३०. चौहान देवुसिंह३१. भगवंत खुबा३२. कपिल पाटील३३. प्रतिमा भौमिक३४. डॉ. सुभाष सरकार३५. डॉ. भागवत कराड३६. डॉ. राजकुमार सिंह३७. डॉ. भारती पवार३८. बिश्वेश्वर तुडू३९. शंतनू ठाकूर४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई४१. जॉन बारला४२. डॉ. एल. मुरुगन४३. निसिथ प्रामाणिक
No comments:
Post a Comment