सातारा
कोरोनाचा वाढता प्राधुरभाव लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील लॉक डाऊन संबंधीचे निरबंध आणखी कडक करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज जारी केले आहेत
अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने उद्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत, हॉटेल रेस्टाॅरेंट घरपोच सेवा देता येणार, क्रीडांगणे, खेळ सूरु होणार असली तरी धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत तर विविध कार्यक्रमावर निर्बंध राहणार आहेत. संस्था सभांना व व्यायाम शाळांना, जिमला 50% क्षमतेने सूरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, एसटी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सोमवार ते शूक्रवार या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेतच सुरू राहतील व अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने ही पूर्ण बंद राहणार आहेत.
कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट आहे.मात्र सध्यस्थितीतील परिस्थितीनूसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 3/07/2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे
No comments:
Post a Comment