कराड
रोटरी डीस्ट्रीक्ट 3132 च्या 1जुलै 2021 ते 30 जून 2022 या वर्षांकरिता असिस्टंट गव्हर्नरपदी कराडचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ राहुल फासे यांची नूतन डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ ओम मोतीपवळे यांनी नुकतीच निवड केली आहे.
डॉ राहुल फासे हे कराड रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष असून त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करून कराड रोटरी क्लबला एकूण 16 बक्षिसे मिळवून दिली. त्यांच्या या धडाडीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे कराड, पाटण, उंब्रज व मलकापूर या चार क्लबची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल रोटरी क्लब कराडचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकुमार डांगे सचिव अभय पवार व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment