कराड
कराडच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांना नवभारत वृत्तपत्र समुहाचा मानाचा "आदर्श नगराध्यक्षा' पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ शिंदे यांच्या कार्यालयातून पत्रकाद्वारे देण्यात आली आहे त्यांच्या आत्तापर्यंतच्या एकूणच सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्या जिल्ह्यातील त्या एकमेव नगराध्यक्षा आहेत त्यांचे सम्पूर्ण राज्यभरातून अभिनंदन होत आहे
या सोहळ्यास सहकारमंत्री ना बाळासाहेब पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. वंदना चव्हाण, आ. रोहित पवार, आ. निलम गोर्हे, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरीचिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, औरंगाबाद जिल्हा पोलीस प्रमुख मोक्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समुहाच्यावतीने प्रतिवर्षी शासकीय,सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आदी क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्या महिलांचा वुमेन्स अॅवॉर्ड देवून यथोचित सन्मान केला जातो. सन 2021साठी कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांचा या पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे.
कराड शहराच्या नगराध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पालिकेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी तसेच कर्मचारी यांना बरोबर घेवून त्यांनी शहराच्या विकासात्मक कामकाजाला सुरूवात केली. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत राज्य व देशपातळीवर यश मिळविण्यासाठी योगदान दिले. माझी वसुंधरा अभियानात त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने उत्कृष्ठ कामगिरी बजावली. मागील महापूरात त्यांनी स्वतः नागरिकांना धीर देवून सर्वोतोपरी सहाय्य केले.
त्यांनी कोरोना संकटात केलेलं कामदेखील विसरून चालणार नाही एका कोरोना मृतदेहावर चक्क अंत्यसंस्कार करून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळेपणाही दाखवून दिला होता... एक महिला नगराध्यक्षां कोविड मृतदेहावर अंत्यसंकार करते हे राज्यातील पहिलेच उदाहरण ठरले होते... आणि म्हणूनच त्यांचे त्यावेळी राज्यभर कौतुकही झाले होते...स्वतः त्या कोरोना पोसिटीव्ह झाल्या होत्या, त्यावर मात करून काही दिवसातच लोकांसाठी कोरोनाशी लढताना पुन्हा त्या दिसल्या होत्या...
त्यांच्या एकूणच सामाजिक कार्याची दखल घेवून नवभारत वृत्तसमुहाने आदर्श नगराध्यक्षा म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दि. 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल रामदा प्लाझा (बालेवाडी) येथे होणार आहे
No comments:
Post a Comment