Tuesday, July 6, 2021

कराडच्या नगराध्यक्षांसह त्यांच्या पतीवर फौजदारी गुन्हा दाखल करा; सभापती स्मिता हुलवान यांची मागणी

 वेध माझा ऑनलाइन
कराड
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी कराड नगरपालिकेच्या ठरावाचे अवमूल्यन केले असून कराड शहर विद्रुपीकरण करून वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असे शुभेच्छा व अभिनंदनाचे फलक कराड शहरात लावल्यामुळे या दोघांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे केली आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनेल विजयी झाले. याबद्दल नगराध्यक्ष रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी कराड शहरातील विविध चौकांमध्ये अभिनंदनाचे फलक लावले. दरम्यान हे फलक लावताना कराड नगरपरिषदेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी सदर घटनेची मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना लेखी स्वरूपात पत्र देऊन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी कराड शहरात अभिनंदनाचे फलक लावताना नगरपरिषदेची परवानगी घेतली आहे का ? याची चौकशी केली असता मुख्याधिकार्‍यांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे.


कराडामध्ये 1 जुलै रोजी अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते. शुभेच्छा फलक नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी शनिवार पेठ, शाहू चौक, शनिवार पेठ बनपुरीकर कॉलनी परिसरात लावले होते. दरम्यान स्मिता हुलवान यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करताच शुभेच्छासह अभिनंदनाचे फलक ताबडतोब गायब करण्यात आले.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या सभेत कराड शहरात फलक लावण्यासंदर्भात ठराव झाला आहे. मात्र नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीच या ठरावाचे अवमुल्यन केले आहे. त्यामुळे नगराध्यक्षांसह त्यांच्या पतीवर सार्वजनिक मालमतेतेचे नुकसान, नगरपालिकेच्या ठरावाचे अवमुल्यन केल्याबद्दल नगरपालिकेने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी विना परवानगी फलक लावले. ते लावताना उमेश शिंदे यांनी रीतसर नगरपालिकेची परवानगी घेतली नाही व अर्जही दाखल केला नाही. यामुळे नियम भंग झाला आहे. याचा लेखी खुलासा करावा. अन्यथा महाराष्ट्र मालमत्तेच्या निरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पत्र मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे यांना दिले आहे.

17 जानेवारी 2019 रोजी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक 11/ 264 नुसार कोणत्याही प्रकारचे फलक कराड नगरपालिकेच्या रस्त्यावर लावता येणार नाहीऐ. असा निर्णय झालेला आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सहकार पॅनेल विजयी झाले. त्यांच्या अभिनंदन व शुभेच्छेचा विना परवानगी फलक लावलेबद्दल डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे कराड शहर अध्यक्ष उमेश शिंदे व नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे केली असल्याची माहिती सभापती स्मिता हुलवान यांनी दिली.

No comments:

Post a Comment