वेध माझा ऑनलाइन
मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने राज्यातल्या अनेक भागात जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागनं राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अॅलर्ट जारी केले आहेत. हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आह
हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट जारी केला आहे. पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीला ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर, उस्मानाबाद, बीड, अहमदगर, जालना औरंगाबादला येलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं मंगळवारसाठी सातारा, कोल्हापूर, रायगड, या जिल्ह्यांना रेड अॅलर्ट दिला आहे. तर, पुणे , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबई, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली सह सपूर्ण विदर्भाला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
14 आणि 15 जुलै –हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई ला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीला येलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
16 जुलै–रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा,पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरीत गेल्या चोवीस तासांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 115 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस आला. राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आलाय. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. राजापूर शहरात आता पाणी घुसलं आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस होत आहे.
No comments:
Post a Comment