कराड
येथील पालिका घनकचरा व्यवस्थापन विषयीचे टेंडर मागील 30 तारखेला संपलं आहे त्यानंतर त्याच काँट्रॅक्टरला 10 दिवस वाढवून दिले गेले मात्र तीही मुदत संपल्याने आता तो कॉन्ट्रॅक्टर हे काम करण्यास तयार नाही दरम्यान दुसरे टेंडरची योग्य ती प्रोसिजर पूर्ण करून 5 ते 6 तारखेला सहीसाठी नगराध्यक्षाकडे दिले असता आजपर्यंत त्यावर सही झाली नाही परिणामी आज संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानी काम बंद ठेवले आहे असे पालिकेचे आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले एकूणच आज शहरात कचरा तसाच पडून राहणार असल्याने स्वच्छ शहराचा आदर्श सांगणारे कराड शहर आज कचरायुक्त दिसते आहे यानिमित्ताने राजकीय विरोधकांकडून नगराध्यक्षा टार्गेट झाल्याचे पुन्हा दिसते आहे
शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला याचा सार्थ अभिमान शहर वासीयांना आहेच त्याच जोरावर शहरवासी इतर जिल्ह्यात गेला तरी कराडच्या स्वच्छतेबाबत राज्यात अववल असल्याचे अभिमानाने सांगतो परंतु आज तोच शहरवासी कराड शहर कचरायुक्त बघून अक्षरशः खजील झाला आहे
नगराध्यक्षा सौ शिंदेबाबत जनशक्ती आघाडी नेहमीच आक्रमक विरोध करीत आली आहे राजेंद्र यादव यांनी काही दिवसांपूर्वी शहराचे बजेट त्यांच्यामुळेच अडकून राहिलंय असा आरोप करीत त्यांनी शहराची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याबाबत मागणी केली होती व उपोषणाचा पवित्रा घेतला होता तर नगरसेविका सौ हुलवान यांनी देखील नगराध्यक्षावर फौजदारी दाखल करण्याची मागणी केली होती पालिकेच्या ठरावाचे अवमूल्यनन केल्याचा आरोप त्यांनी केला होता तर आज नगराध्यक्षानी घनकचरा व्यवस्थापन विषयीच्या निघालेल्या नवीन टेंडर वर सही न केल्याने आरोग्य कर्मचारी आज शहरातील कचरा उचलू शकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे... याला सर्वस्वी नगराध्यक्षा जबाबदार आहेत त्यांच्या अधमुठेपणामुळे गाव वेठीस धरले जातय असे आज वाटेगावकर म्हणाले आहेत
याबाबत सी ओ डाके यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, नगराध्यक्ष सौ शिंदे यांना मी सही करा असे काही दिवसांपासून सांगतोय मात्र त्या करते करते एवढंच म्हणतायत...परिस्थिती क्रिटिकल होईल असेही मी बोललो होतो...असेही सी ओ आज म्हणाले...
याबाबत नगराध्यक्षा सौ शिंदे काय बोलतात हे पाहणे महत्वाचे आहे...
No comments:
Post a Comment