कराड
मला सकाळपासून लोकांचे फोन आले.... घंटागाडी कचरा न्यायला का आली नाही...अशी विचारणा झाली...याबाबत माहिती घेतली असता समजले की,... येथील पालिका घनकचरा व्यवस्थापन विषयीचे टेंडर मागील 30 तारखेला संपलं आहे त्यानंतर त्याच काँट्रॅक्टरला 10 दिवस वाढवून दिले गेले मात्र तीही मुदत संपल्याने आता तो कॉन्ट्रॅक्टर हे काम करण्यास तयार नाही दरम्यान दुसरे टेंडरची योग्य ती प्रोसिजर पूर्ण करून 5 ते 6 तारखेला सहीसाठी नगराध्यक्षाकडे दिले असता आजपर्यंत त्यावर सही झाली नाही परिणामी आज संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानी काम बंद ठेवले आहे असे समजले अशी प्रतिक्रिया गटनेते सौरभ पाटील यांनी आज येथे व्यक्त केली... ते पुढे म्हणाले...खरतर हे शहराच्या आरोग्याच्या ड्रीष्टीने योग्य नाही कोविड चा काळ असताना लोकांचे आरोग्य महत्वाचे मानून काम होणे गरजेचे आहे आम्ही लोकशाही आघाडी व आमचे समविचारी एकत्र येऊन घंटा गाडी लोकांच्या दारात घेऊन कचरा गोळा करू
दरम्यान तुमचे समविचारी कोण?...असा प्रश्न विचारला असता... त्यांनी शहरातील सेवाभावी कामे करणाऱ्यांची नावे घेऊन या प्रश्नावर पडदा पाडला...
No comments:
Post a Comment