Friday, July 2, 2021

कराड रोटरी क्लबच्या वतीने औषधी वृक्षांचे रोपण...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 महाराष्ट्र कृषि दिनानिमित्त  रोटरी ऑफ क्लब कराड, एनव्हायरो नेचर क्लब कराड नगरपरिषद कराड यांचे संयुक्त विद्यमाने आशा किरण शासकीय महिला वस्तिगृह कराड येथे वृक्षारोपण उपक्रम पार पडला. यावेळी विविध प्रकारच्या औषधी व आयुर्वेदिक वृक्षांचे रोपन मान्यवारांचे हस्ते करण्यात आले. आवळा, रवि आवळा, अडुळसा, कडु लिंब, गुळवेल, कोरफड, पळस, पंगारा, कवड, रुई, तुळस, हिरडा-बेहदा, मोह,  अर्जुन बेल व माका अशी विविध रोपे यावेळी लावण्यात आली. 

यावेळी रोटरी क्लब कराड चे अध्यक्ष रो. चंद्रकुमार डांगे व एनव्हायरो क्लब चे काशिद सर यांनी या वृक्षांची निगा, काळजी व संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. 
       या प्रसंगी अध्यक्ष. चंद्रकुमार डांगे, सेक्रेटरी  अभय पवार, इनव्हायरो क्लब चे काशिद सर, चंद्रकांत जाधव, ओझा सर, जाधव सर, अशोक इंगळे, चंद्रशेखर पाटील, राजेश खराडे, प्रबोध पुरोहित, राजू खलिपे, रघुनाथ डुबल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment